१५- स्वप्न तहानलेले
भातुकलीच्या खेळामधली
ज्योती रामटेके
आंनदीचा निर्णय दीपाला कळताच ती दुःखाने रडू लागली. दीपाला सर्व माहीत होते. आंनदीने हा जीवघेणा निर्णय का घेतला यांची जाणीव होती तिला.
कनक हे सगळे कसे सहन करणार? ती लगेच वाड्यात गेली.दारात आक्का दिसली. तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य दिसत होते.आपला रचलेला डाव कसा यशस्वी झाला याचा अघोरी आंनद तिला सुखावत होता. आराधना मात्र दुःखी दिसत होती.तिला प्रेमाची किंमत कळत होती.आपले प्रेम जेव्हा दुसऱ्या कुणाच्यातरी वाट्याला जाते तेव्हा काय यातना होतात याची तिला जाणीव होती.
कनक आंनदी शिवाय कसा जगेल याची काळजी तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.
आराधना कनक कुठे आहे? दीपाने हाताने खिडकीकडे बोट दाखवले. कनक खिडकीतून बाहेर बघत होता. दीपा दिसताच एखाद्या लहान मुलासारखा रडायला लागला.
कनक आवर स्वतःला. आंनदीने तिची वाट निवडली आहे तू पण प्रयत्न कर. तिने असा निर्णय का घेतला याची जाणीव आहे तुला.नियतीला तुमचे सुख मान्य नव्हते.
लवकरच आंनदीचे लग्न आहे. गरीबांच्या मुलांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून तुम्ही दोघे शाळा काढणार होते.आंनदीचे हे स्वप्न तू पूर्ण कर.तिला समाधान मिळेल.काल तिच्या घरी मी गेली होती. घरात आनंदाचे वातावरण आहे. गुणी, सुंदर.. समजदार जावई मिळाल्याचे समाधान काकू कडे बघितल्यावर कळत होते.
दादा मरणाच्या दारातून बाहेर आला, समजदार जावई मिळाला. आता समोर काही नको काका सांगत होते. त्या





Wahhh
सुरेख कथा
कथेला अनपेक्षित वळण.
उत्तम कथा मालिका