Pehla nasha pehla khumar पहला नशा Best song review in marathi
Pehla nasha pehla khumar पहला नशा Best song review in marathi

Pehla nasha pehla khumar पहला नशा Best song review in marathi

कालच टिव्हीवर
‘पहला नशा,पहला खुमार
नया प्यार है नया इंतजार’
हे गाणे ऐकले आणि माझे मन माझ्या काॅलेजच्या दिवसात गेले…..

९२ साल मे महिना….
माझा बी एच एम एस चा शेवटचा पेपर संपला आणि आम्ही सर्व मित्रमैत्रिणींनी चित्रपट पाहायचे ठरवले….
पूर्वी शेवटचा पेपर आणि चित्रपट हे समिकरण ठरलेलेच होते…
जवळच्याच चित्रपटगृहात गेलो
चित्रपट होता “जो जीता वही सिकंदर” …..

हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा अॕक्शन मूव्हीचा जमाना होता त्यावेळी अनिल कपुर, जॅकी श्राॅफ यांचे चित्रपट धुडगूस घालायचे…
पण हा चित्रपट काही वेगळा होता ,एक वेगळा विषय मनाला स्पर्श करून गेला….
त्यातली सर्वच गाणी हिट झाली पण पहला नशा गाणे मात्र सर्वांच्या मनपटलावर कायमचेच घर करून बसले आहे.

दिग्दर्शक मंसूर खान यांच्या मनात या चित्रपटाची संकल्पना फार आधीपासूनच होती पण चित्रीकरण सुरू व्हायला ९० चे दशक उजाडले….

गाण्याची सुरुवात होते आमीर आणि आयेशा यांच्या संवादाने … .
मंसूर खान यांची गीताची अशी एक वेगळी पद्धत आहे ,डायलॉग संपून गाणे कधी सुरू होतं हे प्रेक्षकांना कळतच नाही ….

या गाण्यात स्लोमोशन चा वापर अतिशय अप्रतिम केला आहे… पण एकाचीही लिप मुमेंट बिलकुल चुकत नाही हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे…

शूटिंगच्या वेळेस गाण्याचे बोल जलद गतीने बोलून घेतले जेणेकरून प्रत्यक्ष डबिंग ज्यावेळी ओठांची हालचाल सुरू झालेली असतानाही गाण्याचे बोल आणि स्पीड यांचा स्क्रीन वरील कलाकारांच्या ओठाच्या गतीशी ताळमेळ तंतोतंत बसला …..

‘एक कर दूँ आसमान ‘ या वाक्याला आकाश आणि जमीन यांना जोडून घेतलेला शॉर्ट तर खरेच अफलातूनच आहे…

पहिल्या प्रेमाच्या भावना दाखवताना आमिर खान आणि आयेशा यांनी त्यांच्या भूमिकेला १००% न्याय दिला. आमीर कधी स्वेटर फेकून देतो तर कधी चक्क घरात सायकल चालतो…

या गाण्याच्या कोरियोग्राफी साठी सरोजखान यांना ठरवलं होतं पण ऐन वेळी त्या न आल्यामुळे फराह खान यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली . पूजा बेदीला नाचता येत नसल्यामुळे फराह खानने एक वेगळा प्रयोग केला … तिने पूजाला गाडीवर उभे केले आणि पंख्याच्या हवेने तिचा ड्रेस उडवला ….
एक मादक शाॅट देऊन गाण्यात एक नवीन पेलू टाकला …
आपल्या कलेचा आणि बौद्धिक क्षमतेचा सुंदर वापर करून फराह खाननी यशाचा मोरपीस आपल्या तुऱ्यात खोवले ….

या गाण्याचे रेशमी बोल लिहीलेत मजरूह सुल्तानपुरी यांनी आणि सुरेख लयीत तालबद्ध केले आहे जतिन-ललित यांनी..
त्यातील पियानोचे सूर तर आपल्याला मंत्रमुग्ध करतात आजही हे गाणं एव्हरग्रीन आहे कारण उदित नारायण आणि साधना सरगम यांचा सुरेल आवाज …..

पहला नशा पहला खुमार
नया प्यार है नया इंतजार
कर लून मे क्या अपना हाल है
दिल बेकरार
मेरे दिले बेकरार तू ही बता ….

प्रियकर- हा पहिल्या प्रेमाचा अनुभव हा काही निराळाच आहे …
त्याची धुंदी काही वेगळीच.
ही नवी ओढ, हूरहूर काही आगळीच.
आता तूच मला सांग की माझ्या अधीर मना मी काय करू ?…

उडता ही फिरू इन हवाओ मे कही
या मै झूल जाऊँ इंन घटाओ मे कही
एक करलुँ आसमान और जमीन
अब यारो क्या करू क्या नही
पहला नशा पहला खुमार ….

मी या मंत्रमुग्ध हवेमध्ये उडू क%

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!