७-उसवले धागे कसे?
७-उसवले धागे कसे?

७-उसवले धागे कसे?

७-उसवले धागे कसे?
उसवले धागे कसे, कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
चैतन्य येणार म्हणून आनंदीने मीटिंग्ज,सभा यांच्या वेळा बदलवल्या होत्या.त्याचा आवडता अबोलीचा गजरा माळला,त्याला अबोली रंग आवडतो म्हणून त्याच रंगाची साडी नेसली. आता पुढे ….
चैतन्य आला.तिच्याकडे बघतच राहिला. 
काय बघतोस एवढा निरखून?
अबोलीचा गजरा बघतो. तुला आठवते आनंदी,मी म्हणायचो मी मोठा झाल्यावर गजरेवाला  बनतो आणि  तू म्हणायचीच फुले आणि  सुगंध नको विकू रे.
हो रे आठवतं सगळं.त्या फुलांच्या आठवणींचीच तर सोबत होती आजवर.
आता मात्र  आठवणीतील तू प्रत्यक्षात समोर आहेस .
पण किती दिवस….चैतन्य मनातच बोलला.
चैतन्य आणि आनंदी दोघेही जुन्या आठवणीत रंगले.
पारसपिंपळाखाली केलेल्या गप्पा, भविष्याची रंगवलेली स्वप्ने आनंदीला शब्द नी शब्द आठवत होते.
मध्येच तिने चैतन्यला विचारले
चैतन्य आपण लग्न कधी करायचे?
चैतन्य तिच्या प्रश्नाने शहारला.
अरे सांग ना.मी आता तुझ्याशिवाय नाही राहू शकत.
मला तू हवा आहेस चैतन्य.
आनंदीच्या नजरेत त्याला वेगळीच चमक दिसली.
मी कसे सांगू  हिला मी लग्न केल्याचे ?
आनंदी-मी बाबांनाही सांगितले आपल्याबद्दल.
आता मात्र चैतन्य घाबरला.
तिला सांगणे किती गरजेचे आहे याची त्याला जाणीव झाली.
पण कसे सांगणार? आनंदी कालपासून इतकी आनंदात होती  कि तिला सांगितलेले ती सहनही करेल का अशी चैतन्यला शंका आली.
काय करावे? चैतन्यच्या मनातील गोंधळ वाढत चालला होता.
त्याने आनंदीला म्हंटले
आनंदी मी लग्न केले असेल तर
आनंदी जोरात खळखळून हसली.
माझ्याशिवाय तू एकातरी मुलीकडे बघायचा का?
आणि म्हणे  लग्न-काहीतरीच बोलतोस.
अग तेव्हा नाही बघायचो पण नंतर तर मी एकटा होतो.
तू एकटा कधीच नव्हता.माझ्या आठवणी तुझ्यासोबत होत्या. मी पण एकटी नव्हते.तू कायम माझ्यासोबत असल्यासारखा वाटायचा.
मी लग्न केले असे तुला सांगितले तर तुला खरे वाटेल का?
चैतन्य आपण एकमेकांशिवाय नाही राहू शकत.मग उगाच कशाला अट्टाहास करायचा?
सांग ना आपण कधी लग्न करायचे?
तू राजकारण सोडल्यावर.
चैतन्य पटकन बोलून गेला.
सोडले.चल.आता या क्षणापासून मी राजकारण सोडते.
आणि बाबा?
त्यांची समजूत  घालेन मी.अरे तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आनंद गेला होता. मी खचलेल्या बाबांना नाही म्हणू नाही शकली.
आणि खरे सांगू का?
चैतन्यचा हात पकडत आनंदी म्हणाली.
मीही नंतर सत्तेच्या मोहात पडली.
पण तुझ्यावरचे प्रेम कधीच कमी नाही झाले.आणि  तुझेही माझ्यावरचे प्रेम कमी नाही झाले. हो ना रे?
चैतन्यला कुणीतरी आतून ओरबडतेय, इथून पळून जावे असे वाटायला लागले. हेच आनंदी आधी बोलली असती तर किती वेगळे आयुष्य राहिले असते.
तो ताडकन उठला आणि  रुमबाहेर पडला.
आनंदीला कळले नाही हा का अचानक उठला ते.
चैतन्य चैतन्य करीत तिने हाका मारल्या.चैतन्य तिच्या  हाकांकडे दुर्लक्ष करीत निघून गेला.
तिची थोड्या वेळात मिटींग होती ती.आज तिचे मिटींगमध्ये मन रमत नव्हती,मिटींग अर्ध्यावर टाकून ती परत आली.
चैतन्य जवळ असावा असे तीव्रतेने वाटले तिला.
पण चैतन्यचा मोबाइल नंबर  घ्यायला विसरली होती.
चैतन्य आला की मी बेभान होते.उद्या आडवणीने नंबार घेईल त्याचा.
उद्या येईल का चैतन्य?
आनंदी एकटीच बडबड करत होती.
चैतन्य घरी आला.  त्याला टेन्शनमध्ये बघून प्राचीने विचारले,
चैतन्य  काही प्राॕब्लेम का रे?  खूप तणावात दिसतोस.
चैतन्य गप्प होता,
बोल ना चैतन्य तीन चार दिवसापासून तणावात दिसत आहेस.कंपनीत काही प्राॕब्लेम?
प्राची चैतन्यचा हात पकडत त्याच्या बाजूला बसलि.
मला सांग ना काय बिनसले.
चैतन्यला भरीन आले.
मी प्राचीला फसवत आहो का?
ती खूप प्रेम करते माझ्यावर.
तिला सांगू  का आनंदीबद्दल?
आता यानंतर आनंदीला भेटणे टाळायचे असा पक्का निश्चय केला चैतन्यने.
दोघांनी मिळून जेवण केले.सोबत झोपायला गेले.
प्राची चैतन्यच्या मिठीत गाढ झोपली.
चैतन्यचे खूप वेळ संयम ठेवलेले मन जागे झाले.
आनंदी एकटी असेल.
या विचारासरशी चैतन्य उठून बसला.
बाजूला प्राची होती आणि मनात आनंदी.
त्याच्या जीवाची नुसती तगमग चालली होती.
प्राची किती शांत आणि तृप्ततेने झोपली.
प्राचीमुळे माझे अस्थिर असलेले आयुष्य सावरले.
पण आनंदी?
आयुष्यात कित्येक वर्ष फक्त आनंदी होती.
आता पण आहेच….जागे झालेले मन बोलले.
चैतन्य झोपायचा  प्रयत्न करत होता.पण डोळे बंद केले कि समोर आनंदी दिसत होती.
क्रमशः 
Previous Link
 स्थिरस्थावर झालेल्या चैतन्यच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदी येते.पुढे काय होईल? आनंदी नावाच्या वादळाला तो थोपवू शकेल कि तोही वादळसोबत वहावत जाईल….वाचा पुढील  भाग.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!