तोरा मन दर्पण-song review in marathi
तोरा मन दर्पण-song review in marathi

तोरा मन दर्पण-song review in marathi

मन….
आयुष्याचा प्रवासच मनापासून सुरु होतो आणि मनावर संपतो.
पण तरीही हरक्षणी मनावर प्रचंड संयम ठेवावा लागतो.
आपले मन आपल्याला ओळखते तेवढे कोणी ओळखू शकत नाही. मनाचा आरसा सच्चा असतो.

१९६५ साली आलेल्या ‘काजल’ सिनेमातील मीनाकुमारीवर चित्रित झालेले हे गाणे   साहिर लुधियानवी ने रचलेले हे भावपूर्ण भजन रवी यांनी संगीतबद्ध केले आणि आशा भोसलेने गायले आहे.
हे भजन दरबारी कानडा रागात आहे.

तोरा मन दर्पण कहलाये ॥
भले बुरे सारे कर्मों को, देखे और दिखाये
तोरा मन दर्पण कहलाये ॥

मन म्हणजे आपला आरसा. आपण केलेल्या सगळ्या चांगल्या,वाईट कर्माचे प्रतिबिंब ह्या आरशात दिसते.

मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोय॥
मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय,
इस उजले दर्पण पे प्राणी, धूल न जमने पाये,
तोरा मन दर्पण कहलाये॥

मनापेक्षा जगात कोणी मोठा नाही.मन हेच परमेश्वर आहे,
मन नितळ,निर्मल असेल असेल तर अवघे जग तुम्हाला स्वच्छ आणि प्रकाशमान भासेल.
ह्या मनाच्या धवल आरशावर आपल्या वाईट कर्माची धूळ जमू नये असाच आपला प्रयत्न असावा.

सुख की कलियाँ, दुख के कांटे, मन सबका आधार॥
मन से कोई बात छुपे ना, मन के नैन हज़ार ,
जग से चाहे भाग लो कोई, मन से भाग न पाये ,
तोरा मन दर्पण कहलाये॥

सुखाची सुखद फुले आणि दुःखाचे काटे,दुःखाची सल हे सगळे मनाच्या कुपीत दडून राहते.
मनापासून आपण कुठली गोष्ट लपवू शकतो? कुठलीही नाही.त्याला हजार डोळे आहेत. अवघ्या जगापासून लपवलेल्या गुपिताची मन सदैव आठवण करुन देणारच.
मनाला कोणी फसवू शकत नाही.

तन की दोलत,ढलती छाया मन का धन अनमोल॥
तन के कारण मन की धुन को मत मट्टी में रोल,
मन की कदर भूलने वाला हीरा जनम गवाए
तोरा मन दर्पण कहलाये॥

सुंदर रुप ल्यालेला देह किती दिवस ते रुप सांभाळू शकणार? वय वाढत जाईल तसतसे ते सौंदर्य लयाला जाणार.
देहावरच्या क्षणिक प्रेमापायी मन मलीन होऊ नये.
मनाचे मोल न जाणणारे आपले मौल्यवान जीवन व्यर्थ घालवतात.
मन….
आयुष्याचा प्रवासच मनापासून सुरु होतो आणि मनावर संपतो.
पण तरीही हरक्षणी मनावर प्रचंड संयम ठेवावा लागतो.
आपले मन आपल्याला ओळखते तेवढे कोणी ओळखू शकत नाही.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!