12Beautiful marathi rain song-चिंब पाऊसगाणी
12Beautiful marathi rain song-चिंब पाऊसगाणी

12Beautiful marathi rain song-चिंब पाऊसगाणी

12Beautiful marathi rain song-चिंब पाऊसगाणी
12Beautiful  marathi rain song-चिंब पाऊसगाणी
धरेचा चा प्रियकर असलेले मिलनोत्सुक आभाळ आणि उन्हाने तप्त झालेली तृष्णा धरा.आभाळाला धरेला भेटायचे आहे पण पण दूरवर असलेली  धरा कशी भेटेल?
तिचे हिरवाईने नटलेले  रुप पुन्हा पुन्हा बहाल करण्यासाठी मेघांची मदत घेऊन पावसाच्या धारांनी तो तिला चिंब करतो तिची तृष्णा शांत करतो.तिचे हिरवाईने नटलेले सुंदर   रुप पुन्हा पुन्हा बहाल करत राहतो.
आभाळातुन पाऊसधारा धरतीकडे झेपावतात.आभाळाने पाठवलेल्या  पावसाच्या स्पर्शाने सुगंधीत झालेल्या धरेवर सगळेच मोहित होतात.
नेमिची येतो पावसाळा….हे जरी खरे असले तरी प्रत्येक पावसाळा नवीन भासतो.
अशीच काही आभाळाचा निरोप घेऊन धरेवर येणाऱ्या पावसाची प्रेमगाणी…..
चिंब पावसानं रान झालं
चिंब पावसानं रान झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
रानकवी ना.धो.महानोरांनी लिहिलेले गीत,हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि  लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा अप्रतिम आवाज.सर्जा सिनेमातील ह्या गीतातील शब्दात,सुरात  आपण चिंब भिजून जातो.
ती आणि  तो एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले.
ती लाजरी.तिचे आरस्पानी सौंदर्य तिला लपवायचे आहे.
पण त्याला एकांतात तिने ते लपवावे हे मुळीच पटत नाही.उन्हात चांदणं बघणाऱ्या प्रेमीचा मुग्ध प्रीतभाव गाण्यात उत्कट  व्यक्त झाला आहे.
नभ उतरु आलं
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात
अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात
तो परिस्थितीमुळे चिंतेत आहे.ती त्याला धीर देते.त्याला कधीही न सोडण्याचे आश्वासन देते.
जैत रे जैत-आदिवासी जमातीवर असलेल्या  या सिनेमातील हे गीत.ना.धो.महानोरांचे शब्द,हृद्यनाथ मंगेशकरांचे संगीत,आशा भोसलेचा आवाज आणि  स्मिता पाटीलचा अभिनय आणि  सोबत सर्वांचा आवडता पाऊस.
यापेक्षा सुंदर combination अजून काय असणार?
नभ धरतीवर रिता व्हायला लागला, सगळं चिंब झालं,सृजनशील धरा हिरवी झाली,प्रणयभाव बहरला,
तो परिस्थितीमुळे चिंतेत आहे.ती त्याला धीर देते.त्याला कधीही न सोडण्याचे आश्वासन देते.दोघे प्रेमाच्या आणाभाका घेतात.
सात जन्म प्रेम असेच राहणार…
पावसाने धरेला स्पर्श  केला आणि दोघे एक झाले.रितभात सोडून त्यांना एक व्हायचे आहे.
काही गाणी शब्दांच्या पलिकडे घेऊन जातात.नभ उतरु आलं….तसेच आहे.
 ये रे घना ये रे घना
कवी आरती प्रभुंची  घनाची आळवणी करत आहेत.त्यांना घनाला बोलवून मन शुद्ध करायचे आहे.
अतिशय सुंदर  चाल , आशा भोसलेचा आवाज.
 ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
फुले माझी अळूमाळू, वारा बघे चूरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना
नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना
ये रे घना ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना
कवी आरती प्रभुंची  घनाची आळवणी करत आहेत.त्यांना घनाला बोलवून मन शुद्ध करायचे आहे.
अतिशय सुंदर  चाल , आशा भोसलेचा आवाज.
अधीर मन झाले
अधीर मन झाले मधूर घन आले
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले
अधीर मन झाले
धूक्यातूनी नभातले सख्या प्रिया
सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले-
निलकंठ मास्तर या सुंदर सिनेमातील हे गीत.
ती चंचल,अवखळ,तो शांत,गंभीर.
प्रियकराच्या प्रेमासाठी ती अधीर झाली.ती अधीरता अजून वाढवली नभातून येणाऱ्या  मधूर मेघांनी.
पाऊसधारा कोसळताहेत आणि ती त्या धारेच्या सुरेल स्वरांनी धुंद होत आहे. पावसात केवड्यासारख्या रंगाची ती फुलली.पण त्याचे तिच्या  फुलण्याकडे,उमलण्याकडे,तिच्या अधीरतेकडे  लक्ष नाही.अशी तिची गोड तक्रार  आहे.
गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेले,अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत श्रेया घोषालच्या मधूर आवाजात ऐकणे  पडद्यावर पुजा सावंतचे नृत्य,हावभाव बघणे पर्वणी आहे. 
ओल्या सांजवेळी
ओल्या सांजवेळी, 
उन्हे सावलीस बिलगावी 
तशी तू जवळी  ये जरा 
कोऱ्या कागदाची, 
कविता अनं जशी व्हावी 
तशी तू हलके बोल ना 
अश्विनी शेंडे यांनी लिहिलेले  प्रेमाची गोष्ट चित्रपटातील  गीत.
मंतरलेल्या शब्दाची जादू आपल्यावर चढत जाते.
पाऊसात भिजलेली सांजवेळ उन्ह संपता संपता सावलीला स्पर्शून जाते तसे तिने जवळ यावे,कोऱ्या कागदावर शब्द मांडले कि कविता होते तसे तिने हळूवार व्हावे हे त्याच्या मनातील भाव गाण्यात अलवारपणे  उतरले आहेत.
बेला शिंदे आणि  स्वप्निल बांदोडकरने गायलेल्या या गीताला अविनाश विश्वाजीचे संगीत आहे.
अहो राया मला पावसात नेऊ नका

