काही दशकांपूर्वीचा काळ…..
एक ऐतिहासिक वास्तू …सात खणी दिवाणखाना… नक्षीदार कमानी… प्रशस्त दालन ….त्याच्या बाजूने महिरपी झरोखे आणि त्यातून उमलणारी अत्यंत संयत अप्रतिम प्रेम कथा…हो मी बोलत आहे लुटेरा या चित्रपटाबद्दल…..
गोष्ट आहे 1953 सालची पश्चिम बंगालचे बडे जमीनदार रायचौधरी, त्यांची एकुलती एक मुलगी पाखी आणि तिच्या आयुष्यात आगंतुका सारखा आलेला वरूण यांची…
ओ हेन्री यांच्या ‘ द लास्ट लीफ’ या लघुकथेवर आधारित हा चित्रपट आहे . दिग्दर्शकाने मूळ कथेत प्रेमाचे आणि रहस्याचे गहिरे रंग भरले आहेत…
या चित्रपटात नायिकेची भूमिका केली आहे उंचीपुरी सुंदर सोनाक्षीने आणि नायकाची देखण्या रणवीर सिंगने…
पहिल्यांदाच एकत्र आलेल्या सोनाक्षी आणि रणवीर सिंगने प्रेक्षकांना भाराऊन टाकले आहे.पूर्वार्धात दम्याशी झगडताना आणि प्रेम करताना देखिल आपला खानदानी आब दाखवून देणारी चंचल खोडकर पाखी आणि उत्तरार्धातली क्षयाशी सामना करणारी, स्वतःची झगडणारी, पूर्ण रया गेलेली शांत पाखी या दोन्ही भूमिका सोनाक्षीने अप्रतिम रंगवल्या…
रणवीरने वरुणच्या भूमिकेतले विविध कंगोरे अगदी ठशिवपणे साकारले आहेत .रणवीर पहिल्यांदा सोनाक्षीचे हृदय चोरतो मग तिच्या आशा-आकांक्षा आणि सर्वस्व लुटून नेतो आणि शेवटी तिच्या जीवनातला काळोख ,दुःख निराशा लुटून पुन्हा तिला सर्वस्व अर्पण करतो…
आशा-आकांक्षेच्या ,आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर हा चित्रपट एक छान उंची गाठतो .
चित्रपटाचे चित्रीकरण अगदी अफलातून आहे…
पूर्वार्धातला बंगालचा सुवर्णकाळ हवेलीतील भव्य सेट ,हिरव्या रंगाने बहरलेला निसर्ग आणि उत्तरार्धातील डलहौसीचा निष्प्राण बंगला आणि निष्पर्ण बर्फाळ निसर्ग …..लुटेरा चित्रपटाचे प्राण म्हणजे त्यातली गीते …
संगीतकार अमित त्रिवेदी आणि गीतकार अभिजीत भट्टाचार्य यांनी नेहमीच्या संगीतापेक्षा काही वेगळेच ऐकवण्याचा फार सुंदर प्रयोग केला आहे.
‘हवा के झोके आज मौसम से रूठ गये’ हे मोनाली ठाकूर यांच्या चंचल, मनमोहक, निरागस आवाजातले अप्रतिम गाणे…
हवा के झोंके आज मौसमोसें रूठ गये
गुलोंकी शोखियाँ जो भँवरे आके लूट गये
बदल रही है आज ज़िंदगी की चाल ज़रा
इसी बहाने क्यू ना मै भी दिल का हाल ज़रा
सवार लूं सवार लूं
सवार लूं हाय सवार लूं…..वाराची झुळुक आज ऋतुवर का बरे रुसली ..
अबोल फुलांचा गंध भ्रमरांनी का लुटून नेला..
जीवनाची चाल सुद्धा आज बदललेली दिसते
हाच बहाणा बनवुन मी सुद्धा माझ्या हृदयाची विचारपूस करू का ?…बरामदे पुराने हैं नईसी धुप है
जो पलके खटखटा रहा है किसका रूप है
शरारतें करे जो ऐसे भूल के हिजाब कैसे
उसको नाम से मै पुकार लुं
सवार लूं सवार लूं
सवार लूं हाय सवार लूंतोच तो व्हरांडा पण उन्ह कशी नवीन दिसतात…
कोण आहे जो माझ्या पापण्यांची द्वार ठोकत आहे…
कोण आहे जो आपल्या खट्याळपणाने मला सतावत आहे.
मी देखिल संकोच सोडून त्याला नावाने हाक मारू का?….ये सारी कोयलें बनी हैं आज डाकिया कुहू-कुहू में चिट्ठियां पढ़े मजाकिया इन्हें कहो की ना छुपाये
किसने है लिखा बताए,
उसकी आज मैं नज़र उतार लूं
संवार लू, संवार लूं
संवार लूं हाय संवार लूंह्या वसंतदूत कोकिळा आज माझ्यासुध्दा दूत झाल्या आहेत
आपल्या मधुर आवाजात माझी प्रेमपत्र वाचुन दाखवीत आहेत.
कुणीतरी त्यांना सांगा ,त्याचे नाव लपवु नका … आज मला त्याची नजर काढायची आहे …
सवार लूँ…सवार लूँ….आमचे इतर साहित्य वाचण्यासाठी शब्दपर्ण पेज जरुर follow करा.











छान समीक्षण
सुरेख