६-उसवले धागे कसे?
६-उसवले धागे कसे?

६-उसवले धागे कसे?

६-उसवले धागे कसे?
उसवले धागे कसे, कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट
खूप वर्षांनी चैतन्यला त्याची प्रेयसी दिसली.आणि जखम भळभळ वहावी तशा मनात दडवलेल्या तिच्या आठवणी वाहायला लागल्या.आनंदीला विसरणे त्याला शक्य झाले का?कर्तव्यदक्ष ,त्याच्यावर प्रेम करणारी,त्याला जपणारी प्राची आनंदीची जागा घेऊ शकली नाही….आता पुढे  
चैतन्य उठला.
आनंदी कुठल्या हाॕटेलमध्ये थांबली असेल? काल सभा झाली त्याच्या जवळपासच थांबली असेल.भेटू का तिला?
या विचारानेच चमकला तो. काय करु?
जाऊ का भेटायला? नको.प्राचीची फसवणूक नको करायला.
पण एकदाच शेवटचे भेटायला हवे. ती इथे आली म्हणून.भेटून आल्यावर प्राचीला सांगेन मी सगळं.
असे स्वतःला आश्वासन दिले.
आनंदीला आवडता रंग  पांढरा.त्याच रंगाचा शर्ट घालून तयार होऊन तो बाहेर पडला.
आनंदीला आवडणाऱ्या गुलाबाच्या फुलांचा गुच्छ सोबत घेऊन निघाला.
आनंदी जिथे थांबली होती ते हाॕटेल शोधायला त्याला वेळ लागला नाही.
हाॕटेलमध्ये जाऊन त्याने आनंदीदेवीला भेटायचे आहे असे सांगितले. मॕनेजरने आनंदीच्या रुममध्ये फोन करुन विचारले. मॕनेजरने त्याला रुम नंबर सांगितला. चैतन्य धडधडत्या अंतःकरणाने रुमकडे निघाला. तो जाण्यापूर्वीच आनंदीने दार उघडले होते.
दोघे समोरासमोर आले. एकमेकांकडे बघितले. आनंदीसाठी धक्कादायक होते हे. आनंदीने त्याला आत ओढून दार लावले आणि त्याला  घट्ट बिलगली.
चैतन्यला हे अनपेक्षित होते.आनंदीने मिठी मारताच मधल्या सगळ्या गोष्टी विसरल्या गेल्या.दोघे समोरासमोर आले. एवढ्या वर्षांनी काय बोलणार? एकमेकांकडे बघितले. आनंदीसाठी धक्कादायक होते हे. 
चैतन्य तू कुठे होतास? असे म्हणत पुन्हा मिठीत शिरली.
किती वाट बघितली मी. तुझा नंबर पण बदलवला तू.
मला सोडून एवढी वर्ष तू राहू शकला?
अग थांब मला बोलू तर दे.
चैतन्यला बघून ती आनंदाने वेडीपिसी झाली होती.
तिच्या आनंदाला तडा जाऊ नये म्हणून चैतन्यही लग्नाबद्दल काही बोलला नाही.
अरे हो.तू बोलत नाही आहेस काही
ए मला विसरला तर नाही ना?
तिच्या प्रश्नांची काय उत्तरे देणार चैतन्य?
चैतन्यने गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आनंदीच्या हातात दिला.
गुलाबी आणि पांढरे गावठी गुलाबांचा गुच्छ.
तुला कुठे  मिळाले गावठी फुले? शोधले तुझ्यासाठी.
तुझी आवड लक्षात आहे आनंदी माझ्या.
असायलाच हवी चैतन्य.मी तरी कुठे विसरली काही.
ही बघ अबोली रंगाची साडी,तुझा आवडता रंग.मजजवळ ह्याच रंगाच्या जास्त साड्या आहेत.
तिच बोलत गेली.चैतन्य फक्त ऐकत होता.तिच्याकडे बघत होता.
बराच वेळ झाला होता. त्याला उठवत नव्हते तिथून.आनंदीजवळच थांबावे असे वाटत होते.
त्याचा मोबाइल वाजला.प्राचीचा फोन होता.
चैतन्य कुठे  आहेस? तू घरी आहेस म्हणून मी लवकर आले.
जरा बाहेर आलो होतो.येतो जरावेळात.
कुणाचा फोन होता रे चैतन्य?
आनंदीने विचारले.
कंपनीमधून होता.
चैतन्यने थाप मारली.
तिच्या आनंदाला तडा जाऊ नये म्हणून चैतन्य लग्नाबद्दल काही बोलला नाही.
दोघे पुन्हा बोलत बसले.प्राचीचा फोन आला होता हेही तो विसरला होता.
संध्याकाळ व्हायला आली. आता घरी जायला हवे.
तो आनंदीला म्हणाला,
येतो मी.
आनंदी त्याला थांबण्याचा आग्रह करत होती.
थांब ना चैतन्य  जरा वेळ असे म्हणत तिने दोघांसाठी चहा मागवला.
आनंदी अग उशीर होत आहे माला.
घरी जाऊन एकटाच चहा घेणार नं.
चैतन्य थांबला.
आनंदी बोलत राहली,हसत राहली.संध्याकाळ संपत आली.प्राचीचा पुन्हा  फोन आला.
चैतन्यने उचलला नाही.
आनंदीचा सहवास हळाहवासा वाटत होता.
पण मोह आवरायला हवा
असे पुटपुटत चैतन्य उठला.
उद्या नक्की येतो असे आनंदीला सांगून तो उभा राहला.
आनंदीने त्याचा हात घट्ट पकडला.
 उद्या नक्की येणार नं.
 हो म्हणत चैतन्यने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.तो बाहेर पडला.
प्राची घरी वाट बघत होतीच. चैतन्य घरी आला पण त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. खूप विचार करुन त्याने आनंदीला सोडण्याचा निर्णय घेतला होता.
पण आता तोच निर्णय त्याला घाईत घेतल्यासारखा वाटत होता.
मन विचित्र असते हेच खरे.आधी जे सहजासहजी मिळू शकत होते ते तेव्हा नको वाटले आणि आता ते मिळणे अशक्य असतांना मन तिकडे धाव घेत होते.
प्राचीला चैतन्यच्या मनातील खळबळ कळणे शक्य नव्हते. पण चैतन्यचे काहीतरी बिनसले हे त्याच्या वागण्यावरुन तिच्या लक्षात आले होते.
तिने विचारलेही त्याला तसे पण
काही नाही ग.जरा डोके दुखत आहे
असे त्याने सांगितले.
दुसऱ्या दिवशीही तो कंपनीमध्ये  गेला नाही.
प्राची गेल्यानंतर आपोआप त्याचे पाय आनंदी थांबून असलेल्या हाॕटेलकडे वळले. आज त्याने त्याचे लग्न झाल्याचे आनंदीला सांगायचे ठरविले होते.
आनंदी त्याची वाटच बघत होती. त्याच्या आवडीच्या अबोली रंगाची साडी नेसली.अबोलीची वेणी केसात माळली.चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.
चैतन्य येणार म्हणून तिने मीटिंग्ज,सभा यांच्या वेळा बदलवल्या होत्या.
आनंदी आणि चैतन्यच्या वाढत गेलेल्या भेटी त्यांना जवळ आणतात का? आणि प्राची? तिला सोडून चैतन्य आनंदीकडे जाईल का….वाचा पुढील भागात.
क्रमशः
Previous Link
चैतन्य एवढेच प्रेम आनंदी राजकारणावरही करते. पण चैतन्य हे स्वीकारतो का? पुढील भाग नक्की वाचा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!