 

वसंत सबनीस यांनी लिहिलेली राम कदम यांनी संगीत असलेली लावणी दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटातील आहे.
लई गार हा झोंबे वारा
अंगावरती पडती धारा
वाटेत कुठेही नाही निवारा
भिजली साडी भिजली चोळी
भवतील ओल्या चुका
अहो राया मला पावसात नेऊ नका!
वसंत सबनीस यांनी लिहिलेली राम कदम यांनी संगीत असलेली लावणी दादा कोंडके यांच्या सोंगाड्या चित्रपटातील आहे.पुष्पा पागधरे यांनी गायली आहे.
तिला पावसात जायचे नाही. गार वारा झोंबेल, अंगावर पाऊसधारा पडतील,साडी,चोळी भिजेल.अशात संयम सुटून नकळत काही चुका झाल्यातर….अशी तिला भीती वाटतेयं.
घन ओथंबून येती, 
घन ओथंबून येती,बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती
घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती
घनभरल्या नभातून पावसाची मुक्तधार धरेला स्पर्शते,धरा शहारते,आनंदते.
धरेचा तो आनंद कड्याकपारीत,झाडांमध्ये,पक्ष्यांमध्ये,सागर,त्याच्या मिलनाला अधीर झालेली नदी,प्रणयातुर प्रेमी असा सर्वत्र  पसरतो,दरवळतो.ओथंबून येणारे घन केवळ धरेस तृप्त करत नाही.अवघे चराचर हर्षभरीत होते.
सर्वत्र  सुखद वातावरण निर्माण होते.ना.धो.महानोरांचे गीतआहे.
दाटलेल्या पावसाळी
दाटलेल्या पावसाळी रंग सारा आठवे
सांजवेळी सागराचा तो किनारा आठवे.
पाऊस एकटा येतो का? मुळीच नाही.येतांना तो अनंत आठवणी घेऊन येतो.
पाऊस आला की पावसातील आठवणी आठवतातच.
त्यालाही अशाच एक सांजवेळी पावसाचे रंग आठवत आहेत.
सागराचा किनारा,ती ओली वाळू,गार वारा,वाऱ्यासोबत येणारा खारा गंध,
सांजवेळ संपून रात्र झाली.तो जायला निघाला  तेव्हा डोळ्यात दाटलेले पाणी आताही आठवते
सौमित्र यांच्या शब्दांना संगीत अशोक पत्की यांचे आहे.अतीव सुरेल गायले आहे सुरेश वाडकर यांनी
रिमझिम झरती श्रावणधारा
गीत-मधूकर जोशी
संगीत-दशरथ पुजारी
आवाज-सुमन कल्याणपुरकर
रिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात
बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात
प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमध्ये भृंग भेटता
बरस असा की प्रिया न जाईल माघारी दारात
मेघा असशी तू आकाशी, वर्षातून तू कधी वर्षसी
वर्षामागून वर्षती नयने, करती नीत बरसात
 रिमझिम श्रावणधारांनी धरा तृप्त होत आहे पण ती मात्र तिचा सखा समीप नसल्याने उदास आहे.तिचे डोळे त्याला बघण्यासाठी आतुर झाले आहेत.ती पावसाला आर्जव करत आहे,माझा जिवलगा आला कि तू इतका कोसळ कि तो परतू शकणार नाही.
ऐ बारिश जरा थम के बरस,
जब वो आ जाये तो जम के बरस,
पहले न बरस के वो आ न सके,
फिर इतना बरस के वो जा न सके…..काहीशा अशाच भावना वरील गीतात मांडल्या आहेत.
भेट तुझी माझी स्मरते
गीत-मंगेश पाडगावकर
संगीत-यशवंत देव
आवाज-अरुण दाते
भेट तुझी माझी स्मरते ….
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
भेट तुझी माझी स्मरते
