केवडा धुंद झाला-मराठी प्रेमकथा
रीमाला आज जरा घरून निघायला वेळच झाला.आज बाई पण आली नाही. रोहीतने कामात मदत केली आज.
अरे रोहीत चल लवकर…आॕफीसला सोडून दे मला.आज लवकर जायचे होते .उद्या नवीन बाॕस येणार आहे नं
माहित नाही येणारा बाॕस कसा असेल?हा जुना तर फारच विचित्र होता .सर्व त्याला कंटाळून गेले होते .आणि महत्त्वाचे म्हणजे त्याची भिरभिरणारी नजर .मला तर फारच राग येत होता पण काय करणार.? मी तर कामाशी काम ठेवायची.
अरे पण ती रोजी आहे नं…ती खूपच समोर …समोर करते.मला तर खूप हसायला येते तिचे .काम असो नसो तिचे सारखे सर…सर … सुरू असते.अरे रोहीत गाडीला काय झाले? खूपच हळु चालत आहे. रोहीत जोरात हसला
अग रीमा किती घाई .. जरा शांत रहा.मी वेळेवर पोहचवतो तुला.तसे बघायला गेले तर आपली गाडी जरा जुनीच आहे…आता बघ काही दिवसात आपल्या दारात नवीन गाडी येईल माझ प्रमोशन आहे नं ..मग बघ मी तुझ्यासाठी काय ..काय करतो तर.रीमाला धस्स झाले .रौनकही अशाच गोष्टी करायचा.अशीच मोठी …मोठी स्वप्न होती त्याची.आकाशाला गवसणी घालायची असे म्हणतात…तसेच तो स्वप्ने बघायचा.
स्वप्न ही बघायची असतात…आणि आपल्या परीने त्यात सुंदर रंग भरायचे असतात.पण रौनक मोठे स्वप्न बघता…बघता स्वतःच हरवून गेला.
उतरा मॕडम…आॕफीस आले तुमचे.आवाजाने रीमा भानावर आली.आज इतक्या दिवसांनी रौनक का आठवावा? पहिले प्रेम आयुष्यात नसेल विसरता येत का?
आज आॕफीस मध्ये भरपूर कामे होती.रीमाने पटपट कामे आटोपली आणि घराकडे निघाली तेवढ्यात रोजीने आवाज दिला…रीमा मॕडम उद्या नवीन बाॕस येणार आहे बर आणि वेगळीच हसली.काहीतरी बोलून….हसून रोजी कस आपल मन रमवते हे पण एक कोडेच आहे.रीमा हसली आणि घराकडे निघाली.रोहीत आला असेल घरी.
वाट बघत असेल आपली.खरच असा नवरा मिळायला भाग्य लागते.किती समजदार.. प्रेमळ आहे रोहीत.आपल्यावर किती जीवआहे त्याचा हे रीमाला माहिती होते.लग्नाला तीन वर्षे झाली होती.
तसे बघितले तर तिला नोकरीची गरज नव्हती.सर्व छान सुरू होते.रोहीत गमतीने म्हणायचा रीमा सोड..ना ती नोकरी आता जरा मुलांच बघू .तीन वर्षे झाली लग्नाला.
रीमा हसायची.हो..रे ..राजा खरे आहे तुझे.करू दे ना काही दिवस नोकरी.वेळ छान जातो. घरात हातभार लागतो .तुला एक सांगू का ज्या दिवशी तुझे प्रमोशन होईल नं तो दिवस माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस राहिल.नंतर फक्त तू आणि तूच.विचारांच्या धुंदीमध्ये घर कधी आले कळलेच नाही रीमाला.रोहीत आला होता.गॕसवर छान वाफाळलेला चहा सुरू होता.रोहीत छान गाणे ऐकत होता.दोंघाच्या आवडीचे..
किती काळजी घेतो नं रोहीत माझी.माझ्या मनातील प्रत्येक सुर तो ओळखतो.देवा माझ सौख्य असेच राहू दे.कुणाची नजर नं लागो माझ्या संसाराला.
रीमा आज तू खूप दमली.बाहेर जायचे का जेवायला? रोहीतने विचारले.रीमा लगेच तयार झाली.
रीमाने छान तयारी केली.खूप दिवसांनी दोघे निवांत बाहेर पडले होते.आजकाल वेळच नाही दोघांना.छान चांदणे पडले आहे बाहेर.रोहीतला चांदण्यारात्री फिरायला खूप आवडते.
चला राणीसरकार ..रोहीतने आवाज दिला.दोघेही जेवायला बसले.जेवण झाल्यावर छान फिरू आपण .
उद्या सुट्टी घेते का रीमा रोहीतने विचारले.
अरे …पण कशासाठी सांग ना..घेतली असती पण उद्या नवीन बाॕस येणार आहे नं.
