अपराधी कोण?
भोसले सर आॕफिसमध्ये कामात व्यग्र होते.आॕफिसची वेळ संपली तरी भोसले सर आॕफिसमध्येच बसून होते.
सर,गेले नाही अजून घरी.
नाही नगराळे.
आज घरची मंडळी सगळी लग्नाला गेली.
उद्या येत आहेत.
घरी एकट्याला रिकामे घर खायला उठते. म्हणून आज उशिरा चाललो.तुम्ही जाऊ शकता नगराळे.
थाःबातो सर मीही जरावेळ असे म्हणत नगराळे भोसलेसरांसोबत बसले.
सर,मध्ये पिहू भेटली होती.
तुम्ही दोन दिवस सुट्टी घेतल्याचे माहीत नव्हते तिला.
मला बाहेरगावी काम होते.तिला माहीत नव्हते.
नगराळे तुम्ही माझ्यावर watch ठेवता?
नाही सर, सहजच विचारले.
चला निघू या नगराळे
चलासर,मी सोडतो तुम्हाला.
व्हा तुम्ही पुढे .येतोच मी.
नगराळे गाडीत भोसलेसरांची वाट बघत बसले.
चला नगराळे.
गाडीत बसत भोसले सर म्हणाले.
गाडी थोडी पुढे गेल्यावर नगराळेनी विचारले
मग किती खून केले सर आतापर्यंत?
नगराळे.
भोसलेसर जोरात ओरडले.
सर, मी तुमचाच शिष्य आहे. तपासाचे बारकावे मी तुमच्याकडूनच शिकलो.
अपराधी समोर असतांना मी ओळखणार नाही असे नाही होऊ शकणार.
याआधी तुम्ही कोणत्याही केसचा तपास या पद्धतीने केला नाही.
गरज नसतांना त्या मुलींच्या गावी गेलो आपण,.सुट्टीच्या दिवशी तुम्ही घरी नसणे या गोष्टींमुळे माझा संशय वाढत गेला. मी पाळत ठेवली तुमच्यावर.
भोसले सर शांत बसून होते.
भोसलेसरांचे घर आले.
सर उतरले.
सर काहीतरी मार्ग काढू आपण.
उद्या बोलू सविस्तर.
असे म्हणून नगराळे निघाले.
वाॕचमनला सर एकटेच आहे.जरा लक्ष ठेव असे सांगितले.
तिथून निघून पंधरा मिनीटे झाली तोच वाॕचमनचा फोन आला.
भोसलेसरांच्या घरुन फायरींगचा आवाज आल्याचे त्याने सांगितले.
नगराळे तसेच परतले. फ्लॕट उघडला.
सर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
बाजूलाच त्यांनी लिहिलेली चिठ्ठी होती.त्यांनी वाॕचमनला Ambulance ला फोन करायला सांगितला.
भोसलेंनी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन ओझरती नजर फिरवली.
आणि खिशात ठेवली.पोलीस आले .त्यांना भोसलेसर frustration साठी औषध घ्यायचे ती बाटली दिसली.
पत्रकारपरिषदेत नगराळेसरांची मिटींग सुरु होती.
त्यांनी पत्रकारांना सांगितले
प्रत्येक केस यशस्वीपणे सोडवणारे भोसले सर या केसमध्ये यश येत नव्हते म्हणून frusrate झाले होते.
त्या तणावातच त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या.
मिटींग संपली.
नगराळेनी खिशातून भोसलेसरांची चिठ्ठी काढली.
त्यात त्यांनी कसे ?कुठे ? का?
खून केले ते सविस्तर लिहिले होते.
पुढे त्यांनी लिहिले होते,
पुराव्याअभावी सुटलेले हैवान बघितले कि मी उद्विग्न होतो.
माझ्या मुलीची सुरक्षितता या गुन्हेगारांनी संपवली.
साधे,सरळ,सामान्य आयुष्य जगण्याचा तिचा हक्क या नराधमांनी संपवला.
मुलींना माणूस न समजता जनावर समजणाऱ्या रानटी लोकांना शिक्षा देण्याचा मी प्रयत्न केला.
मी केले ते बरोबर कि चूक ?
सध्यातरी याचे उत्तर मजजवळ नाही.
नगराळेनी चिठ्ठीला लायटरने पेटवले.
गुरुस्थानी असलेल्या भोसलेसरांची आणि वंदनिय असणाऱ्या डिपार्टमेंटची बदनामी त्यांनी टाळली.
खूनाचे सत्र आता थांबले.
पण खूनी कधीही सापडणार नव्हता……
समाप्त


