Kucch na kaho-कुछ ना कहो-1942Love Story-song review in marathi
प्रेमाला शब्दांची गरज नाही – जावेद अख्तर यांनी निःशब्द प्रेम शब्दातुन मांडत हे गीत लिहिले आहे.
प्रेमाचे गोड गुपीत दोघांनाही माहीत आहे.शब्दाविन कळले सारे अशी अवस्था.म्हणून तो म्हणतोय कुछ ना कहो…..
दोघांना माहित आहे नं.बस्स पुरे आहे तेवढेच.
आपण आता इथे दोघेच आहोत.
आपल्या प्रेमाखातर सतत पळणारे निमिषही थांबलेत .ही वेळ फक्त आपल्या दोघांची.तू आणि मी.दुसरे कोणीही नाही.
निसर्गाची जादू संपूर्ण गीतात जाणवत राहते.आभाळाच्या कितीतरी भूरळ पाडणाऱ्या रंगछटा छायाचित्रकाराने टिपल्या आहेत.
गडद,फिक्या रंगांनी रंगलेली संध्याकाळ,पर्वतांवरुन उतरणारे मेघ प्रेमीला कसे दिसत आहेत?
तिच्या ओढणीसारखे.
उडणारी ओढणी,ओढणी मागे धावणारी अती देखणी मनिषा, दोघांनी लपेटलेली ओढणी…सगळेच शब्दातीत…कुछ ना कहो…सारखीच आपलीही अवस्था करणारे.
रम्य सांज,तिला अजून प्रणयरम्य बनवणारा ,मुक्त रंगांची उधळण करणारा निसर्ग, एकांत लाभलेले दोन प्रेमी जीव,
त्यांच्य श्वासाची गती वाढवणारे जाणारे वातावरण,मनाबरोबर देहाची होणारी तगमग…हे ऐकत,बघत असतांना
बस एक मै हूँ…ही ओळ आणि भानावर येणारे प्रेमी आणि आपणही
सगळेच लाजवाब.
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो..
कितने गहरे हलके, शाम के रंग हैं छलके
परबत से यूँ उतरे बादल, जैसे आँचल ढलके
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो…
सुलगी सुलगी साँसे, बहकी बहकी धड़कन
महके महके शाम के साए, पिघले पिघले तन मन
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो…
आर.डी.बर्मन यांनी संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट.विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित 1942Love Story.चित्रपटातील सगळीच गाणी अत्युच्च दर्जाची.
जावेद अख्तरच्या शब्दांना आर.डी.चे संगीत,कुमार सानुचा बहारदार आवाज आणि पडद्यावर गाणे साकारणारा चिरतरुण अनिल कपूर आणि लावण्यवती(ह्या गाण्यात ती सर्वात सुंदर दिसली) मनिषा,मनमोहक चित्रण एक अप्रतिम,वर्षानुवर्ष मनावर गारुड करणारे हे गाणे बघणे आणि ऐकणे सारखेच आनंददायी आहे.
बस् गाण्याबद्दल कुछ ना कहो,कुछ भी ना कहो,क्या कहना है,क्या सुनना है…..
….प्रिती…
प्रिय वाचक,तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे रसग्रहण शब्दपर्णवर पाठवू शकता.
प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहित रहा…..









अप्रतिम 👌
इतके सुंदर लिहिले आहे कि …अब हमें ये लग रहा है ..कुछ ना कहो ..
अप्रतिम, बस कुछ ना कहो
सुंदर
खूपच सुंदर …