बर…बाई ठिक आहे असे म्हणून रोहीत हसला. छान चांदणी रात्र होती .मंद प्रकाशात रीमा अजूनच सुंदर दिसत होती.केसात छान जाईचा गजरा माळला होता.रोहीतला फुलांची खूप आवड.स्वतःच्या हाताने रीमाच्या केसात गजरा माळायला त्याला खूप आवडायचे.फुलांचा छान सुगंध दरवळत होता.अचानक रीमाची नजर दूरवर गेली.कोणीतरी तिच्या कडे रोखून बघत होते …एकसारखे
कोण असेल?
इतक्या लांबूनही ते डोळे ओळखीचे वाटत होते.
खूपदा बघितल्यासारखे.
रौनक….हो..हो..हे तर रौनकचे डोळे.स्वप्नांनी भरलेले.कधीकाळी त्या डोळ्यांत अंथाग डुबून जायची मी.
पण रौनक तर परदेशात आहे ..कसे शक्य आहे.
रीमा…रीमा ..रोहीतच्या आवाजाने ती भानावर आली.
रीमा..बघ तो चंद्र किती सुंदर दिसत आहे.
.पण रीमाचे सारे लक्ष त्या डोळ्यांकडे जात होते.दोघे घरी आली.त्या रात्री तिला झोप आली नाही.
सकाळी उठून पुन्हा आॕफीस.तीच रोजची घाईगडबड
रोहीतने सोडून दिले.रोजी दारातच होती.रीमा मॕडम..नवीन बाॕस आले बर…खूपच ..हॕन्डसम आहेत नवीन बाॕस.काय म्हणावे या रोजीला.रीमा पुटपुटली
किती दुःख आहेत रोजीच्या आयुष्यात तरी पण हसत राहते आणि हसविते.
रीमा मॕडम ..बाॕसनी तुम्हाला बोलावले आहे.
रीमा घाईतच गेली.हळूच केबिनचे दार लोटले..आत येऊ का सर असे विचारणार तेवढयात…तिला बाॕसच्या रूपात रौनक दिसला…
ये…रीमा बस.मला बघून आश्चर्य वाटले असेल तुला , पण खरे सांगू का , मी फक्त तुझ्यासाठी वापस आलो ग.
तिथे अमाप पैसा ..प्रतिष्ठा कमावली पण आता ते सर्व नको वाटत आहे मला.स्वप्नांच्या मागे इतका धावलो कि सारे काही गमावून बसलो.आपल्या प्रेमाची सुध्दा मी किंमत केली नाही.लग्नासाठी तू थांबून आहे हे पण विसरलो.
रीमाच्या फक्त बघत होती .रौनक तू खूप उशीरा आला ..माझे लग्न होऊन तीन वर्षे झाली आता.खूप सुखात आहे मी.तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार असे मला वाटायचे पण माहिती आहे ते साफ खोटे ठरले.रोहीतच्या प्रेमात मी सर्व विसरले.
रीमा मला सर्व माहिती आहे.मी मुद्दामच तुझ्यासाठी इथे आलो.अग होऊ दे नं लग्न मला काही फरक पडत नाही
आपण पूर्वीसारखेच राहायला काय हरकत आहे.
रौनक रीमा जोरात ओरडली…तू खरच खूप स्वार्थी आहेस.अरे मित्र बनून आला असता तर मी तुला माफ केले असते…पण प्रियकराच्या रूपात ..लाज वाटत आहे मला तुझी.खरे प्रेम तुला कधी कळलेच नाही.माझ सर्वस्व फक्त आणि फक्त रोहीत आहे.या नंतर मला भेटण्याचा प्रयत्न करू नको.मी ही नोकरी सोडत आहे.
रीमा घरी पोहचली.नेहमीप्रमाणे रोहीत तिच्या आधीच आलेला.तेच गाणे ..तिच्या आवडीचे…गॕसवर वाफाळलेला मस्त चहा सुरू होता.टेबलावर जाईचा गजरा पडून होता.घरात तिच्या आवडीचे निशीगधांचे फुले ठेऊन होती ..पूर्ण घरात सुंगध दरवळत होता .
अरे…पण रोहीत कुठे आहे ?ती रोहीतला शोधू लागली.
रोहीत मागेच उभा होता.
रीमा…रीमा माझे प्रमोशन झाले.रोहीत आंनदाने ओरडत होता.दोन दिवसात आपल्याला हे शहर सोडून गोव्याला जायचे आहे.रीमाने रोहनचे हात हातात घेतले.
बेभान वारा सुटला होता.रोहीतने हळूच केसात गजरा माळला.आवडीचे सुर सुरू होते
गंध दिवाणा …स्पर्श पाहुणा
हवा कशाला नवा बहाणा
नजरेमधूनी कळले काही
तू असण्याचा धुंद केवडा
तू नसतांना दिवस बापुडा
शब्दपर्णच्या इतर प्रेमकथा वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
ज्योती रामटेके










उत्कृष्ठ
वाह kitti सुंदर