राम मनामनातला
वैशाली जोशी खोडवे
रामायण किंवा रामचरित्र हे आपणा सर्वच भारतीयांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. खरेतर असा कोण भारतीय आहे की ज्याला रामायण माहीत नाही? तरी ही कोणतीही रामकथा समोर आली की आपण त्यात गुंतून पडतोच. मग ती कथा कोणत्याही रूपात समोर येवो, जसे गाणे, गोष्ट, serial इत्यादी.. ग.दि मां च्या गीतरामायणाने आणि दुरदर्शन च्या रामायण serial ने घडवलेला इतिहास तर आपल्याला माहितच आहे.
त्या पंक्तीतलेच हे ही एक गाणे
ग.दि.मां लिखीत, आशाताईंनी गायलेले तोडी रागावर बेतलेले एक छानसे गाणे.
प्रसंग अगदी छोटासाच आणि माहितीतलाच. पण ग.दि.मां नी खूप कलात्मकतने मांडला आहे. मला जे जाणवले त्या दोन गोष्टी. एक ह्यातील repeat होणाऱ्या ओळी. साधारणपणे धृवपद वारंवार येते. इथे तसे नाही. बहूतेक सर्वच ओळींची पुनरुक्ती झालेली दिसते. असे का असेल हा विचार मनात आला.मला वाटते ह्या पूनरूक्तीतून शबरीची आर्तता, रामा प्रती असलेली भक्ती जाणवते. आपण कसे आपल्या आवडत्या व्यक्तिमत्त्वाला अचानक भेटलो तर भांबावून जातो, प्रभावित होऊन कायबोलावे ते सुचत नाही, तसेच काहीशी मनस्थितीती शबरीची दाखवायची आहे, म्हणून तशी काव्यरचना ग.दि.मां नी केली असावी.
दुसरे म्हणजे ग.दि मा. हे भाषाप्रभू म्हणून सर्वज्ञात आहेत. गीत रामायणातील त्यांची शब्द रचना थक्क करणारी आहे. पण ईथे मात्र अगदी साधे सोपे नेहमीच्या वापरातले शब्द वापरले आहेत. ह्याचे कारण मला असे वाटते की ही विनवणी शबरी करते, अगदी साधी कष्टकरी, जंगलात रहाणारी, मग तिची भाषा उच्च कोटीतली कशी असेल? आणि तिच्या भाषेपेक्षा महत्त्वाची आहे ती तिची उत्कट भावना. म्हणूनच शब्दांची योजना ही अगदी काळजीपूर्वक केलेली दिसते. आपले भाषाप्रभुत्व महत्त्वाचे नाही. महत्त्वपूर्ण आहे ती शबरीची भावना. हे तारतम्य त्यांने कौशल्याने सांभाळले आहे.
बाकी गाण्याचा अर्थ स्पष्ट करून सांगावा ईतके ते अवघड नाहीच मुळी.
उर्दूत गझल शब्दाचा अर्थ.. हरीण ज्यावेळेस वाघांच्या तावडीत सापडते, त्यावेळेस त्याने फोडलेली प्राणांतिक किंकाळी असा आहे. म्हणून भक्ताने अथवा प्रियकराने केलेली आर्त आळवणी ह्याला ही गझल असे म्हणतात.
सहज वाटले की ही तर शबरीची गझल च आहे. अर्थात, हा माझा विचार. पण खरेच रामायण हे असा कोणताही विचार न करता लहान मुलां सारखे त्यात गुंतून पडणेच योग्य.
जय श्रीराम.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/










खुप छान
जय श्रीराम
धन्यवाद
Wah
खुप छान विवेचन👌
धन्यवाद
खुप छान विवेचन👌
अविस्मरणीय