भार्गव गार्डन मधे आराम खुर्चीवर चहा घेत घेत फूल झाडांच सौंदर्य न्याहळत .. बसले होते पहाता पहाता त्यांची नजर त्यां काटेरी गुलाबाच्यां झाडावर थबकली.
किती सुंदर रंग आहे ह्या फूला चां,फिकट गुलाबी , मनमोहक …पण फारच कमी फूले येतात ह्यालां ..आणि.काटे …. काटे तर इतके के फूल तोडलं की हाता ला सुगंध आणि खुणा सोबतच होतातं…फार सुरेख फूल आहेतं.
काका…”बिस्किट आहेत, मी रवा पहायला गेले तर हा पुडा दिसलां ” म्हणत सोयरा येते (तिशीतील ,पांढरी साडी नेसलेली सोज्वळ स्त्री )परत थोडा चहा पण घ्यां..
मी नाष्टा तयार करते ,नील जातील नं ऑफिस ला…डबा पण करायचा …उशीर होईलं.
भार्गव चहा घेत विचार करतातं ..खरच आयुष्य हे “अळवावरच पाणीच” असतं ….तीन वर्षात कस सगळ बदलल नं … कशी हसरी होती हि सोयरा . अनाथ असून ही सोज्वळ ,समंजस ,संस्कारी.लांब चा मामा होता कुणी ,त्याने च आमंत्रण धाडल होत स्थळा चं. मी आणि शशांक( माझा जीवलग मित्र .)आम्ही पहायला गेलो होतो हिला शशांक च्या शौर्य साठी .किती थाटात लग्न पार पडल होत शौर्य चं…बाई माणूस नसल्या मुळे सगळे सोपस्कार “सई “नी (भार्गव ची पत्नी)च पूर्ण केले होते. किती लाडाची होती सोयरा आमची सर्वांची .पहाता पहाता लाडाकोडात वर्ष गेल .अचानक एके दिवशी शौर्य च्या गाडी ला अपघात झाला .त्याने त्या क्षणी जगाचा निरोप घेतलां. घराला दृष्ट लागल्या सारखी .झाली ….शंशाक ला पहिला हार्टअटैक लागलीच आला होता. सोयरा …ती तर थिजलीच होती.शौर्य ची पूरती ओळख ही झाली नव्हती ,भातुकली च्या खेळा सारखे झाले होते त्यांच्या संसारा चे.मांडल्या मांडल्या नियती ने मोडलां . सोयरा पार यंत्रवत झाली होती. तिला काहीच सुचेनां ..
मी आणि सई आम्ही सावरून लावल सर्व आमच्या परि ने.सई ने तर आई च्या मायेने जवळ केल सोयरा लां .फार दुख्खी आसायची सई .निष्ठूर आहे देव ..कोवळ्या वयात पोरी ला पोरक
केलं ..,एखाद्या च नशीब किती वाईट असाव नं.
अशातच तरुण मुलांच्या जाण्याने कष्टी आणि कृश झालेल्या शशांक ला परत अटैक आला ..या वेळी नाही सावरु शकला तो …जाता जाता सोयरा ला माझ्या हवाली करुन गेला..किती केविलवाणी आर्जवे होती त्याच्या डोळ्यातं ..
सई ने परत एकदा दैव, देव ह्यांचा उद्धार केलां…शशांक च दहावं,तेरावं करुन सोयरा ला आमचा घरी घेऊन आलो आम्ही .सई ने तसा आग्रह च धरलां …”मला लेकीपरी आहे ती ..मी तिला एकटी सोडूच शकत नाही”बरच दा नील कडे दुर्लक्ष होई तीचं .सोयरा ची वज करता करता. फार जीव जडला होता तिचा ..
काल सई ने म्हटले , ते तर खरेच अभिमानस्पद आहे ..” नील साठी मला सोयरा सून म्हणून आवडेल.” माझ्या मनातील संवाद सई बोलली ,हे ऐकून मन आनंदी झाल.जगाच जाऊ देत हो..जगरहाटी नुसती गोंगाटानी भरलेली आहे .
पण भगवंता नी प्रत्येक ला एक आंतरिक स्वर दिला आहे ,अंतरमना च्या वीणेवर तो सारखा निनादत असतो.आपण आपले अंतर मनातील ते सूर ऐकावे ,व त्या प्रमाणे निर्णय घ्यावे ,वागावे,आयुष्या चा जल्लोष करावा.आणि सुखाला आमंत्रणे द्यावी …कारण ती अनामिक शक्ती सर्वस्व आहे …करता करविता नियंता च मना ला ही वळण देऊन प्रारब्ध विधी करवून घेतो..सगळ्यांची उमटलेली भाग्य रेघ ..ठळक करण्याचे काम कर्तव्य म्हणून तो व्यक्ती विशेष वर सोडतो .. भाग्य मात्र जन्मा पूर्वीच नेमलेल असतं…
@$
सोयराचे भाग्य खुलले तर…..
सुरेख कथा