मयंक जोरजोरात रडत आणि ओरडत ..शेजारील बिल्डींगकडे बोट दाखवत सारखे एकाच वाक्याची पुनरावृत्ती करत होता
कुणी तरी आहे तिथं…!
कुणी तरी आहे तिथं….!
बघा नं.मला बोलावतय ते त्याच्याकडे.
बघा…बघा…ते खुणावतय मला.
मयंकची सारखी ही बडबड चाललेली असते.त्याची नजर त्या बिल्डिंगवर खिळून असते.मयंकच्या डोळ्यांची पापणीही लवत नव्हती.मात्र डोळ्यांमधून आसवांच्या धारा त्याच्या गालांवरून ओघळत मानेपर्यंत येत होत्या…
प्रज्ञाने तसेच कपडे फेकले आणि मयंकला जवळ घेतले.
विनिता वहिनी श्लोक ची अंघोळ घालत असते…तशीच त्याला बाथरूम मध्ये सोडून तिही बाहेर पळतच येते..प्रमोद दादा,विनोद आँफिसला जायची तयारी करत असतात..तसेच दोघेही शर्टाची बटन लावत पळतच बाहेर येतात.
मानव,पालवी देखील मयंकचा इतके मोठमोठ्याने रडणे ऐकून…झोपेतून उठून बाहेर आलीत….
प्रज्ञाने मयंकला आपल्या मिठित घट्ट पकडले.आईचं काळीज ते……मयंक ला असल्या रूपात बघतांना तिला वेदना होत होत्या.तिचे डोळे पाणावले.
सर्व जण मयंकच्याच अवती भवती जमा झाले….मयंक मात्र आपली एकच बडबड करत त्या बिल्डिंगकडे एकटक बघत राहिला…
प्रज्ञा -अहो,सांगा न ह्याला की ती बिल्डिंग बंद आहे म्हणून.नाहीये तिथं कुणी.
प्रमोद– अरे..मयंक..शांत हो बघू.तू रडणं थांबव आधी……
प्रज्ञाने मयंकला इतकं घट्ट पकडून ठेवले होते की तिच्या त्या अशा पकडण्याने ती सांगत होती..की…माझ्या मयंकला वाचवा
इतक्यात मयंक ने पुन्हा जोरात प्रज्ञाच्या हाताला हिसका दिला
मयंक-सोड मला सोड ना.मला जाऊ दे.बघ..बघ वर…..तिथं……मला बोलावतय कुणी तरी .तू…सोड मला जाऊ दे
प्रज्ञा – ( मोठ्याने रडत )प्रमोदला आणि विनोदला अहो….करा न काहीतरी हा असा काय करतोय
प्रमोद आणि विनोद दोघांनाही काहि सूचनासे झाले .मयंक हे अस काय विचित्र बडबडतोय याचा सुगावाच लागत नव्हता.
वेळ अशी होती की मयंक ला सांभाळायचे की प्रज्ञाला..???
मयंकच हे असले विचित्र रूप बघून प्रज्ञा ओक्साबोक्शी रडू लागली….प्रज्ञा आपली सर्व ताकद लावत मयंकला आपल्यापाशी घट्ट पकडून ठेवत त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती.परंतु
मयंक स्वतःला आईच्या मिठितून सोडवण्यासाठी जोरज़ोरात पाय आपटू लागला आणि एकच बोलू लागला.मला सोड .जाऊ दे मला सोड पटकन…ते बघ..
आहे तिथं कुणी तरी जाऊ दे मला
आता मात्र प्रज्ञा प्रमोद व विनोद वर संतापली आणि…… आणि ओरडूनच म्हणाली……
प्रज्ञा -अहो…तुम्ही दोघ..बघत काय बसलाय डाँक्टरांना बोलवा पटकन आणि मयंकला आत खोलीत नेऊया ह्या बिल्डिंगसमोर नको थांबूयात आता जास्त वेळ.
