९-स्वप्न तहानलेले-त्या फुलांच्या गंधकोषी
९-स्वप्न तहानलेले-त्या फुलांच्या गंधकोषी

९-स्वप्न तहानलेले-त्या फुलांच्या गंधकोषी

९-स्वप्न तहानलेले-त्या फुलांच्या गंधकोषी

ज्योती रामटेके

माहेरी आलेली आनंदी गतस्मृतीत हरवली.आठवणी आठवता आठवता कनकच्या वाड्यात पोहचली. आता पुढे वाचा.

भाग ९

९-स्वप्न तहानलेले-त्या फुलांच्या गंधकोषी

अंधार पडला होता. आभाळात ढग दाटून आले. रिमझिम पाऊस सुरू झाला. घरी मुले वाट बघत होती. दादा, वहिनी काळजीत होते. आई.. किती वेळ केला ग? फोन पण नाही नेला बाबाचा फोन आला होता. घरी या म्हणत होते. आता आपली आठवण येत आहे त्यांना.
आंनदी. आभाळ भरुन आले म्हणून काळजी वाटत होती.
छान वाटले असेल नं नदीवर. आता बदल झाला ग. आता आधी सारखे प्रसन्न नाही वाटत तिकडे.

काळाच्या ओघात या गोष्टी होणारच.

हो दादा.. काळानुरूप बदल होणारच.
आता आपलेच घर बघ.. किती बदल केला तू.
दादा, तुझा जवळचा मित्र होता. काय नाव होते त्याचे? आठवले, सुयोग होते नं.कुठे असते तो.

सुयोग.. आजकाल तो एक वृध्दाश्रम चालवतो जवळच.निरजाचे आई, वडील तिथेच असतात.

का? त्यांचा तर मोठा बंगला होता. नौकर,चाकर होते.
दादा तू त्यांना घरी आणायचे होते.

यांनी आई, बाबाला आणण्याचा प्रयत्न केला,ते तयार नव्हते.

निरजा कसे झाले हे सर्व आंनदीला सांगत होती.

माझे माहेर कायमचे सुटले हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आले.

आंनदी एक दिवसाचे माहेर हवे ग. दादा, वहिनीने घर नावे करून त्यांना घरातून काढून दिले.

आनंदी,निरजाचे बोलणे सुरु असतांनाच धवलचा फोन आला.

आज घरी फोन राहिल्यामुळे बोलणे झाले नव्हते.

आंनदी फोन सोबत ठेवत जा.किती वेळा तुला फोन लावला.तुला येण्याबद्दल विचारायचे होते. मी येऊ का घ्यायला कि तू येणार? रिझर्व्हेशन करायला हवे आता.
बरेच दिवस झाले . तुम्हा सर्वांची आठवण येत आहे आता.

आंनदी हसायला लागली.

धवल आज फक्त पाच दिवस झाले.या वेळी मनसोक्त माहेरी रहा असे बजावले होते तुम्ही.विसरले कि काय?

हो,ग आंनदी पण आता खरेच नाही करमत आहे मला.लग्नानंतर प्रथमच एवढा दुरावा अनुभवत आहो
मी. पुरे झाले आता. ये लवकर

मुले इथे रमली. अजून चार..पाच दिवस थांबायचे म्हणत आहेत.दादाजवळ उद्या शेतीचा विषय काढते.सही झाली कि सांगते मी.

सांग लवकर.

धवलने फोन ठेवला.
तेवढ्यात दादाने जेवायला आवाज दिला.

आंनदी दीपा काय म्हणत होती?
तुला भेटून आंनद झाला असेल तिला.वाईट झाले तिचे. किती चांगली मुलगी,तिचे असे व्हावे वाईट वाटते ग.नियतीच्या मनात काय असते ते तिलाच माहीत.आंनदी तू खरी नशीबवान. धवलसारखा जोडीदार मिळाला.

दादा खरे आहे तुझे. लग्नानंतर धवलने समजून घेतले मला. तो शहरात राहणारा. मी छोट्या गावातून आलेली.

पण लग्नानंतर या गोष्टी आमच्या संसारात कधी आल्याच नाहीत. शेवटी काय प्रेमापुढे या सर्व गोष्टी नगन्य.
दादा उद्या वाड्यात जायचे आहे.दीपा येत आहे सोबत.

