Mai kya janu kya jadu hai- song lyrics and review
Mai kya janu kya jadu hai- song lyrics and review

Mai kya janu kya jadu hai- song lyrics and review

१९४० साली आलेला जिंदगी  हा सिनेमा.प्रेमात पडणे म्हणजे पाप असे समजण्याचा तो काळ. 

मुलामुलींनी  एकमेकांशी बोलायला बंदी.
प्रेमीजीवांना संवाद साधायला मोबाइल,फोन काहीही नसणारा तो काळ.
पण काळ कुठलाही असो प्रेम करणाऱ्यांना कोण अडवू शकले? 
सर्वांसमक्ष शब्दांची बोली बोलू शकत नव्हते पण  नजरानजर झाली कि डोळे बोलायचे एकमेकांशी.

डोळ्यांची जादू.प्रेमात पडलेल्या सगळ्यांनी अनुभवलेली.
फोन,पत्र नव्हती तेव्हा फक्त डोळ्यातून प्रेम व्यक्त व्हायचे नजरानजर झालीच तर.
एकमेकांकडे कितीही वेळ बघितले तरी प्रेमीजीवांचे पारणे फिटत नाही.
डोळ्यांची जादू सैगलजींच्या जादूई आवाजाने अजूनच वाढवली आहे.

जिंदगी मधील मै क्या जानू ह्या गीतातील केदारनाथ शर्मांनी शब्दात मांडलेली डोळ्यांची जादू सैगलजींच्या जादूई आवाजाने अजूनच वाढवली आहे.
जिंदगी १९४० साली आलेला सिनेमा.सुशिक्षित बेकार तरुण रतन (कुंदनलाल सैगल) आणि  पतीच्या छळाला कंटाळलेली श्रीमती (जमुना) यांच्यातील प्रेमकथेवर आधारीत असलेल्या सिनेमातील हे अजरामर गीत.
नितांतसुंदर अशा या  गीताला स्वरांनी सजवले आहे   पंकज मलिक यांनी.

डोळ्यांचीही एक भाषा असते.शब्दांशिवाय असलेली,शब्दांच्या पलीकडे जाणारी…
ती भाषा फक्त तो आणि ती दोघांनाच समजते.
डोळ्यांची वेगळी भाषा जपणारे डोळे खरेच जादूगरच असावेत.प्रियकर प्रेयसीला सांगत आहे
तुझ्या डोळ्यात काय जादू आहे? कळत नाही आहे.पण मी आकंठ बुडलोय तुझ्या डोळ्यात. तुझे डोळे खरेच जादूगर असावेत.त्यांनी नक्कीच काहीतरी जादू केली माझ्यावर.
तुझे डोळे थांग न लागणाऱ्या समुद्रासारखे आहे. समुद्राची खोली कुणाला मोजता आली का?
तुझ्या डोळ्यात खोल डुबतोय असे वाटते पण ते तेवढेच अनाकलनीयही आहेत.कसल्या तरी तेजाने तुझे डोळे चमकत आहेत.
ते तुझ्या डोळ्यातील तेज पोहचत आहे माझ्यापर्यंत.माझे मन मला विचारत आहे कि तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्याशी काय गुज केले?
काय सांगू मी?
मनाला कळेल का आपल्या डोळ्यांची भाषा?
जेव्हा तुझी माझी नजरानजर झाली तेव्हाच डोळ्यांनी मला
आपण एक असल्याचे सांगितले . आपल्या डोळ्यांची भाषा आता एकच आहे. तुझे डोळे जणू माझ्या डोळ्यातच राहायला आले …….

मैं क्या जानू क्या जादू है
मैं क्या जानू क्या जादू है
जादू है जादू है जादू है
इन दो मतवाले नैनो में जादू है
जादू है जादू है जादू है
मैं क्या जानू क्या जादू है

एक तेज आँखो का जलता है
एक तेज आँखो का जलता है
इन दो मतवाले नैनो में जादू है
जादू है जादू है जादू है
मैं क्या जानू क्या जादू है

मन पूछ रहा है अब मुझसे
नैनो ने कहा है क्या तुझ से
मनपूछ रहा है अब मुझसे
नैनो ने कहा है क्या तुझ से
जब नैन मिले नैनो ने कहा
नैनो ने कहा
जब नैन मिले नैनो ने कहा
अब नैन बसेंगे नैनो में

काही गाणी  खूप  जुनी असली तरी ऐकतांना नव्याची अनुभूती देतात,आपल्या मनावर राज्य करायला त्यांचे जुनेपण आड येत नाही.त्यातीलच हे एक तरल गीत…
८२ वर्षापूर्वी आलेले हे गाणे अजूनही तरुण आहे,कारण
 
जादू है 
इन गीतमें,संगीतमें,आवाजमें जादू है
 
..प्रिती ..

8 Comments

  1. Preeti

    सर्वांचे मनःपूर्वक आभार.
    तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!