विनोद मोबाईल वर डाँक्टरांना फोन लावत जरा बाहेर जातो…
प्रमोद,प्रज्ञा ,विनिता सर्व मिळून मयंकला उचलून आत त्याच्या खोलीत नेतात तेव्हाही मयंक आपली संपूर्ण ताकद लावत यांची घट्ट पकड सैल करत त्या बिल्डिंगकडे जाण्यासाठी तडफडतो.मयंकचे शरीर इतके जड झालेले असतांना आणि त्याला आवरत घरात नेत असतांना प्रज्ञा ,प्रमोद,व विनिता तिघेही हैराण होतात.जसजसे ते मयंकला आत नेत असतात.तसतसा तो जास्त किंचाळ्या मारत,,,मोठमोठ्याने ओरडत मला सोडा.मला जाऊ द्या.हेच बोलत असतो..
मयंकचे शरीर जड पडल्याने तिघांनाही त्याला उचलत आत खोलीपर्यंत नेणे कठीण झाले.शेवटी मयंकला फरफटतच आत खोली पर्यंत न्यावे लागले.
कसेतरी मयंकला त्याच्या खोलीत आणले.आता मात्र तिघांचे शरीर गळून पडले होते.मयंकला अशा रितीने फरफटत आणत तिघांची दमछाक झाली…पण तितकंच वाईटही वाटत होते की ह्या अशा पध्दतीने मयंकला आत आणावं लागले.मयंकला उचलून बेड वर झोपवले..तरी मयंकच आपलं सारख तेच सुरू होते.सोडा मला .जाऊ द्या मला…..ते बोलवतंय मला.
इतक्यात विनोद मोबाईल खिशात ठेवत तिथं आला आणि त्याने डाॕक्टर येतीलच पाच मि.म्हणून सांगितले.
मयंकला बेड वर झोपवले तर खरे..पण त्याचे ते विचित्र बडबडणे,तडफडणे….बेडवरदेखील थांबले नव्हते…
प्रज्ञा मयंकच्या डोक्यापाशी त्याचा एक हात धरून तिथंच एका बाजूने बेडवर बसली तर दुसऱ्या बाजूस विनिता मयंकचा दुसरा हात पकडून बसली.प्रमोदने मयंकचे दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवले होते.
प्रमोद – विनोद ….जरा स्टोअर रूममधून तो दोरखंड आण बघू……
प्रमोदचे हे वाक्य प्रज्ञाच्या कानावर पडताच ..ती डोळे विस्फारून प्रमोद कडे आश्चर्य होऊन बघते..आणि म्हणते..
प्रज्ञा – अहो,हे काय करताय तुम्ही?
म्हणजे आता तुम्ही आपल्या मयंकला दोरखंडाने बांधून ठेवणार तर…..! असा विचार तरी कसा करवतो हो तुम्हाला ??
मी नाही हा हे असलं काही करू देणार.
प्रज्ञा संतापात बोलत राहते.
प्रमोद-हे..बघ प्रज्ञा मला कळतंय तूला ज्या वेदना होताय..त्याच मला देखील होताय.पण माझा नाईलाज आहे..आपल्याला हे करावंच लागेल.आणि तू अडवणार नाहीये मला.
मयंकला दोरखंडाने बांधून ठेवणार ह्या कल्पनेनेच तिला खूप रडायला येते…
तेवढ्यात विनोद स्टोअर रूममधून दोरखंड आणतो.
विनोद-हे.घे दादा…
प्रमोद -विनोद.तू मयंकचे पाय पकडून ठेव..मी दोरखंडाने बांधतो त्याला…..
प्रज्ञा आणि विनिता सारख्या रडत असतात…मयंकचा मात्र ते हातपाय आपटत…एक तगादा सुरू असतो….सोडा..मला…जाऊ द्या.
कुणीतरी आहे तिथं
क्रमशः
पोर्णिमा शिंपी
बापरे! काय होणार मयंकसोबत?
मस्त
अरे देवा पुन्हा क्रमशः
काय होणार ?