नक्की जा.कनक कुठे आहे ते विचार. बोल त्याच्या सोबत.
ये म्हणावे परत. वाडा वाट बघत आहे त्याची. आपल्या लहानपणीचे सुंदर क्षण त्या वाड्यात गेले.

आपल्या अडचणीच्या दिवसात सदैव वाड्यातील लोक आपल्या पाठीशी होते.आक्का सोडून.तिला तिच्या बरोबरीच्या लोकासोबत राहणे आवडायचे.कनकचे या उलट होते.कनकचे बाबा, काका नेहमी प्रेमाने वागायचे आपल्यासोबत.

खूप उपकार आहेत त्यांचे आपल्यावर. त्यांची परतफेड आपण नाही करु शकत. कनकला वाड्यात वापस आणले तर आपण त्यांच्या ॠणातून थोडे तरी मुक्त होवू.

आंनदीला झोप लागली नाही.दिवस उजाडला. दुपार झाली. दीपा तिला घेण्यासाठी आली.

दीपा, वाडयात जाणे नको वाटत आहे.तिथे पदोपदी कनकच्या आठवणी जाणवत राहणार.कनक वापस आला तरच माझ्या वाड्यात जाण्याचे सार्थक होईल.

आंनदी कनकला वापस आणण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्यात आहे. तुझ्या आवाजाने तो मागे वळून बघेल तरी. तू फक्त त्याला आवाज दे. तो नक्की परत येईल.

वाडा जवळ आला.चोहीकडे दाट घरे दिसत होती. वाडा मात्र पोरका एकाकी दिसत होता. वाड्यात पोहचल्यावर सदा काकाने भले मोठे फाटक उघडले.

सदा काका वाड्यातील इमानदार नौकर. अजूनही वाड्यात टिकून आहे सदा काका. खरेच काही लोकं खूप प्रामाणिक असतात.आंनदीला सदा काकाचे नवल वाटले.

कनकला खूप सांभाळायचे सदा काका.थकले आता. आंनदी आत आली. सदा काकाने बहुतेक ओळखले नाही वाटते मला.

काका ओळखले का मला? सदा काकाने निरखून बघितले.
आंनदी आहे नं तू.

काकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसू लागले.

आंनदी, तुला कसा विसरणार मी. दिवसभर वाड्यात कनकसोबत खेळायची.अंगाखांद्यावर खेळवले तुम्हाला. कनकला तर लेकरासारखे सांभाळले.आंनदी कनकला परत वाड्यात घेऊन ये

असे म्हणून सदा काका रडायला लागले.

मी त्याच्या येण्याची वाट बघत वाड्यात थांबून आहो.तो आला कि मी मोकळा. मुले रागावतात आता.आराम करा म्हणतात. माझा सारा जीव वाड्यात अडकून आहे. चला आतमध्ये. आराधनाताई आहेत आतमध्ये.फाटकावरच्या कमानीवर जाईचा वेल डोलत होता. भरगच्च शुभ्र कळयांनी वेल डवरली होती. उद्या या कळयांचे फुलात रुपांतर होणार. आपल्या आयुष्यात असे झाले असते तर?

आंनदी आणि दीपा एक..एक पायरी चढत आत गेल्या.
पायऱ्यांच्या बाजूलाच मंदिर होते.

दिपा तुला आठवते.इथे उभे राहून कनक गायचा.
हो ग.

त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का ?

दोघीही आत पोहचल्या.

सोफ्यावर आराधना एकटीच बसून होती. कमी वयात प्रौढ दिसत होती.हसरी, खेळकर , हसतमुख आराधना हीच का? असा प्रश्न पडावा इतपत बदल दिसत होता तिच्यात.आंनदी दिसताच तिला बिलगून रडू लागली.

कुठे होती तू इतके दिवस? आंनदी तू गेल्यावर वाडा बघ कसा भग्न झाला. तुझे लग्न झाले आणि वाड्याला दृष्ट लागली. कनकने वाडा सोडला आणि सर्व संपले. मनातले सांगायला सुध्दा कुणी उरले नाही. तू कनकला वाड्यात परत घेऊन ये आंनदी.आराधनाच्या डोळ्यात तिच्याबद्दलचा  विश्वास दिसला… 

Next Paret Link

https://marathi.shabdaparna.in/१०-स्वप्न

Previous Link

https://marathi.shabdaparna.in/८-स्वप्न-तहानलेले

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!