movie review in marathi-झुंड
गंजेडी झुंड-एक शिक्षक
झुंड नही टीम -दुसरे शिक्षक
झुंड मधील हा डायलाॕग दृष्टीकोनातील फरक दाखवतो.
मध्यमवर्ग,कनिष्ठ मध्यमवर्ग यांच्या पलिकडे किंवा यांच्या व्यतिरिक्त दुसरे जग आहे.जे खूप वेगळे,वेदनादायी,ध्येयहीन आहे. झुंड सिनेमात नागराज मंजुळेने ते जग दाखवले.
एका काॕलेजमध्ये क्रीडा शिक्षक असलेले विजय बोरसे आणि काॕलेजच्या बाजूला असलेली झोपडपट्टी,मध्ये केवळ एका भिंतीचे अंतर.(ही भिंत सिनेमाचा फार मोठा घटक आहे.)
भिंतीच्या अलिकडे एक जग आणि पलीकडे दुसरे जग आहे.
दोन्हीही जगात असलेली दरी, भिंतीपलीकडील मुलांमध्ये असलेले पण सिद्ध होऊ न शकणारे टॕलेंट.
त्यांच्या टॕलेंटपर्यत पोहचण्यात कुणालाही नसलेला रस, तिथे असलेली गरीबी,एकेक दिवस घालवत संपणारे आयुष्य ,समोर काहीच ध्येय नसल्यामुळे नशाधीन झालेली मुले.
भिंतीअलीकडील जगासाठी ती मुले ,तिथे राहणारा समाज म्हणजे केवळ झुंड.
कथेची सुरुवात झोपडपट्टीतील मुलांच्या जगण्यापासून होते.
कोणी गांजा ओढते,कोणी दारु पिते तर कोणी विकते,काही मुलांची झुंड सकाळीच बाईकवर बसून चोऱ्या करते.कोणी जुगार खेळते.
नागपूरच्या विजय बोरसे सरांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे.
सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर पोहचलेले,मुलांमधील टॕलेंट टिपणारे बोरसे सर नागपूरच्या गड्डीगोदाममधील मुलांना पावसात डब्ब्यासोबत पायांनी खेळतांना बघतात आणि त्यांच्यातील नैपुण्य बघून त्यांना फुटबाॕल शिकवायचे ठरवतात.त्यासाठी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करतात.पत्नीची खंबीर साथ मिळते.
सकाळपासून गांजा,दारु,जुगार याच्या जाळ्यात अडकलेली ही मुले पैसे देवून खेळायला तर तयार होतात पण त्यांची व्यसने , परिस्थितीने आलेला बेदरकारपणा त्यावर मात करत राहतो.
पुढे ध्येय समोर आल्याने मुले सुधरतात.फुटबाॕलचे रोज ट्रेनिंग घेणाऱ्या भिंतीपलीकडील मुलांना हरवतात.त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. आणि सुरु होतो उंच जाण्याचा प्रवास.गंजेडी झुंडला बोरसे सर नॕशनल फुटबाॕल टीम बनवतात.
संपूर्ण भारतातील झोपडपट्ट्यांमध्ये टुर्नांमेंट होतात.कित्येक मुलांचे नैपुण्य त्यामुळे पुढे येते.त्यातून बोरसे सर संघ बनवतात आणि आणि खेळाडूंना घेऊन आकाशाला गवसणी घालण्यासाठी पुढे निघतात.मुले आकाशात विमानात बसून उंच उडत असतात आणि खाली समाजाला विभागणारी भिंत आहे.
इथे सिनेमाचा शेवट होतो.
पण आपल्याला विचार करण्याला प्रवृत्त करुन.
फक्त टॕलेंट असून उपयोग नाही.ते सिद्ध होण्यासाठी संधीची गरज असते. संधी मिळाली की जिद्द निर्माण होते.माणूस संघर्ष करायला तयार होतो.
त्यासाठी विजय बोरसेसारखे देवमाणसं समाजात असणे आवश्यक आहे.बोरसेसरांनी भिंत ओलांडली म्हणून झोपडापट्टीतील मुलांच्या डोळ्यात स्वप्न फुलली,जिंकण्याची आस निर्माण झाली.आधीच्या कित्येक पिढ्या तिथे तशाच संधी वीणा जगल्या.
