१९६७ साली आलेला बूँद जो बन गयी मोती सिनेमातील हे निसर्गाला समर्पित केलेले गीत.संगीत सतीश भाटिया यांचे, गाण्याचे मोहक बोल भरत व्यास यांचे आणि गीत गायले आहे मुकेश यांनी.
आपल्या धरतीला एवढं सुंदर रुपडं कोणी दिले?
कोणी रंगविले तिला अशा विविध रंगांनी?
प्रत्येक ऋतुमध्ये तिला वेगळे रुप बहाल करणारा चित्रकार कोण आहे?
सर्वांना कलाकारीने प्रसन्न करण्याची किमया कुणाला साधली आहे?
खरेच,धरेचे सौंदर्य बघून अचंबित व्हायला होते.
हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन
के जिसपे बादलों की पालकी उड़ा रहा पवन
दिशायें देखो रंगभरी, चमक रही उमंगभरी
ये किसने फूल फूल पे किया सिंगार है
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार
ये कौन चित्रकार है…
हिरवी धरा आणि तिच्या वर पसरलेले निळे निळे नभ,
वारा ढगांंची पालकी बनवून पुढे पुढे जात आहे,प्रत्येक दिशा रंगाने उजळली आहे.आशेची किरणे सर्वदूर पसरली आहेत, फुले उमलली आहेत.पण हे काय? प्रत्येक फुल वेगळा साज ल्याला आहे.प्रत्येकावर असलेली नक्षी वेगळी आहे.
धरतीला नटवणारा हा चित्रकार आहे तरी कोण?
तपस्वीयों सी हैं अटल ये पर्वतों की चोटियाँ
ये सर्प सी घूमेरदार, घेरदार घाटियाँ
ध्वजा से ये खड़े हुये हैं वृक्ष देवदार के
गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के
ये किस कवि की कल्पना का चमत्कार है
ये कौन चित्रकार हैं…
तप करतांना तपस्वी अटल असतात तशीच ही पर्वतशिखरे अटल,अचल आहेत.देवदार वृक्ष ध्वजासारखे ताठ उभे आहेत. गुलाबाचे गालिचे धरेवर अंथरले आहेत.
बागांमध्ये फुलांचा बहर आहे.
कोण कलाकार आहे हा?
एखाद्या कवीच्या कल्पनेतील जादू तर नाही ही?
कवीची कल्पना प्रत्यक्षात उतरवणारा कोण आहे हा चित्रकार?
कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो
इसके गुणों को अपने मन में तुम उतार लो
चमका लो आज लालिमा, अपने ललाट की
कण-कण से झाँकती तुम्हें, छबि विराट की
अपनी तो आँख एक है, उसकी हज़ार है
ये कौन है…चित्रकार है
निसर्गाची निर्मळता,पवित्रता आपण घेतली तर आपलाही आत्मिक विकास व्हायला वेळ लागणार नाही.भव्य निसर्गाकडून प्रेरणा घेऊ शकतो. आपल्याजवळ निसर्गाकडे बघण्याची एकच नजर आहे पण तो जादूगर निसर्ग अनंत नजरेने सर्वत्र न्याहळत असतो. त्याची भव्यता आपला क्षण नी क्षण टिपतो.











Wahh 🌹🌹🌹