देखणा नट-रवींद्र महाजनी
मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत देखणा, अष्टपैलू अभिनेता रविंद्र महाजनी यांच्या
दुर्दैवी मृत्यू ची बातमी कानावर आली आणि
खेळ कुणाला दैवाचा कळला ..
हे त्यांच्यावर चित्रीत केलेले
देवता चित्रपटातील गाणे आठवले.
या गाण्यातील शब्द न शब्द त्यांना अगदी चपखल बसतो.
जीवन म्हणजे काय?जीवनाचा अर्थ काय?असे एक गुढ विचार करायला लावणारे …
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो,हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणी टाळला!
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला !
जवळ असुनही कसा दुरावा ?
भाव मनीचा कुणा कळावा ?
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
झैहार कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन मनांची
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला ?
बिकट परिस्थितीतून वर आलेल्या
रवींद्र महाजनीला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असल्याने त्यांनी तो राजहंस आणि जाणता अजाणता या नाटकातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.त्यानंतर त्यांना
१९७४ साली झुंज या मराठी चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली.झुंज हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट त्यांच्या या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश मिळवले.
देखणा चेहेरा, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि कसदार अभिनय यांच्या जोरावर रवींद्र महाजनी यांनी १९७५ ते १९९० या काळात मराठी चित्रपट सृष्टीवर स्वतःचा ठसा उमटवला.
मराठी सोबत त्यांनी गुजराती चित्रपटांतून सुध्दा अभिनय केला.
उषा नाईक, आशा काळे आणि रंजना देशमुख यांच्यासोबत जोडीने केलेले त्यांचे चित्रपट विशेष गाजले.मुंबई चा फौजदार हा हलकीफुलकी काॅमेडी असलेला चित्रपट या
रंजना आणि रवींद्र महाजनी यांच्या जोडीने अक्षरशः धमाल उडविली होती .
यातील..
हा सागरी किनारा ..
.आणि
सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी ..हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले.
गोंधळात गोंधळ मधील स्वप्नात साजना येशील का सांग ना ..
झुंज मधील निसर्ग राजा ऐक सांगते कुणी माझ्या मनात लपलय रे…
कोण होतीस तू काय झालीस तू…
राखणदारमधील ..
जाशील कोठे मुली तू,
हात दे मस्तधुंद साथ दे ..सारखी
कितीतरी सुंदर मनाला वेड लावणारी अर्थपूर्ण मराठी गाणी त्यांनी पडद्यावर साकारली आहेत. त्यांचे चित्रपट जेवढे यशस्वी असतं तेवढी गाणीही यशस्वी असतं आजही आपण रवींद्र महाजनी चे कुठलंही गाणं टिव्ही वर किंवा रेडिओ वर ऐकतो ,पाहतो तेव्हा निश्चित पणे गुणगुणायला लागतो.
आराम हराम आहे,देवता,कशाला उद्याची बात,लक्ष्मी,गोंधळात गोंधळ,
दुनिया करी सलाम,राखणदार,
लक्ष्मी ची पावले, कुंकू असे एकापेक्षा एक नावाजलेले त्यांचे चित्रपट आहेत.
मधाळ आवाज, अत्यंत देखणा चेहरा आणि भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेले मराठी चित्रपटसृष्टीतील चाॅकलेट हिरो म्हणून ओळखले जाणाऱ्या या देखण्या नायकाला हिंदी चित्रपटसृष्टीकडूनही बोलवणे आले होते.
रवींद्र महाजनी च्या अकस्मात आलेल्या मृत्यू च्या बातमीने अवघी मराठी चित्रपटसृष्टी हेलावून गेली आहे.
उतारवयात एकटेपणा लाभलेला हा कलाकार अनेक प्रश्न मागे ठेवून गेला.
असा उमदा कलाकार परत होणं शक्य नाही.
देखणेपणाला एकांतवासाचा शाप मिळालेल्या रवींद्र महाजनी ला आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली..
सौ.दर्शना भुरे हिंगोली….
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/











एकेकाळी मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या देखण्या नटास भावपूर्ण श्रद्धांजली
खूप छान…
खेळ कुणाला दैवाचा कळला
खुप छान शब्द सुमन श्रद्धांजली