पावसाच्या रात्री  झालेली तिची भेट अजूनही त्याच्या  आठवणीत आहे.त्याच्या भेटीसाठी आतूर झालेली ती कशाचीही तमा बाळगत नाही.
लोकलाज झुगारुन ती त्याला भेटते.
तिच्या प्रेमाची ताकद तिला त्याच्यापर्यंत पोहचवते.
ती भेट होऊन आता बराच काळ सरला.पण तिचे ते पावसात भिजून चिंब झालेले रुप अजूनही त्याच्या  डोळ्यासमोर येते.
तिचे ते भिजलेले केस,गालांवरुन निथळणारे पावसाचे थेंब,त्याच्या  चुंबनाने  त्या थेंबांची झालेली फुले,एक झालेले श्वास,दोघांनी घेतलेल्या हळव्या शपथा,सगळेच जणू स्वप्नातील स्वन.
आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
माहेरी वाढलेली लेक योग्य वेळ आली कि तिची सासरी
पाठवणी होते.
सासरी निघालेल्या सासुरवाशिणीच्या ओठी हसू पण डोळ्यात आसू असतात.
आजवर जपलेल्या  लेकी आता दुसऱ्या घरात जावून संसार मांडतील….या एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या  लेकीची उपमा सुधीर मोघे यांनी भाताच्या रोपांना दिली आहे. भाताची रोपेही  एका ठिकाणी उगवून दुसऱ्या ठिकाणी  रुजवतात.
माती वेगळी असली तरी आभाळ मायेनी पाऊस पडतो आणि अवघं शेत फुलते.
हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरसाज दिलेले हे गोड गीत आशा भोसले आणि अनुराधा पौडावाल यांनी गायले आहे
आला आला वारा, संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा, सया निघाल्या सासुरा
नव्या नवतीचं बाई लकाकतं रुप
माखलं गं ऊनं, जनू हळदीचा लेप
ओठी हासू, पापणीत आसवांचा झरा
उनाड पाऊस, अशांत पाऊस
गीत-चंद्रशेखर सानेकर
आवाज-वैशाली सामंत,अवधूत गुप्ते
उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस
हाक तृषेची येता कानी मातीची ऐकून विराणी
मेघांच्या कुंभातुन बरसे अमृतमय जलधारा पाऊस
प्राण नवे झाडांना देई, गीत नवे पक्षांना देई
बैरागी रानातुन फिरवी शांत-शीतल वारा पाऊस
धरेच्या मिलनासाठी आसुसलेले आभाळ उनाड,अधीर  पावसासोबत तिला निरोप पाठवतो.
तिचा निरोप घेऊन येतांना तहानलेल्या धरेची विराणी ऐकताच तो जलधारांनी तिला चिंब करतो.
धरा चिंब झाली कि सुरु होतो आनंदोत्सव.तप्त  उन्हाने सुकलेल्या झाडांना पालवी फुटते.पक्षी गाणे गातात.
पहाड राने, नदी सरोवर, ऊरा-उरी भेटून सार्‍यांना
एकेकाला लावून जाई सृजनाचा भंडारा पाऊस
 डोंगर,रान,नदी,सरोवर सगळ्यांना कडाडून भेटून पाऊस निरोप घेतो पण जाता जाता सर्वांना  सृजनशील बनवून जातो.
प्रिय वाचक,संध्याकाळची वेळ आहे,पाऊस पडत आहे,हातात चहाचा कप आहे…अशा वेळी हमखास पावसाची गाणी आठवणार.तुमची आवडती पाऊसगाणी अवश्य पाठवा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

3 Comments

  1. Darshana

    चिंब पावसाने रान झाले…पाऊस गाणे… खुप छान… चिंब पावसात भिजल्याची जाणीव होते… आला आला वारा., 👌👌👌👌

  2. Mohini1408

    घन घन माला नभी दाटल्या
    कोसळती धारा
    अप्रतिम गाणी, मन चिंब चिंब भिजवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!