Haath aaya hai jabse-song review in marathi
Haath aaya hai jabse-song review in marathi

Haath aaya hai jabse-song review in marathi

काही हिऱ्यांची पारख करायला जोहरी कमी पडतात तसे काही गाण्यांचे आणि सिनेमाचे झाले आहे.
काही सुमार दर्जाची गाणी आपण डोक्यावर घेतली आहेत तर काही दर्जेदार गाण्यांकडे दुर्लक्ष करुन त्याला विस्मृतीत ढकलले आहे.
१९६८ साली आलेला  दिल और मोहब्बत सिनेमा पडला आणि त्यातील प्रणयरम्य गाणे ‘हाथ आया है ‘ लोकं विसरली.

गीतकार शेवान रिज़वी, आशा भोसले – महेंद्र कपूर गायलेले हे सुंदर गाणे १९६८ साली आलेल्या दिल और मोहब्बत सिनेमातील आहे. संगीत ओ. पी. नय्यर यांचे.

समुद्राच्या फेसाळत्या चंदेरी लाटा उसळताहेत.
समुद्रकिनारी दोघेच राजेश(जाॕय मुखर्जी) अनुराधा(शर्मिला टैगोर)

अनुराधा गात आहे. समुद्राच्या लाटा तिला ओले करत आहेत. ती नायकाला त्याने तिचे आयुष्य कसे बदलवले ते सांगत आहे.
त्याच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्या मखमली झालेल्या,प्रेमाच्या नवीन रंगात न्हालेल्या भावना तिला दूर प्रेमाच्या जगात असल्याचा भास देत आहेत.
तिच्या नजरेत चोरुन प्रवेश केलेला तो कधी ह्दयात विराजमान झाला कळले सुद्धा नाही.
तो आता केवळ तिचा सखा नाही.तिची सावली बनला.
तो आणि ती आता वेगळे नाहीत.पण आता कोणी तिला दोषी ठरवले तर त्याने पाऊल मागे घेऊ नये.अशी विनवणी त्याला करत आहे.
चांदण्या आभाळभर पसरल्या असतील पण सखाच जवळ नसेल तर ती चांदरातही काय कामाची?

 

हाथ आया है जबसे तेरा हाथ में
आ गया है नया रंग जज़बात में
मैं कहाँ हूँ मुझे ये खबर ही नहीं
तेरे कदमों पे ही गिर न जाऊँ कहीं
हाथ आया है …

दिल में नज़रों से छुप-छुपके आया है तू
दिल चुराकर मेरा मुस्कुराया है तू
तू कहे तो …
तू कहे तो एक बात तुझसे कहून
मेरा साथी नहिं बलकी साया है तू

उंगलियाँ जब ज़माने की मुझपर उठें
खो न जाना कहीं ऐसे हालात में
रोशनी ज़िंदगी में मोहब्बत से है
वरना रखा है क्या चाँदनी रात में
हाथ आया है …

दिल के जज़बात को मैं न ठुकराऊँगा

बलकी तसवीर-ए-जज़बात बन जाऊँगा

हक़ मोहब्बत का … हक़ मोहब्बत का होता है कैसे अदा

वक़्त आया तो मैं ये भी दिखलाऊँगा

नायक- मी तुझ्या भावना पायदळी कशा तुडवणार?

तुझ्या नजरेत माझे जे प्रतिबिंब आहे मी तसाच बनवून दाखवेन.वेळ आली तर प्रेम काय असते हे अवघ्या जगाला दाखवून देईल.

प्यार के देवता के कदम चूमकर
ज़िंदगी नज़र कर दूँगी सौग़ात में
अब न घबराओ मंज़िल की दूरी से तुम
तुम अकेले नहीं मैं भी हूँ साथ में
हाथ आया है …

हे प्रितीच्या देवता तुला चरणस्पर्श करुन माझे संपूर्ण जीवन तुझ्यासाठी समर्पित करायला तयार आहे.
आता घाबरु नकोस.तू एकटा नाही आहेस.जीवनात कितीही खाचखळगे आले तरी मी तुझी सोबत सोडणार नाही. …..

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!