ऐ वतन आबाद रहे तू-राझी-Deshbhakti geet
ऐ वतन आबाद रहे तू-राझी-Deshbhakti geet

ऐ वतन आबाद रहे तू-राझी-Deshbhakti geet

ऐ वतन आबाद रहे तू-राझी

प्रिय वाचक हे वर्ष आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे. सर्वांना खूप शुभेच्छा.

 

देशावरील प्रेम….खरे म्हणजे हे व्यक्त करायला शब्द पुरेसे पडू शकणार नाही.
काही भावनांची खोली खूप मोठी असते त्या शब्दात बांधता येत नाही.

पण काही लेखकांनी कवींनी,गीतकारांनी त्या भावना गाण्यात,सिनेमात तंतोतंत मांडल्या आहेत.
देशभक्ती गीते आपल्यात उत्साह निर्माण करतात.देशासाठी जे शहीद झाले त्यांच्या बद्दल आदर दुणावतो,देशाचा अभिमान वाटतो.

हिंदी सिनेमात मनोजकुमारचे जवळपास सगळे सिनेमे देशावर आहेत.

नंतर रोजा,रंग दे बसंती,एअरलिफ्ट आले.२००८ मध्ये आला राझी.राझी तोपर्यंत आलेल्या सिनेमापेक्षा खूप बाबतीत वेगळा ठरला.
तोपर्यंत आलेले बहूतेक सिनेमे पुरुषप्रधान होते.राझीची हिरोइन २१ वर्षाची सेहमत आहे जी हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाते.
 सिनेमा देशप्रेमावर असला तरी कोणी व्यक्ती खलनायक नाही.सगळ्यांचे आपापल्या देशावर प्रेम आहे.
सेहमतचे आपल्या देशावर प्रेम आहे तसेच इक्बालचे त्याच्या देशावर आहे.
संवादात आक्रस्ताळेपणा कुठेही नाही.

सिनेमाला भारत-पाकिस्तानच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे . मेघना गुलजारने अतिशय संयतपणे हा विषय हाताळला आहे.

राझी एका २१ वर्षाची मुलगी ते पाकिस्तान मध्ये हेर बनून जाऊन काम फत्ते करणाऱ्या सेहमतचा प्रवास आहे.

श्रीनगरमध्ये राहणाऱ्या हिदायतचे बिझनेसच्या निमित्ताने पाकिस्तानमध्ये जाणे येणे असते.
देशावर अपार प्रेम असलेला हिदायत एकुलत्या एक मुलीचे सेहमतचे पाकिस्तानमधील आर्मीत काम करणाऱ्या इक्बालसोबत लग्न करुन देतो.सेहमत नववधू बनून पाकिस्तानमध्ये जाते.तिथे जीवावर उदार होऊन ती हेरगिरी करते.
पण सेहमतचे देशप्रेम ह्या बंधावर मात करते. ती हेरगिरी करत राहते.तिच्यावर ज्यांचा संशय येतो त्यांना ती संपवते.
तिच्या हेरगिरीमुळे पाकिस्तान भारतावर आक्रमण करणार हे समजते.

हरिंदर सिक्का यांच्या Calling Sehamat या पुस्तकावर आधारीत हा सिनेमा मेघना गुलजारने दिग्दर्शित केला आहे.

सिनेमात इक्बाल आणि सेहमतचे एकमेकांसोबत जुळलेले बंध सुरेख गुंफले आहेत.तिच्यावर प्रेम करणारा, विश्वास ठेवणारा,स्वातंत्र्य देणाऱ्या इक्बालची व्यक्तीरेखा विकी कौशल या गुणी अभिनेत्याने साकारली आहे.
त्याची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना आवडली यात नवल नाही.

सिनेमातील प्रमुख व्यक्तीरेखा सेहमतची आहे.ती आलिया भटने सुंदर साकारली.
तिचे काॕलेजमधील जीवन,अचानक वडिलांनी लग्न करुन तिला पाकिस्तानमध्ये पाठवणे,तिचे ट्रेनिंग …सगळ्याच प्रसंगात तिचा अभिनय दर्जेदार आहे.
घरची कर्तव्यदक्ष सून आणि घरच्यांचा जो देश आहे त्याविरुद्ध हेरगिरी असे दूहेरी काम तिने उत्तम केले आहे.

सासरी सगळे तिला जपतात त्यांच्याविरुद्ध जातांना,एकेकाला संपवतांना तिच्या मनाची होणारी तगमग आलियाने कसदार अभिनयातून व्यक्त केली आहे.

रजत कपूरने हिदायतची-सेहमतच्या वडिलांचा भूमिका उत्तम साकारली आहे.काळजाचा तुकडा शत्रुपक्षाकडे सोपवतांना वाटणारी काळजी चेहऱ्यावरील अभिनयात दिसते.सेहमत हिदायतची एकुलती एक मुलगी असते.सिनेमा सत्यकथेवर आधारित आहे.जे आपण पडद्यावर बघत आहोत ते कधीतरी घडले आहे…..हा विचार केला तर सेहमत,तिचे आई-वडील किती कठीण परिस्थितीतून गेले असतील याची कल्पना येते,

राझी-देशप्रेमावरील या सिनेमातील ऐ वतन आबाद रहे तू….गीत ऐकतांना अंगावर रोमांच उभे राहतात.

ऐ वतन, मेरे वतन

ऐ वतन, मेरे वतन
ऐ वतन आबाद रहे तू
आबाद रहे तू
आबाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू

मैं जहा रहू जहाँ में याद रहे तू
मैं जहा रहू जहाँ में याद रहे तू

ऐ वतन मेरे वतन
ऐ वतन मेरे वतन

तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से
तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से

पहुंचू मैं जहां भी
मेरी बुनियाद रहे तू
पहुंचू मैं जहां भी
मेरी बुनियाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहा रहू जहाँ में याद रहे तू
ऐ वतन मेरे वतन
ऐ वतन मेरे वतन

तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूं
तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूं

कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू

ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहा रहू जहाँ में याद रहे तू
ऐ वतन ऐ वतन
मेरे वतन मेरे वतन

आबाद रहे तू, आबाद रहे तू
ऐ वतन मेरे वतन
आबाद रहे तू.

माझ्या प्रिय देशा तू नेहमी सुखशांतीने समृद्ध रहा.जगात मी कुठेही गेलो तरी माझ्यासोबत रहा.माझे शेवटचे तुच आहेस.माझा पायाही तूच आहेस.
आणि माझी ओळखही केवळ तुझ्यामुळेच आहे.
तुझ्यावर कोणतेही मी येऊ देणार नाही. तुला आनंदी राहण्यासाठी वेळ पडली तहृ मी प्राणाचीही बाजी लावेन.

अतिशय अर्थपूर्ण देशभक्ती गीत गुलजारने लिहिले आणि स्वर दिले शंकर -एहसान-लाॕय यांनी.
हे गाणे दोन भागात आहे.सुनिधि चौहान आणि अर्जित सिंगचा आवाज आहे.

संपूर्ण सिनेमाचे सार,अर्थ या गीतात आहे.गाणे ऐकतांना आपले देशावरचे प्रेम द्विगुणीत होते.देशाचा अभिमान वाटतो.

….मेरे वतन प्यारे वतन….

पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छा.

 

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!