कोषटवार दौलतखान विद्यालय,पुसद
सर्वांना माझा नमस्कार…….
मी अमृता अनिल पांडे.
मी दहावीत आहे आणि पुसद मध्ये असणार्या विख्यात शाळेत मी शिकते याचा मला अभिमान वाटतो. माझ्या शाळेचे नाव कोषटवार दौलतखान विद्यालय आहे. माझी शाळा खरोखरंच विद्येचे मंदिर आहे आणि सर्व शिक्षक त्या मंदिरातील देव.
खरंतर असेच समजावे लागेल की आमचे भाग्य उदयाला आले…..कारण खुप कमी स्पर्धा आणि संधी अश्या असतात की त्यात आपल्याला आलेले अनुभव आपल्या शब्दांत स्वतंत्रपणे आणि स्वछंदतेने मांडता येतात आणि त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांनी ही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण प्रयत्नांती परमेश्वर. मलाही ही संधी कित्येक वर्षांनी प्राप्त होत आहे. प्रयत्न केल्यावरच आपल्याला आपले ध्येय प्राप्त होते , हे आपल्याला आपले महान पूर्वज सांगुन गेले आहेत. ही स्पर्धा आयोजित केली गेली याबद्दल Compitition Sponcer चे मन:पूर्वक धन्यवाद…………
असो…….
चला!
आपण आता आपल्या मुद्द्यावर येऊ या.
खुप झाल्या गप्पा…..
कोरोना विषाणुने आपल्याला संकटात टाकले आहे. संपूर्ण जगावर त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे आणि आपल्याला आपल्या जाळ्यात अडकवले आहे. कित्येक जण त्याच्या जाळ्यात अडकले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला.
आत्ताही बरेच जण मृत्यूशी झुंज देत आहेत. आर्थिक, शैक्षणिक इत्यादी सेवेवर सध्या काही काळासाठी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे सध्या कोरोना आटोक्यात आला आहे. शिवाय आता लसही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तेवढा धोका मात्र टळलाय.
सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांचे झाले आहे.
लहान लहान मुलांना तर त्याचे परिणाम जास्त भोगावे लागणार आहेत कारण त्यांचा तर हा पाया आहे आणि जर पायाच पक्का नसेल तर ते त्यांचे भविष्य घडवण्यासाठी सक्षम बनु शकणार नाहीत.
पण सर्वच विद्यार्थी असे नसतात की ते पुढे त्यांचे भविष्य घडवू शकणार नाहीत. बरेच जण आपापल्या परिस्थितीनुसार स्वतः मध्ये बदल घडवतात आणि जीवनामध्ये यशस्वी होतात.
परंतु…..आता आपण सर्वजण ऑनलाइन शिक्षण घेत आहोत. ही उत्तम सोय आपल्याला अभ्यास करण्यासाठी खुप उपयोगी पडत आहे. त्यामुळे आपला कोरोनापासून बचाव ही होतो आणि आपण शिक्षणही घर बसल्या घेऊ शकतो. सर्व कन्सेप्ट आपल्याला घरबसल्या समजून जातात. मुद्द्यांचे म्हणजे शिक्षण थांबले नाही……….
हिच ईश्वराची कृपा नाहीतर अजून विद्यार्थ्यांना डोक्याला ताप झाला असता !
आणि जे काही डोक्यात शिल्लक आहे तेही काही काळानंतर इंद्रधनुष्य सारखे ढगाआड गेले असते.
परंतु सर्वच विद्यार्थ्यांबाबत तसे घडत नसते.
जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत होते त्यांचे ज्ञान जागेवर आहे……….
लहान मुलांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंतही ऑनलाइन शाळेची घंटी गेल्या वर्षापासुन वाजत आहे व अभ्यास व्यवस्थित सुरू आहे.
मी आठवीत होते तेव्हापासुन हे कोरोनाचे संकट आपल्या भारतावर आणि महाराष्ट्रावर आपले घेरे घालून उभा आहे. प्रथम सञांत परीक्षा तर चांगली झाली होती आणि गुण ही चांगले मिळाले होते…………….पण द्वितीय सञांत मध्ये आणखी चांगले गुण मिळवायचे म्हणुन मी चांगला प्रयत्न केला होता. माझी परीक्षेची सर्व तयारी झाली होती .
पण मे च्या शेवटी शाळा बंद झाली आणि परीक्षा ही नाही झाल्या…….
मी खूप निराश झाले. वाटले होते कोरोना आत्ता जाईन , मग जाईन पण अस काही झालेच नाही.
