सुनील शेट्टी आणि पुनम झावर या जोडीवर चित्रीत केलेले..
ना कजरे की धार
ना मोतियों के हार
ना कोई किया सिंगार
फिर भी कितनी सुंदर हो
तुम कितनी सुन्दर हो
मन में प्यार भरा
और तन में प्यार भरा
जीवन में प्यार भरा
तुम तो मेरे प्रियवर हो
तुम्हीं तो मेरे प्रियवर हो
सिंगार तेरा यौवन, यौवन ही तेरा गहना
तू ताज़गी फूलों की, क्या सादगी का कहना
उड़े खुशबू जब चले तू, बोले तो बजे सितार
ना कजरे…
सारी दुनियाँ हरजाई, तेरे प्यार में हैं सच्चाई
इसलिए छोड़ के दुनिया, तेरी ओर खींची चली आई
थी पत्थर, तूने छूकर, सोना कर दिया खरा
मन में…
तेरा अंग सच्चा सोना, मुस्कान सच्चे मोती
तेरे होंठ हैं मधुशाला, तू रूप की है ज्योति
तेरी सूरत, जैसे मूरत, मैं देखू बार-बार
ना कजरे …
वरील गाणे 1994 मध्ये आलेल्या मोहरा चित्रपटातील ..संगीतकार विजू शाहने संगीतबद्ध केलेले…साधना सरगम आणि पंकज उदासच्या आवाजातील ..
गीतकार इन्दीवर वरने लिहीलेले अतिशय सुंदर असे गाणे …
या गाण्यात गीतकाराने प्रत्येक शब्दातून प्रेमिकेचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.
दोन प्रेमीजीवांना एकत्र येण्यासाठी एकमेकांविषयी असलेली ओढ श्रृंगारापेक्षा अधिक जरूरी असते. असे या गाण्यातून दाखवले आहे.
प्रेमिकेची सादगी आणि सोज्ज्वळपणाच तिच्या प्रियकराला तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरेसा असतो. तो आपल्या प्रेयसीला तसे त्याच्या शब्दातून दर्शवितोही..
जातीच्या सौंदर्याला वरवरच्या साज श्रृंगाराची किंवा मोत्याचा दागिन्यांनी नटण्याची काही गरज नसते…तिच्या साधेपणाचे, सोज्वळतेचे तेजच तिच्या सौंदर्याला चार चांद लावतात. प्रियकराला आपली प्रेयसी एखाद्या रुपगर्विंतेसमान भासते… तिच्या चमकदार तेजस्वी चेहऱ्यासमोर हिऱ्या मोत्यांची चमक ही फिकी पडते.
फुलांचा ताजेपणा, टवटवीतपणा प्रियकराला तिच्या सौंदर्यात जाणवतो. सतारीचे मंजूळ सुर छेडल्याप्रमाणे तिच्या आवाजातील गोडवा कानाला मोहून टाकतो. आपली तारीफ करणारा..
आपल्यावर एवढा भरभरून प्रेम करणारा प्रियकर, आपल्या ला पतीच्या रूपात मिळालेला पाहून ती मनोमन सुखावते.. पारिस स्पर्शाने मामुली दगडाचे सोने झाल्याप्रमाणे प्रियकराच्या प्रेमळ स्पर्शाने तिला तिच्या अस्तित्वाची, सौदर्यांची जाणीव होते.
प्रियकराच्या प्रेमात अखंडपणे डुबलेल्या प्रेयसीला आता तिच्या प्रियकरासमोर सर्व जग तुच्छ वाटू लागल्याने ती सर्वांंपासून दूर होवून प्रियकराकडे आकर्षित होवून सर्वस्वाचा त्याग करून त्याच्या बाहुपाशात विलीन होते.
तुझा सोनेरी तेजस्वी वर्ण , तुझ्या नाजूक मधाळ ओठांवर खुललेल्या शुभ्र मोत्यांच्या माळेसमान प्रसन्न हसण्याने तुझे रूप दिव्याच्या ज्योतीप्रमाणे उजळून टाकतो.
आणि त्यामुळे मुर्तीसमान भासणारा तुझा चेहरा मी देहभान हरपून पुन्हा पुन्हा निरखत रहातो …
सौ. दर्शना भुरे.. हिंगोली











सुंदर गाणे, सुंदर रसग्रहण
छान.. अर्थपूर्ण
Khup chan
Wah