आ चल के तुझे मैं -रसग्रहण
दूर गगन की छाॕवमें…..सबकुछ किशोरकुमार असलेला हा चित्रपट.
आई आणि मुले यांची ममतामय बरीच गीते आपण ऐकली आहेत.अंगाई आईच गाते म्हणून असेल कदाचित् पण
वडील आणि मुलाच्या नात्यावर मात्र फार कमी गाणी ऐकायला मिळतात.
कमी गीतांमधील एक गीत आहे
आ चल के तुझे मैं ….
.वडिलांनी मुलासाठी गायलेले ,वडील-मुलातील हळूवार भावबंध जोपासणारे हे नितांतसुंदर गीत.
गेल्या दोन तीन पिढीतील प्रत्येक बाबाला आवडणारे हे गीत.
सगळे बाबा मुलांसाठी असेच स्वप्न बघत असणार.
मुलाच्या जीवनात सदैव प्रकाशकिरणे असावीत.अंधाररेषा नावालाही नसावी.जिथे फक्त आनंदगाणी असतील तिथेच मुलाने राहावे…अशी मनोमन इच्छा असणाऱ्या वडिलांचे मनोगत ह्या गाण्यात किशोकुमारने रेखाटले आहे.
सिनेमात किशोरकुमार आणि त्यांचा मुलगा अमितकुमार यांच्यावर चित्रित झालेले हे गीत किशोकुमारने लिहिले आहे.
चित्रपटाचा नायक युद्धावरुन घरी परततो.अपघाताने लागलेल्या आगीत नायकाची पत्नी आणि वडील जातात.त्या धक्क्याने मुलाचा आवाज जातो. वडिलांना मुलाशिवाय आणि मुलाला वडिलांशिवाय आता जगात कोणी नाही.
वडील मुलासाठी एका आगळ्यावेगळ्या,स्वप्नील जगाचे स्वप्न बघतात.
त्यांच्या मुलासाठी असणारे जग सुंदर असेल, जिथे वैरभावनेला जागा नसेल,चहूबाजूला फक्त प्रेमच प्रेम असेल,सगळे स्वतंत्र असतील.मनातील आशा,आणि डोळ्यातील स्वप्ने पूर्ण होतील अशा स्वप्नातील जागेत त्यांना मुलाला न्यायचे आहे.
आ चल के तुझे, मैं ले के चलूं
इक ऐसे गगन के तले
जहाँ ग़म भी न हो, आँसू भी न हो
बस प्यार ही प्यार पले
इक ऐसे गगन के तले
चल तुला मी अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे दुःख,यातना ,अश्रु असणार नाही.फक्त आणि फक्त प्रेमच असेल.असे आभाळ शोधू या.
सूरज की पहली किरण से, आशा का सवेरा जागे
चंदा की किरण से धुल कर, घनघोर अंधेरा भागे
कभी धूप खिले कभी छाँव मिले
लम्बी सी डगर न खले
जहाँ ग़म भी नो हो, आँसू भी न हो …
तिथे सुर्याच्या पहिल्या किरणाने आशादायी पहाट उगवेल, चंद्राची किरणे अंधाराला पळवून लावतील.कधी उन्ह कधी सावली असेल.कितीही मोठा प्रवास असला तरी आपण कंटाळणार नाही,थकणार नाही.कारण आपल्याला एकमेकांची सोबत असेल.
जहाँ दूर नज़र दौड़ आए, आज़ाद गगन लहराए
जहाँ रंग बिरंगे पंछी, आशा का संदेसा लाएं
सपनो मे पली हँसती हो कली
जहाँ शाम सुहानी ढले
जहाँ ग़म भी न हो, आँसू भी न हो …
आ चल के तुझे मैं ले के चलूं …
जिथे जिथे आपली नजर पोहचेल तिथे तिथे मुक्त पसरलेलं स्वच्छंद आकाश दिसेल. तिथे कुठलीही बंधने नसतील.
जिथे रंगबिरंगी पक्षी आशेचा संदेश आणतील.निराशा तिथे फिरकणार नाही. स्वप्ने उराशी कवटाळून हसणाऱ्या मुक्त कळीसारखे तिथे आयुष्य असेल.
मावळती संध्याकाळही जिथे प्रसन्न भासेल अशा सुंदर जगात मला तुला न्यायचे आहे.
मी तुझ्यासाठी बघितलेल्या स्वप्नील जगात चल माझ्यासोबत….
प्रिय वाचक,तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे रसग्रहण शब्दपर्णवर पाठवू शकता.
Email-shabdaparnamarathi@
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










छान रसग्रहण
Wah
खुप सुंदर गाणे आणि रसग्रहण
खुप सुंदर गाणे
Mast