बाकी मुलांसारखीच ती मुलेही आपल्याच देशाचे भविष्य आहेत. त्यांना कितीही नाकारले तरी समाजाचा ती हिस्सा आहेतच.
केवळ झोपडपट्टीत राहतात म्हणून त्यांनी स्वप्न बघू नये का हा खरा प्रश्न आहे.
काॕलेजचा वाॕचमन फुटबाॕल खेळतो तेव्हा क्रीडा शिक्षक येऊन त्याला दम देतो आणि बाॕल घेऊन जातो.हा सिनेमातील प्रसंग खूप काही सांगून जातो.
असे बरेच प्रसंग चाकोरीबाहेरील विचार करणाऱ्या नागराज मंजूळेने सिनेमात टाकून प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडले आहे.
डाॕन उर्फ अंकुश अगदीच वाया गेलेला तरुण तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतो.
बाबु,छोटू,मोनिका,रजिया, विशाखा,एंजेल… यांच्या व्यक्ती रेखा अभिनयाचे शिक्षण न घेतलेल्या कलाकारांनी अफलातून वठवल्या आहेत. बरेचसे कलाकार झोपडपट्टीतील आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन आणि कॕमेरा वर्क अत्युत्कृष्ट आहे.
फुटबाॕलची पहिली मॕच बघतांना ह्दयाच्या ठोक्यांची गती वाढत जाते.
डाॕन आणि सभ्यामधील भांडणात खूपउत्सुकता निर्माण होते.
असाच एअरपोर्टवरील डाॕनची चेकींग करतांनाचा प्रसंग बघतांना ‘ दिलकी धडकने ‘तेज होतात.
नवीन कलाकारांकडून अभिनय करुन घेणे हेही नागराज मंजुळेचे हेही एक कसब आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय अस्सल आहे.
अमिताभ सारखा मोठा कलाकार असूनही प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहते.
कॕमेरा वेगवान पळतो.अक्षरशः भिंतीपलीकडील आयुष्य समोर येते.
तेथिल उकिरडे,गटार,कचरा,लहान वयात व्यसनाच्या आहारी गेलेली मुले,गरीबी,लाचारी सगळेच.
भारत का मतलब…छोटया कार्तिकच्या या प्रश्नात भिंतीपलीकडील वास्तव अधोरेखित होते.
सिनेमातील अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सिनेमात बघतांना कथेचाच हिस्सा वाटतात इतकी चपखल बसली आहेत.
गाण्यांच्या काही अर्थपूर्ण ओळी….
१-आया रे झुंड है
किस्मत के मारों का
दस में से चारों का
जलाते अंगारों का झुंड है
हम को दुनिया ने
रोज देखा है
फिर भी अनदेखा झुंड है
हम ना जिंदा थे
हम ना मरते है
लोग कहते है झुंड है
२-बादलसे दोस्ती
अंधी बहरी सी गलियो में
तू क्यू गुमनाम हैं
इनके बाहर जो दुनिया हैं
तेरा आयाम हैं
३-लात मार
तू ग़रीब है तो लोग सोचतें हैं
तेरी क्या औक़ात है?
वो जानते नहीं नसीब ने तुझे भी
दे रखी सौग़ात है
हरा दे, हरा दे जो तुझे
किसी में दम नहीं
किसी में दम नहीं
बता दे तू भी किसी से कम नहीं
४-लफडा झाला
भिड़े कोई हमसे अगर
खड़े खड़े वहीं गाड़ दे
छोड़े नहीं कुछ भी कसर
पूरा हुलिया बिगाड़ दे
सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाने अनेक प्रश्न मांडले आहेत.
त्यातील मुख्य प्रश्न आहे,भिंतीपलीकडील समाजाने स्वप्न पाहावे का? वर्षानुवर्षे एकाच साच्यात जगणाऱ्या त्यांना समाजाने मदत करावी कि झुंड संबोधून त्यांना दूर लोटावे,स्वतःच्या प्रवाहात त्यांना आणावे कि वो नही सुधरनेवाले असे म्हणून सामाजिक जबाबदारी झटकावी…
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
दर्जेदार साहित्य लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी
खालील लिंक जरुर बघा.
Link
Email











सुंदर
उत्कृष्ट रसग्रहण,
छान लिखाण