उलटे पडले फासे-कथामालिका
भाग-१५
आज शुक्रवार संध्याकाळी विनयला भेटायला मनिष,शिल्पा आले. शनिवार,रविवार कोर्टला सुट्टी असल्यामुळे दोन दिवस तो इकडेच राहणार होता.
त्यांचा मुलगा मृगांक त्यालाही विनयकाकाला बघायचे होते.
मृगांक,पिहू आणि संस्कारची चांगलीच गट्टी जमली. सुरुवातीला शहरी वातावरणाला बुजलेला संस्कार पिहू,मृगांक सोबत मस्ती करायला लागला.
अर्पिताने रमाला विचारुन विनयच्या आवडीचे जेवण बनवले होते. सगळ्यांची जेवणे झाली.मुलांना झोपवून सगळे हाॕलमध्ये गप्पा करत बसले.सगळे आनंदात होते.
रमाच्या चेहऱ्यावर तिचा आनंद दिसत होता.
सगळे सोबत बसले.होस्टेलच्या आठवणी निघाल्या.
विनयला वाईट वाटू नये म्हणून राहूल,मनिष संयमाने बोलत होते.
विनयः मजेदार दिवस होते ते.
राहूलः हो रे.आम्ही किती उनाड होतो.ते आठवले कि वाईटही वाटते आणि हसूही येते.
मनिषः हो ना.ते दिवस वापस आणता आले असते तर….
विनयः आता काय फायदा वापस येऊन?
अरे,मनिष तू डायरी आणली का माझी?
हो रे. ही घे.
पण वाचून परत कर रे
अरे माझीच तर डायरी आहे.
मनिषः हो रे. पण आता माझी पण आहे. मी पण थोडेफार लिहीले आहे तुझे वाचून वाचून
राहूलः काय? मनिष तू डायरी लिहीली.
असे म्हणत राहूलने ती डायरी मनिषच्या हातून अक्षरशः ओढली आणि धावायला लागला.
मनिष डायरी घ्यायला त्याच्या मागे धावत होता.
अर्पिता आणि शिल्पाला एरवी नेहमी गंभीर असणाऱ्या नवऱ्यांना असे हसत,धावत बघतांना हसू आवरत नव्हते.
विनय आणि रमाही हास्यात सामील झाले.
आज खूप दिवसांनी दोघांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.
राहूल डायरी घेऊन बसला.धावून थकलेला मनिषही त्यांच्या जवळ येऊन बसला. राहूलने डायरी उघडली आणि वाचायला लागला.
अरे खरेच मनिषनेही लिहिले आहे.तो ओरडला,
दाखव मला.विनय बोलला.
राहूलने डायरी त्याच्याजवळ दिली.
रमाला डायरीबद्दल काहीही माहिती नव्हते.
विनय कधी बोलला नाही डायरीबद्दल.
अग खूप आधी लिहीलेली आहे ती.
जे लिहिले आहे ते आता आयुष्यात काहीही उरले नाही.
मनिषः रमावहीनी या डायरीने आमचे आयुष्य बदलवले.
राहूलः आमच्या आयुष्याचा आदर्श हिरो म्हणजे ही डायरी.
आणि रमावहिनी तुमचाही उल्लेख आहे बरं का डायरीत.
रमाः माझा? कसा?
राहूलः तुम्ही आमच्या मित्राला खूप आवडायच्या.खास तुमच्यासाठी तो आजोळी यायचा,असे लिहिले आहे त्याने.
रमाः इश्श. काहीही का राहूलभाऊजी.
मनिषः वहिनी खरेच सांगतो आहे राहूल.
तुमच्या प्रेमात पडला होता आमचा विनय नववीत असतांनाच.
मला तर कधी बोलला नाही असे म्हणत रमा लाजली.
विनयः माझे मित्र नाही सुधरणार कधी.अरे दुसऱ्यांची डायरी वाचायची नसते एवढेही तारतम्य ठेवले नाही तुम्ही.
