चंदा… प्रेमीजीवांचा जीवाभावाचा सखा,त्यांच्या प्रणयाचा साक्षीदार, त्याच्यासमोर त्यांनी घेतलेल्या आणाभाका,एकमेकांना प्रेमाच्या धुंदीत दिलेली वचने, दुरवर असलेल्या प्रेयसीला चंदासोबत प्रियकराने पाठवलेला निरोप, प्रियकराला प्रेयसीचे चंदासारखे दिसणे……सगळ्या प्रेमीजणांच्या गोष्टी चंदासोबत जुळलेल्या आहेत.
असा हा प्रणयकथेचा महानायक चंदा जमिनीवर अवतरला तर…
.अहाहा! किती रम्य कल्पना आहे ही.
जावेद अख्तरने ही कल्पना शब्दात उतरवली ,हरिहरन आणि साधनाने त्यांच्या कल्पनेला मधूर आवाजाचा साज चढवला.रहमानने संगीत दिल्यावर हे गाणे सदाबहार न बनते तरच नवल.
चंदापर्यत गाणे पोहचले असते तर तो नक्कीच जमिनीवर आला असता इतके अवीट हे गाणे आहे.
चंदा ने कधीतरी जमिनीवर यावे,नायकाशी गुजगोष्टी कराव्यात. त्याला जमिनीवर यायला लाज वाटत असेल तर काळे,काळे ढग चेहऱ्यावर पांघरुन ये.
(एखादी लाजाळू यौवनात असलेली तरुणी जशी प्रियकराला भेटायला जातांना लाजेने चेहरा झाकून घेते तसे)
चंदा रे चंदा रे
कभी तो ज़मीं पर आ
बैठेंगे, बातें करेंगे
तुझको आते इधर
लाज आये अगर
ओढ़ के आजा, तू बादल घने
गुलशन, गुलशन, वादी वादी,
बहती है रेशम जैसी हवा
जंगल जंगल, पर्वत, पर्वत,
हैं नींद में सब इक मेरे सिवा
चंदा, चंदा
आजा सपनों की नीली नदिया में नहायें
आजा ये तारे चुनके हम, घर बनाएं
इन धुँधली धुँधली राहों में, आ दोनों ही खो जाएं
फुलांनी डवरलेल्या बागेपासून तर उंच आभाळापर्यंत रेशमी हवा वाहत आहे.
मी सोडून सगळे जग निद्रेच्या आधीन झाले. तुझी वाट बघत मी जागा आहो.तू ये तुझे आभाळ सोडून जमिनीवर.स्वप्नाच्या निळ्या निळ्या नदीमध्ये.तुझ्या आजूबाजूला असलेल्या सुंदर चांदण्या घेऊन एक लेणी बनवू. आणि त्यात धूसर दिसणाऱ्या वाटेत हरवून जाऊ.
चंदा रे, चंदा रे
कभी तो ज़मीं पर आ
बैठेंगे बातें करेंगे
तुझको आते इधर
लाज आये अगर
ओढ़ के आजा तू बादल घने
चंदा से पूछेंगे हम, सारे सवाल निराले
झरने क्यों गाते हैं, पंछी क्यों मतवाले
हो, क्यों है सावन महीना घटाओं का
चंदा से पूछेंगे हम सारे सवाल निराले
चंदा, चंदा
तितली के पर क्यों इतने रंगीन होते हैं
जुगनू रातों में जागे, तो कब सोते हैं
चंदाला काही वेगळे प्रश्नही विचारायचे आहेत.
झरने का गातात?
पक्षी त्यांच्याच मस्तीत का उडत राहतात?
श्रावणातच पावसाच्या धारा का बरसतात?
फुलपाखराचे पंख इतके रंगबिरंगी कसे?
आणि रात्री चमचमणारे काजवे कधी झोपतात तरी कधी ?
चंदा जमिनीवर आला कि ह्या प्रश्नांचे गुढ विचारायचे आहे.
नाजूक शब्दांना सुरेल संगीताची जोड.प्रभूदेवाचे नृत्य आणि सोबतीला Expression Queen काजोल.
अहाहा! आभाळातील चंद्र खूप लांब असला तरी हे गाणे ऐकतांना तो खूपच जवळचा वाटतो.
प्रिती
शब्दपर्णवरील इतर गाण्यांचे रसग्रहण/निरुपण वाचण्यासाठी खालील लिंक नक्की बघा.
https://marathi.shabdaparna.in/गाणं
आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी शब्दपर्ण पेज जरुर follow करा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.











वाहवा
मस्त 👌🏻👌🏻
त्या गीता सारखं सौम्य शीतल रसग्रहण
सुंदर ..
Wahh