13- हरवून गेल्या जाणिवा..
13- हरवून गेल्या जाणिवा..

13- हरवून गेल्या जाणिवा..

भाग 13…हरवून गेल्या जाणिवा…

 

सौ. दर्शना भुरे

 

सकाळी पाहुणे गावाला गेले ., आप्पासाहेब वैकुची काळजी करत होते..जाताना ते वैकुला आणि आपल्या सर्वांना भेटूनही गेले..

पण मथुरा वहिनींनी विनायकरावच्या आईनी जाताना वैकूची साधी चौकशीही केली नाही किंवा

घरात कोणाशीही नीट बोलल्या नाहीत

त्या आपल्याच विचारात मग्न होत्या ..

 

वहिनीचे असे वागणे विमलला

जरा खटकले

काय लिहिले माझ्या लेकीच्या नशीबात काय माहित ?

हे कसले संकेत म्हणयचे..

सर्व सुरळीत चालू असताना अचानक पदराला आग…

अशी कोणाची एकदम नजर लागली माझ्या वैकुला..कशी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती काल पोर .. ती वैकुंठाच्या डोक्यावरून हात फिरवू लागली.. तसा वैकुंठाने तिचा हात गच्च पकडून ठेवला .. ती तरी काय करणार…

वैकुच्या पदराला आग लागली अन् घाबरुन तिने अंथरूण धरले होते. तिचे सर्व अंग तापले होते..

आगीचा तर तिने धसकाच घेतला … आईला ती जराही नजरेआड जाऊ देत नव्हती…

 

सुमारे एखाद्या आठवड्यानंतर तिच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली होती पण..आग दिसली कि ती घाबरत होती..

आप्पा साहेब मधे एकदा वैकुच्या चौकशीसाठी येवून गेले होते.. पण वहिनी आल्या नाही..

त्या आपल्या वैकुलाच जणू झाल्या प्रकाराला दोषी ठरवत आहेत असे आता विमलला वाटत होते..

का? उगीचच आपले मन शंकाकुशंका ने घेरले आहे .आपण विचार करत आहोत तसे कदाचित काही नसावे …

मला अशी लगेच हिम्मत हारून चालणार नाही..विमलने मनाला सात्वना दिली.

थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल

. होईल हळूहळू सर्व पूर्वीप्रमाणे नीट..

 

कांताप्रसाद विनायकचे आजोबा यांना विनायक ची सोयरीक झालेली ऐकून खूप आनंद झाला.. विनायक हा त्यांचा सर्वात लहान मुलगा वसंतचा एकुलता एक मुलगा सर्व नातवंडांवर त्यांचे सारखेच प्रेम होते. पण आज्ञाधारक, सरळमार्गी विनायकवर त्यांचा विशेष जीव होता. त्यामुळे हल्ली तो चुलत भावांच्या नजरेत खुपत होता..सर्व भावंडे त्याचा हेवा करु लागली होती.

 

बाकी सर्व नातवंडांची लग्न आधीच झाली होती. सर्वात लहान नातवंड विनायकच्या लग्नाचीच कांताप्रसाद

वाट बघत होते.. आता विनायकचीही सोयरीक झाली होती.

वयोमानानुसार अधूनमधून त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी येत होत्या.. तेव्हा जास्त वेळ न लावता आपल्या डोळ्यासमोर योग्य वेळ पाहून त्यांनी सर्व मुलांत समान इस्टेट वाटून देण्याचे निश्चित केले..

 

कांताप्रसादने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचा सर्वात मोठा मुलगा हरिप्रसाद नाराज झाला.. त्याच्या

 

मते विनायक वसंतचा एकुलता एक मुलगा त्यामुळे साहजिकच वडिलांची सर्व इस्टेट त्या एकट्यालाच मिळणार होती..

मग माझ्या मुलांचे काय? तो आपल्या सोबत इतर भावांचेही आता कान भरू लागला..

 

हरिप्रसादची वागणूक पाहता आपण घेतलेला निर्णय त्याला मान्य नाही.. हे एव्हाना कांताप्रसाद च्या लक्षात आले होते .. हरिप्रसादचच्या वागणुकीने आधीच खचून गेल्यामुळें कांताप्रसादची तब्येत दिवसेंदिवस जास्त खालावत गेली..

 

वडिलांची बिघडलेली तब्येत सोबतच चार दिवसांवर आलेले मुलीचे लग्न यातील आप्पा साहेबाची एकट्याची ओढताण होवू लागली..तेव्हा आतल्या गाठीचा हरिप्रसाद सोडून इतर सर्व भाऊ मदतीला धावून आले.

 

प्रमिलाच्या लग्नासाठी लग्नघरी पाहुणे मंडळी जमू लागली.. लग्नाचे सर्व विधी सुरू झाले. मधुकरराव, विमल ही निमंत्रित पाहुणे मंडळी सोबत वैकुंठाला घेऊन पोहोचले.. वैकुंठा ने समोर होवून तिच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार करताच तिला तोंडभरून आशिर्वाद देत

तिच्या गालावरून कौतुकाने हात फिरवत मथुरा काकीने जेव्हा तिचे चुंबन घेतले तेव्हा विमलचे डोळे त्याक्षणी पाणावले..आपण विचार करत आहे.. तसे काहीही यांच्या मनात नाही याची तिला खुषी झाली..

कांताप्रसादची तब्येत नाजूक असल्याने त्यांना आतल्या खोलीत झोपवले होते.. पाहुण्यांनी वैकुंठाला खोलीत नेवून त्यांच्याशी विनायकची होणारी बायको म्हणून ओळख करुन देताच ते गहिवरून येत

म्हणाले, वसंता नक्षत्रासारखी पोर निवडली रे तू सून म्हणून.. मला विनूला नवरदेव झालेले पाहायचे आहे.

मला माझे मरण समोर दिसत आहे.

तेव्हा माझे डोळे मिटण्यापूर्वी माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील का?

विनायकच्या डोक्याला बाशिंग बांधशील.. दोन्ही नातवंडांचे लग्न पाहण्यासाठी माझा जीव घुटमळत आहे..

 

वडिलांच्या तोंडून असे बोलणे ऐकून आप्पासाहेब गोंधळात पडले ..

प्रमिलाच्या मंडपात विनायक-वैकुंठाचे लग्न असे कसे शक्य आहे. मधुकरराव च्या घरचे हे पहिलेच कार्य.. असे सहजासहजी तयार होणार नाहीत ते वैकुंठाच्या लग्नाला ..

तरीही आपल्या

वडिलांची अंतिम इच्छा म्हणून अप्पासाहेबांनी मधुकररावशी एकदा बोलण्याचे ठरविले..

क्रमशः

Next Part

https://marathi.shabdaparna.in/14-हरवून-गेल्या-जा

Previous Link

https://marathi.shabdaparna.in/12-साखरपुडा

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!