सर्वांना आवडणारा,चिरतरुण देवआनंद आणि सौंदर्यवती साधना यांचा असली नकली
श्रीमंत आनंद (देवआनंद) आणि गरीब रेणू( साधना) यांच्यात निर्माण झालेले अतूट बंध.
त्याच्या शाश्वत प्रेमावर तिचा पूर्ण विश्वास तरीही हे प्रेम असेच राहील का ही शंका ह्दयात कधीतरी कळ उठवते.
तो तिला विसरणार नाही याची खात्री पण तरीही विसरेल का ही शंका मनात डोकावते.
त्याचे तिच्यावर असलेले प्रेम कमी तर नाही होणार…..
तुझे-माझे प्रेम अतूट,शाश्वत आहे तरीही हे भय कसले?
तूच सांग आता राहून राहून मनात तू विसरशील का …अशी भीती का डोकावते?
तुझ्या-माझ्या प्रेमाचा प्रभाव सर्वत्र दिसतोय.तरीही मनात भीती आहेच.त्या आभाळी चमकणाऱ्या चंदाने त्याच्या चांदणीला काय सांगितले असेल? किती आनंदात दिसतेय ती.
आपल्या प्रेमाचा उत्सव साजरी करणारी ही रात्र संपूच नये.प्रणयाचा,आनंदाचा हा प्रवास असाच सुरु राहावा.
मी जिकडे बघत आहे सगळीकडे तू दिसत आहेस.माझ्या ध्यानी,मनी तूच आहे.
पण मग हे भय कसले?
आपल्या प्रेमाने आता उच्चतम पातळी गाठाली आहे.आपल्या इच्छा,आनंद तुझ्या-माझ्या प्रेमामुळे तरुण झाल्या आहेत.माझ्या मिठीत जसे आभाळ सामावले आहे.आज मी जणू चांदण्यांवरुन चालत आहे.तरी पण हे सगळे असेच चालू राणार कि……भय आहेच.
ही भीती कसली असावी?
तेरा मेरा प्यार अमर, फिर क्यों मुझको लगता है डर
मेरे जीवन साथी बता, दिल क्यों धड़के रह-रह कर
क्या कहा है चाँद ने, जिसको सुनके चाँदनी
हर लहर पे झूमके, क्यों ये नाचने लगी
चाहत का है हरसू असर, फिर क्यों मुझको लगता है डर
कह रहा है मेरा दिल, अब ये रात न ढले
खुशियों का ये सिलसिला, ऐसे ही चला रहे
तुझको देखूँ देखूँ जिधर, फिर क्यों मुझको लगता है डर
है शबाब पर उमंग, हर खुशी जवान है
मेरी दोनों बाहों में, जैसे आस्मान है
चलती हूँ मैं तारों पर, फिर क्यों मुझको लगता है डर
गाणे साधना आणि देवआनंदवर चित्रित झाले आहे.गाण्याची सुरुवात आभाळात झाडामागे लपलेल्या चंद्रापासून होते. देवआनंद त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये चालतांना दाखवला.त्याच्या चालण्यात त्याची नेहमीची बेफिकीरी दाखवली.साधना अतिशय साधी, सुंदर,सोज्वळ दाखवली आहे. साधनाच्या सौंदर्याला मेकअपची जोड नसल्यामुळे ते नैसर्गिक वाटते,
हे सुंदर गीत शैलेन्द्रने मधूर शब्दात गुंफले आहे.(चलती हूँ मै तारोंपर ….कमालीची सुंदर कल्पना )
लता मंगेशकरच्या दैवी आवाजामुळे गीत अधिक श्रवणीय झाले.संगीत शंकर जयकिशन यांचे. त्यांनी गाण्यात प्रेमरस ओतला. गाण्याला शंकेची झालर दिली म्हणून गीत आगळे वेगळे बनले.
गाण्याचे रसग्रहण आवडले असल्यास सरिता बायस्कर यांच्या मधूर आवाजात हे गाणे शब्दपर्णच्या You Tube Channel वर ऐकू शकते.
प्रिती
चित्र-साभार गुगल
शब्दपर्णवरील इतर सिनेमांचे रसग्रहण वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
https://marathi.shabdaparna.in/गाणं
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज शब्दपर्ण जरुर follow करा.










खूपच छान लिहिल
Wahh 🌹🌹🌹
खूप छान
खूपच छान
खूप मस्त लिहिले
Wah
अप्रतिम
खुप सुंदर समीक्षण
वाह.. अप्रतिम 👌