चला!
आता महत्वाच्या मुद्द्यावर येऊया…..
सर्वांसोबत मला खूप मजा वाटत होती , की आता शाळा ऑनलाइन पद्धतीने चालू होणार. आम्ही खूप आनंदावलो होतो. शाळेचे क्लास नियमितपणे सुरू होते. अभ्यासही व्यवस्थित चालु होता.
आमच्या मैडम ने इंग्लिश चे टॉपिक चालु केले होते. खूप छान शिकवत होत्या त्या. सर्व व्यवस्थित समजत होते.
चार-पाच दिवस सर्व व्यवस्थित चालू होते.
पण अचानक नंतर टीचर चा आवाज व्यवस्थित येत नव्हता. नंतर हळु हळु त्या अंधुक दिसत होत्या.
फळ्यावर लिहिलेले काहीच दिसत नव्हते.
खूप परेशानी होत होती. जर मैडम नी त्या टॉपिक वर प्रश्न विचारला तर मी त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सक्षम नसायचे . कारण काहीच ऐकू ही येत नव्हते आणि दिसतही नव्हते. बहुतेक सर्वांनाच हा त्रास होत असावा . खुप परेशानी होत होती माझी.
बहुतेक, जास्त विद्यार्थी असल्यामुळे मैडमचंही मोबाइल डाटा कमी पडत होता , त्यामुळे असे होत असावे………….
पण माझी खुपच परेशानी होत होती. त्यामुळे माझा पूर्ण दिवस खराब जात होता कारण शाळेचे क्लास सकाळी आठ वाजता असायचे. म्हणजे दिवसाची सुरुवातच…….
त्यामुळे अख्खा दिवस वाईट जायचा. त्यामुळे माझे आई बाबा परेशान होत होते आणि मला सपोर्ट करायचे.
ते मला सांगत होते की, “काही होत नाही. मैडम ला सांगुन दे की नेटवर्क इशू आहे. मैडम समजून जातील.
पण तुझा अभ्यास तू व्यवस्थित कर. ऑनलाइन अभ्यास झाला नाहीतर काय झालं यूट्यूब वर चे वीडियोज तर तू नेहमी बघत असतेस आणि अस टेंशन घेतल्याने काय ते नेटवर्क वापस येणार आहे का ?” त्यामुळे मला थोडा धीर मिळायचा आणि परत अभ्यास चालू करत होते. नेटवर्क जेव्हा वीक असायचे तेव्हा मी माझ्या रूम मधुन आमच्या अंगणात जायचे. तिथे गेले तरी नेटवर्क पाच दहा मिनिटे चालत होत आणि पुन्हा……तोच प्रकार सारखा सारखा घडत होता. सगळा उत्साह , आनंद विरून जायचा. अगदी कंटाळून सोडले होते या नेटवर्क प्रॉब्लेम ने.
जे अक्षर दिसत नव्हते ते मी माझ्या मैत्रिणीकडून घेत होते. सहसा हा प्रॉब्लेम सर्वांनाच होत होता……त्यामुळे त्या ही मला कधी कधी विचारायच्या……..म्हणजे आमच्या एकमेकींना झालेल्या सेवांची परत फेड च होत होती असे समजावे लागेल. सर्वच एकमेकींना मदत करायचे. त्यामधे सर्वांनाच खूप आनंद मिळायचा. एकमेकाना तर मदत करायलाच हवे ना , त्यालाच तर मैत्री म्हणतात.
खरंच खुप अवघड काळ होता तो…….
म्हणजे आत्ता ही आहे पण तेवढा अवघड नाही. कारण आता आपल्या वैज्ञानिकांनी लस तयार करून, उपलब्घ करून दिली आहे. त्यांनाही किती श्रम करावे लागले असतील आणि मुख्य म्हणजे ही लस आपल्याला किती लवकर उपलब्घ झाली , नाहीतर एक लस शोधायला त्यांना कितीतरी वर्षे लागतात आणि शिवाय आता माझी शाळा ही चालू झाली आहे आणि अभ्यास ही चालू झाला आहे शाळेप्रमाणे . आधी ही चालू होताच पण शाळेत शिकण्याचा आणि ऑनलाइन शिकण्याचा प्रभाव आणि आनंद काही वेगळाच असतो………
आम्हाला ही संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार…….
(मित्रांनो shabdaparna.in वर येणाऱ्या पुढील स्पर्धांमध्ये अवश्य भाग घ्या. तुमचे मराठी,हिंदी,English साहित्य तुम्ही शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.








