ओंजळ-marathi article
परवा सकाळी स्वयंपाक करताना रेडिओ वर एक खूप छान बातमी ऐकण्यात आली ..( तसा माझा सकाळचा बराचसा वेळ स्वयंपाक घरातच जातो ..आणि रेडिओ मी स्वयंपाक घरातच ठेवल्यामुळे बरीचशी चांगली माहिती आपोआपच कानावर पडते )
सध्या लाँकडाऊन मुळे शाळा बंदच आहेत …तर या सुट्टीत मुलांसाठी काही तरी करावे म्हणून एका शिक्षीकेने मुलांसाठी मराठीचे एक अँप सुरू केले ….अगदी विनामूल्य …आणि त्या अँपचे नाव आहे ….ओंजळ …..किती सुंदर …अन् सार्थ …..
ओंजळ …शब्दच किती गोड ..काही काही शब्दच असे असतात ना् …कि ते मनात जरी आले तरी आपल्याला खूप प्रसन्न वाटायला लागतं..
ओंजळ भर फुले आपल्याला देव्हाऱ्यातल्या देवाची आठवण करुन देतात… आणि खरच ..प्रसन्न वाटायला लागतं …माझी आजी तर नेहमी म्हणायची …माझ्या देवाला ओंजळ भर फुले असली कि बस ..झाले …बाकी काही लागत नाही…
एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला ओंजळभर पाणी देऊन बघा…त्याचा चेहऱ्यावरचे समाधान तुम्हाला आयुष्य भराचा आनंद देऊन जाईल…
कधी तुम्ही नववधूचा ..लाजेने चुर होऊन ..ओंजळीत लपवलेला चेहरा पाहिला आहे का ? आठवून बघा ..तुमच्याही चेहऱ्यावर नकळत ..हसू उमटले ना….
पण कधी कधी …ओंजळभर …ह्या शब्दामध्ये मला अल्पसंतुष्ट व्रूत्तीचाही आभास होतो …म्हणजे आपण अपेक्षा करतानाच खूप कमी का करायची ..?जास्तीची का नाही करायची …? अधाशीपणा किंवा दुसऱ्यांचे ओरबडणे हे वाईटच …ते इथे मुळातच अपेक्षित नाही, म्हणजे मला जे काही मिळणार आहे ( निर्गुण अथवा सगुण ) ते कमीच अथवा बेतास बास ..मिळावे ..असे मनातून वाटणे ..मला खटकते …असो …
शेवटी माणसाला जगायला काय लागतं ना …फार काही लागतच नाही …सगळ्या गोष्टी अगदी ओंजळभर असल्या तरी पुरेशा असतात ,ओंजळभर समाधान ही तुम्हाला आनंदी आयुष्य जगायला पुरेसे असते …पण हे समजून घेणेच फार कठीण असते …
शेवटी राहून राहून एक विचार मनात येतो …आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुशांतसिंग राजपूत विषयी …कुठेतरी त्याच्या जिवनात ..ओंजळ भर आशीर्वादाची कमी पडली का ..? त्याला हे सुंदर जिवन संपवावे वाटले….
शेवटी असे म्हणावेसे वाटते …
दे देवा मला दुःख तू पसाभर
गम्य न मला त्याचे काही …
पण ….
आहे देवा त्याचवेळी हक्क
माझा तुझ्यावर…
मागुन घेण्याचे आशीर्वाद
ओंजळभर ……
–वैशाली जोशी खोडवे
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











देण्यासारखा आनंद नाही.