आनंद
आनंदाचे झाड असतंच आपल्या डोक्यावर फक्त ते दिसत नसतं जगाच्या रहाटगाडग्यात आपण पुरते विसरून जातो त्या झाडाच्या सावलीचा आस्वाद घ्यायला..
भल्या पहाटे जे कोणी उठतात त्यांना ऐकू येतात शांत वातावरणात कित्येक निरनिराळ्या पक्षांचे कुजन तो आनंद जरूर घ्यावा….
सकाळ संध्याकाळ देवा समोर बसून खूप जास्त नाही निदान क्षणभर तरी पहावं शांत पणे ..आभार मानावेत फक्त बाकी काहीच मागणं करू नये रोज रोज…..
त्या दिव्याच्या प्रकाशात उदबत्ती च्या मंद सुवासात मिळणारा आनंद अवर्णनीय…पूर्ण विश्वास असावा की परमेश्वर जे करतोय ते माझ्या भल्या साठीच करतो…….एकदा असं म्हटलं न की खूप काही तिढे सुटून जातात सारखा येणारा दुःखाचा उमाळा कमी होत जातो…. आनंदाच्या लहरी एकदा मनात धडकू लागल्या की आपोआपच मन शांत होतं
बाहेरच्या जगात कुठेही जा खूप काही त्रासदायक प्रसंग होतात सारखे पण ते जिथल्या तिथं सोडून द्यायला शिकलं की जगणं सोप्प होऊन जातं…
माफ करायला शिकणं ही तर आनंदाच्या जिन्याची पायरीच….खूप अवघड असतं हे पण करावं कारण
चिडचिड करून झालेल्या अपमानाच्या खपल्या काढत बसून काहीही साध्य होत नसतं..
काही जखमा भाळाळणाऱ्याच असतात बऱ्या न होणाऱ्या…त्यांच्या कडे साफ दुर्लक्ष केलं पार आत गाडून टाकलं तरच जगणं सुकर होते…
कधीतरी आपण स्वतःला प्रश्न विचारावा मी कोण?
म्हणजे मी कोण टीकोजी राव की लोकांनी आपल्याला मान द्यावा…म्हणजे खूप सोप्प होतं जगणं…ईगो नसावा बिलकुल….
खूप लोकांना गरज आहे समाजात आपली पूर्ण नाही पण थोडं तरी झोकून द्यावं कधी वृद्धाश्रमात
तर कधी अनाथाश्रमात जावं खूप जास्त गरज नसते त्यांना पण मायेचा आपुलकीचा हात हवा असतो तो आनंद वेगळाच हे मी स्वतःचे अनुभव सांगतोय…
कितीही काही झालं तरी आपली वाट बघणारी जी माणसं असतात त्यांना जरूर वेळ द्यावा… मैत्री या शब्दाला जागावं जरूर म्हणजे जगणं सोप्प होतं
प्रेम करावे भरभरून सारं काही लुटून द्यावं भले यात नंतर नातं तुटलं तरी शांततेने स्वीकारावं यात एक सांगावं वाटतं …..
नदीचा प्रवाह वहात असतो जोरात आपण त्यात उभे राहतो आणि ओंजळभर पाणी घेतो ….पण काही क्षणात लक्षात येतं हळूहळू ओंजळ रीती होतेय…..
हा जो जीवन प्रवाह आहे तो असाच वाहत्या पाण्यासारखा…… ओंजळीतल्या पाण्या सारखी माणसं आपल्या आयुष्यात येतात व जातात
फक्त एक करावं जो पर्यंत माणूस आपल्या सोबत आहे समोर आहे तो पर्यंत जास्तीतजास्त आनंद सोहळा व्हावा….
सोशल मीडियावर जिथं नाही पटत तिथं दुर्लक्ष करावं अगदीच खूप झालं तर पाठ फिरवून बाजुला व्हावं …
असंच जगत राहावं आनंदाने…
राजेश गिरे.…
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
अतिसुंदर ….मनाला भावणारा
धन्यवाद….😊
सुंदर
सुंदर
धन्यवाद..😊
अगदीच आनंदाची संज्ञा च बदलून गेलीय सध्या…🙏🙏
आभासी जगात फिरनार्यांसाठी
खुप सुदंर लिखाण.
थँक्स….
अगदीच आनंदाची संज्ञा च बदलून गेलीय सध्या…
हो ना…..😊
धन्यवाद..😊
थँक्स सर्वांचे….