Barso re megha- Guru- Hindi rain song
बरसो रे मेघा-मेघा
श्रावणधारांनी धरा भिजली कि आनंदाचा उत्सव सुरु होतो.
दरवर्षी श्रावण पावसाची नवनवीन रुपे घेऊन येतो.त्यामुळे पाऊस जुना कधी वाटत नाही आणि कितीही पावसाळे बघितले तरी मन काही तृप्त होत नाही.
पावसाच्या मोत्यांनी सजलेल्या धारा बघत रहाव्या आणि आठवणी,कल्पना यात रमावे…
अशा या पावसाचे थेंब पडायला लागले,थेंबांच्या स्पर्शाने मृदगंध दरवळायला लागला कि काही गाणी हमखास मनाचा ताबा घेतात,मनात रुंजी घालायला लागतात.
पाऊस जसा जुना होत नाही तशीच ही शब्द,सुरात भिजलेली पावसाची गाणीही नेहमीच नवीन भासतात.
पाऊस एखाद्या तारुण्यात पदार्पण केलेल्या अल्लड,अवखळ तरुणीसारखा असतो.उत्साही,खोडकर.
मणिरत्मचे दिग्दर्शन असलेल्या गुरु चित्रपटातील हे मन प्रसन्न करणारे गीत.
मणिरत्मनचे साधे पण अतीव सुंदर दिग्दर्शन,पावसाच्या थेंबांनी डवरलेला सुंदर निसर्ग, जलधारांनी भिजून अवघी नितळ,निर्मळ झालेली धरा.पावसासोबत आलेला आनंद.सगळे पावसाचा उत्सव साजरा करत आहेत.
पावसाच्या टपोऱ्या थेंबाचे सगळे क्षण कॕमेऱ्याने अचूक टिपले आहेत.
आभाळात मेघ दाटले,मेघांनी सुर्यकिरणांना आत दडवले,धरेवर थोडा अंधार पसरला,पाऊसधारा सुरु झाल्या अशा प्रणयरम्य वातावरणात यौवना तिच्या सख्याकडे निघाली.वाटेवर ती पाऊस,गुलजारचे भावनेत,कल्पनेत चिंब भिजलेले शब्द भेटतात.
नारे नारे नारे नारे
नन्ना रे नन्ना रे नन्ना रे ना ना रे
बरसो रे मेघा-मेघा
बरसो रे, मेघा बरसो
मीठा है कोसा है, बारिश का बोसा है
जल-थल-चल-चल
चल-चल बहता चल
गीली-गीली माटी, गीली माटी के
चल घरौंदे बनायेंगे रे
हरी भरी अम्बी, अम्बी की डाली
मिल के झूले झुलाएंगे रे
धन बैजू गजनी, हल जोते सबने
बैलों की घंटी बजी, और ताल लगे भरने
रे तैर के चली, मैं तो पार चली
पार वाले पर ले किनारे चली
रे मेघा…
नन्ना रे..
काली-काली रातें, काली रातों में
ये बदरवा बरस जायेगा
गली-गली मुझको, मेघा ढूँढेगा
और गरज के पलट जायेगा
घर आँगन अंगना, और पानी का झरना
भूल न जाना मुझे, सब पूछेंगे वरना
रे बह के चली, मैं तो बह के चली
रे कहती चली, मैं तो कहके चली
रे मेघा…
नन्ना रे…
वडिलांचे घर सोडून ती जोडीदाराला भेटायला निघाली आणि मेघांचे आगमन झाले. हर्षभरीत ती अजून आनंदी झाली.
मेघाला अजून बरसण्यासाठी आर्जव करु लागली.त्याने यावे म्हणून त्याचे गोडवे गाऊ लागली.
तू गोड आणि उबदार आहेस.तू म्हणजे पावसाचे चुंबन आहेस.अहाहा चहूकडे पाणीच पाणी. तू असाच सगळ्यांना चिंब कर.तू अजून जोरात ये. तुझ्या जलधारांनी सगळ्यांना भिजव.
तिला ओल्या मातीचे घर बनवायचे आहे.पावसाने सर्वत्र हिरवाई पसरली आहे.हिरव्या हिरव्या आंब्याच्या फांदीचा झोपाळा बनवून तिला झुलायचे आहे.
मेघ आले. माती बिज टाकून तिला सृजनशील बनवण्याची वेळ आली. मातीला फुलवणाऱ्या शेतकऱ्यांनी नांगर जुंपले,बैलाच्या गळ्यातील घंटेचा आवाज तिच्या कानात वाजू लागला.ती निघाली मेघांसोबत.
आता कितीही पाऊस आला तरी ती थांबणार नाही.तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी,त्या दुसऱ्या किनाऱ्यावर मनाने ती कधीच पोहचली.तिथे जाण्यासाठी जणू तिला पंख मिळाले.
रात्रीच्या काळोखात पाऊस पडेल,तिलाही घरात, अंगणात,शोधेल.ती दिसली नाहीतर मेघ वीजेचा आवाज करुन परत जाईल.ती त्याला सांगते,
मेघा मला मात्र तू विसरु नको.माझ्याबद्दल सगळे तुलाच विचारतील.
मणिरत्मचे दिग्दर्शन असलेल्या गुरु चित्रपटातील हे मन प्रसन्न करणारे गीत.
मणिरत्मनचे साधे पण अतीव सुंदर दिग्दर्शन,पावसाच्या थेंबांनी डवरलेला सुंदर निसर्ग, जलधारांनी भिजून अवघी नितळ,निर्मळ झालेली धरा.पावसासोबत आलेला आनंद.सगळे पावसाचा उत्सव साजरा करत आहेत.
पावसाच्या टपोऱ्या थेंबाचे सगळे क्षण कॕमेऱ्याने अचूक टिपले आहेत.
गुलजारने पावसाचे आणि तिच्या कल्पनाशक्तीचे केलेले शब्दातीत वर्णन.
ऐश्वर्या राय चे अलौकिक सौंदर्य, सरोज खानच्या नृत्यदिग्दर्शनात तिचे सुरेख नृत्य,
A.R,रहेमान यांचे गाण्याला साजेसे आल्हाददायक संगीत,आणि नारे नारे नारे नारे
नन्ना रे नन्ना रे नन्ना रे ..शब्दसुरात भिजलेला काळजाचा ठाव घेणारा श्रेया घोषालचा आवाज…..बस्स
बरसो रे मेघा-मेघा
बरसो रे, मेघा बरसो….
शब्दपर्ण पावसात,सुरात,शब्दात भिजलेली गाणी घेऊन येत आहे.
तुमच्या प्रतिक्रिया,प्रतिसाद अवश्य द्या.
प्रिय वाचक,संध्याकाळची वेळ आहे,पाऊस पडत आहे,हातात चहाचा कप आहे…अशा वेळी हमखास पावसाची गाणी आठवणार.तुमची आवडती पाऊसगाणी अवश्य पाठवा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खूप सूंदर
खुप छान रसग्रहण
छानच
शब्दातीत 👌👌