Pyar hua ikrar hua-hindi rain song
त्याच्याजवळ तिकिट काढायला पैसे नसतात.तो अलाहाबाद वरुन मुंबईत येतो मेरा जुता है जपानी म्हणत. सोबत फक्त भविष्याचे सोनेरी स्वप्ने असतात.
पूर्ण होतील ती स्वप्ने कसली?
इथे त्याला लाॕण्ड्रीत काम मिळते.
नंतर त्याला एका शाळेत शिक्षिका असलेली ती भेटते.दोघे प्रेमात पडतात.भेटतात.श्रीमंत असल्याचा आव आणणारा तो चहा प्यायला तिला फुटपाथच्या चहावाल्याजवळ नेतो. तिला सत्य सांगतो.सत्य तिच्या कधीच लक्षात आले असते.
तो सांगतो
मुझे आपसे कुछ कहना है
जब एक शरीफ लडका शरीफ लडकीसे प्यार करता है तो उन्हें शादी कर लेनी चाहिए
और जब शादी होती है तो बच्चे भी होने चाहिए
घर चाहिए कपडे चाहिए लेकीन लाॕण्ड्रीमें मुझे पैतालिस रुपये महिना मिलते है, आपही बताईये पैतालिस रुपयेमें कोई घरगृहस्थीका बोझ कैसे उठा सकता है?
ती-अकेले नही उठा सकते मगर दोनो मिलकर उठा सकते है
त्याला प्रेमाची कबुली मिळते.ती जायला निघते तो अडवतो.मेघ दाटून येतात ती थबकते..वारा वाहण्याचा वेग वाढवतो,मेघ गर्जना करतो, पावसाची रिमझिम सुरु होते.
दोघेही भिजत आहेत.एकच छत्री आहे. ती छत्री त्याला देते.तो तिला देतो. लाजाळू असलेली ती गोंधळून जाते.त्याला छत्रीत घ्यायचे कि भिजायचे या संभ्रमात ती.तो जरा बिनधास्त.तिच्या हातून छत्री घेतो.उघडतो.पावसाची रिपरिप वाढते,ती लाजत,बावरत एका छत्रीत यायला तयार होते.व्हायोलिनचे स्वर आणि पाठोपाठ नितांतसुदर,कधीही जुने न होणारे गाणे आपल्याला ऐकू येते.
प्यार हुआ इकरार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
कहता है दिल रास्ता मुश्किल
मालुम नहीं है कहाँ मंज़िल
प्यार हुआ इकरार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
कहो की अपनी
प्रीत के गीत ना
बदलेगा कभी
तुम भी कहो इस
राह का मीत ना
बदलेगा कभी
प्यार जो टुटा प्यार
जो छूटा चाँद ना
चमकेगा कभी
रातो दसों दिशाओं से
कहेगी अपनी कहियाँ
प्रीत हमारे प्यार की
दोहराएगी जवनिया
मै न रहूगी तुम न रहोगे
फिर भी रहेगी निशानियाँ
प्रेम झाले आता कशाची भिती असे त्याला वाटते तर प्रेमाचा रस्ता कठीण आहे ,प्रेम पूर्णत्वास जाईल कि नाही अशी तिला काळजी.
त्याचा प्रेमावर प्रचंड विश्वास.प्रेम जर संपले तर आभाळात रोज चमकणारा चंद्र चमकणे बंद करेल.
तीही त्याला कबुली देते.आपण दोघे नसलो तरी आपले प्रतिरुप आपला अंश आपली निशाणी राहणार….
तो त्याचा प्रेमावर असलेल्या विश्वास व्यक्त करतो.
तिच्या कडूनही त्याला तेच अपेक्षित आहे.
आपल्या प्रेमाचे गीत कधी बदलणार नाहीतू पण वचन दे ,आपल्या प्रेमवाटेवर आपण कायम एकमेकांच्या सोबत असू.
आपले प्रेम अतूट आहे.ते अपूर्ण राहले तर चंद्रसुद्धा आभाळात चमकणे सोडून देईल.
आपले प्रेम अबाधित आहे.सगळीकडे त्याची चर्चा होईल.प्रणयरम्य जीव आपल्या प्रेमाचे उदाहरण समोर ठेवतील.
यानंतरच्या दोन ओळी
मै न रहूगी तुम न रहोगे
फिर भी रहेगी निशानियाँ
या दोन ओळी या सुरेल,मधुर गाण्याच्या भावनेचा कळस म्हणता येईल.
या ओळी गातांना ती ज्या दिशेने बोटाचा इशारा करते तिकडे तो बघतो.
तिथे त्याने बघितलेले स्वप्न,त्यांचे सुंदर भविष्य चालतांना त्यांना दिसते.
त्यांची कल्पना ,स्वप्न शब्दात आणि चित्रिकरणातही तंतोतंत मांडल्या गेली.या दोन ओळी गाण्याचा climax आहेत.
श्री ४२०- १९५५ मध्ये आलेला,लोकांना खूप आवडलेला ,कथा,अभिनय,संगीत,गाणी सगळ्याच बाबतीत सरस असलेल्या सिनेमातील हे गीत आहे.
राजकपूर-नर्गिस या प्रेमींवर हे गाणे चित्रित झाले आहे.
भोळाभाबडा पण बिनधास्त नायक आणि त्याच्या वर अपार प्रेम करणारी पण प्रेम पूर्णत्वास जाईल कि नाही हा विचार करणारी सांशक नायिका दोघांचेही हावभाव अप्रतिमच.
पाऊस,चहा,भेट यांचे समीकरण जुळवलेले हे गीत पावसात आठवल्याशिवाय राहत नाही.
रील आणि रीयलमध्ये एकमेकांवर प्रेम करणारी
राजकपूर-नर्गिस गाजलेली जोडी,शब्दांवर हुकूमत गाजवणाऱ्या शैलेन्द्रचे शब्द,शंकर-जयकिशनचे संगीत आणि मन्नाडे-लताचा आवाज.सगळेच सिनेमा जगतातील रत्ने.अशा रत्नांनी सहभाग दिलेली अशी गाणी अजरामर होणारच….
तुम्हालाही पावसात काही गाणी आठवत असतील…
comment मध्ये प्रतिसाद द्या.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










सुंदर
अप्रतिम
मस्त
Wah
अप्रतिम लिखाण