मनिषः अरे यार विनय तुझा सुगावा लागतो का म्हणून वाचली रे.
विनयः बरं बरं.
त्यात राहूल अर्पिताबद्दलही असेल बरे काही
रमाः अर्पिताताईला ओळखतोस तू?
विनयः अग आमच्याच शाळेत होती अर्पिता.आमच्यापेक्षा एक वर्ष मागे होती.
हा आपला राहूल जाम फिदा होता तिच्यावर. त्याच्यासोबत मी आणि मनिष जात होतो तिच्या वर्गात.
राहूलः ए विनय पुरे आता. तिलाही मी खूप आवडायचो.
हो ना ग अर्पिता?
मला नाही आठवत आता तेवढ्या जुन्या गोष्टी. अर्पिता हसत बोलली.
राहूलः आणि कविताही आहे रे डायरीत?
आता ही कविता कोण? शिल्पाने विचारले.
ते मनिषला विचार.
त्यानेच लिहिले आहे.
अर्पिताः कविता तर माझी मैत्रीण आहे शाळेपासून.
आले लक्षात.मनिषला आवडायची बहूतेक ती.
शिल्पाः काय रे मनिष?
मनिषः अग तेव्हा काही समजायचेच नाही.समजायला लागले तेव्हा फक्त तू आवडलीस.
अर्पिताः पण तिला विनय आवडायचा रे.
शिल्पाः हो का?
सगळे हसायला लागले.
राहूलःमनिषचे लग्न कसे झाले माहीत आहे का तुला?
विनयः नाही बा.
राहूलः अरे त्यांनी चक्क पळून जाऊन लग्न केले.मी आणि अर्पिता दोघेच होतो त्यांच्या लग्नाचे साक्षीदार.
मनिषः अरे यार काय करणार मग?
दोघांच्याही घरचे लग्नाला विरोध करत होते.आणि शिल्पाला माझ्याशीच लग्न करायचे होते.
शिल्पाः काहीही.तुलाच लग्न करायचे होते माझ्याशी.किती मागे मागे राहायचास माझ्या. काॕलेजच्या पहिल्या दिवसापासून पिंगा घालायचास माझ्या अवतीभवती.
राहूलला माहित आहे सगळे.
राहूलः मला नाही बा काही माहित
त्याने असे म्हणताच सगळे हसायला लागले.
हास्ताचा धबधबा जरा ओसरल्यावर मनिष बोलला,
विनय तू सांग ना काही तुझ्या आणि रमावहिनीबद्दल.
रमाः नको. नको.विनय आपले काय सांगायचे?.
रमाने असे म्हणताच परत सगळे हसायला लागले.
विनयः अग,रमा सगळे आपलेच आहेत. आपली lovestory पण कळू दे कि त्यांना.
तुम्ही डायरीत रमाबद्दल आलेला उल्लेख वाचलाच आहे. त्यात लिहिल्याप्रमाणे रमा मला लहानपणापासूनच आवडायची.
तुलाही आवडायचो का ग मी? विनयने गमतीने तिला विचारले.
रमा लाजेने काहीच बोलली नाही. विनय पुढे बोलू लागला.माझ्या मामाची मुलगी. मामा सधन शेतकरी.
त्याला तीन मुली. रमा धाकटी मुलगी.
उलटे पडले फासे- कशी वाटत आहे कथामालिका?
Next Part
https://marathi.shabdaparna.in/१६-Marathi
Previous Link
https://marathi.shabdaparna.in/१४-उलटे-पडले-फासे
shabdaparnamarathi@gmail.com
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
https://marathi.shabdaparna.in/बोलके
https://marathi.shabdaparna.in/गाणं
https://marathi.shabdaparna.in/लघूकथा
https://marathi.shabdaparna.in/Bollywood





, छान कथा ..खूप आवडली.
खूप आभार
कथा छान आहे