आर्त हाक वृक्षाची-लेख
काल रात्री माझ्या स्वप्नात अंगणातले लिंबाचे झाड आले.
म्हणाले …
ताई ..तु मला कुठे तरी लपवून टाक …..किंवा …. धरणी माते ला सांग ,,, मज कुशीत घ्यावे.खुशाल धराशायी होईन मी . पण असे संपले नको ग.
काल माझे पालक गेले ….वृक्ष तोडीत…रस्ता रूंदीकरण मोहिमेत…आज माझा ग नंबर …किती निर्दयी पणे ही मोहिम राबवली जात आहे.. रसत्या कडे ची वस्ती अनाथ होती आहे …मला कीव आली कालं ..सावलीत माझ्या ,,अजिविके साठी दुकान थाटलेल्या भाजी वाल्याची ,,जो हऴहऴत होता ..मुलीचा लग्नासाठी थोडे दिवसांची मुभा मागत होता …पण तो निगरगट्ट . साहेब ….त्या कडे हि लाच मागत होता…..दगडाची का झाली हि माणसे ….निसर्गा चा उद्वेग हि ह्यांना दिसेनासा झालायं….मला आठवतय, माझ रोपण करताना आजोबा चे ते उदगार ……आज होणार आहेस तु माझा दारातला.
माझे नातु पंणतु तुझ्या सावलीत हुंदडतील,बागडतील ,मोठे होतील रे भराभर वाढं ….तुझी निगा राखीण मी … तुझी ,काळजी घेईन.
दादा म्हणाले होते
बाबा ,आधी ची दोन काय कमी आहे ..अहो काही दिवसां नी प्रगति चा नावावर हे शहर इथवर येणार…मगं ………..
आजोबा म्हणाले होते .
.अरे हा निसर्ग ..कितीउपकृत करतो आपणास,हि प्रकृति ..कित्ती देतेआपल्या ला .. आपले ही काही कर्तव्य आहेत च की , आपण हि देण लागतोच कि तिच…झाड लावणे .संगोपित करने …आपल्या जीवना च आर्द्य कर्तव्य आहे ….प्रत्येका ने जमेल तशी झाले लावावी नी वाढवावी ….जो झाडे लावतो तो निसर्गाचा नी पुढचा पीढी चा विचार करतो ……
ताई ,,आजोबा प्रमाणे माणसे का वागत नाही ,झाडांची अशी कत्तल अशी नासधुस बरोबर आहे का ….माझ एक ठीक आहे …मी जगलो माझ आयुष्य …पण पुढे ….केले जाईल मुबलक वृक्षारोपण … लावली जातील झाडे,लावली जरी,तरी त्यांचा संगोपनाच कायं ,राखली जाईल निगा .घेतली जाईल तसदी हिरवळ बळावण्या साठी …
काय होऊन बसले आहे.ऋतुचक्र च पालटले आहे.बिनसलय सर्वाथाने. मौसमी वारे बदलले,पाऊस हरवलायं .
कशी बहरेल वनराई …कसा दरवळेल निसर्ग ….कसा जगेल माणुस …आणी मग ….मग ह्या प्रगतिचा काय उपयोग होईल ताई ….विकट प्रसंग आहे हां …..सर्वतोपरी विचाराघीन आहे सार,,, सार…शिगे ला पोचलयं …..वाट मागे फिरवावीच वागेल …..कारण मागे परतताना माणुस तिथ वरच येतो जेथुन सुरवात केली होती ….. निदान परतीच्या प्रवासात तरी विचारपूर्वक मार्ग क्रमण केले जाइल ,अशी आशा बाळगु …..नव्या च्या पेरणीत जुन्या ची धुईधान नको हि खबरदारी घेतल्या जाईल
.आशातीत भविष्य…
.@$
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










खूपच छान 👌👌
फारच सुंदर
Apratim…khupach marmite aahe…😍😍😀
Thanku everyone