१९७६ साली आलेला बालिकावधू एका बंगाली पुस्तकावर बेतलेला.आधी बंगाली भाषेत बनवलेला हा चित्रपट तरुण मुजूमदार यांनी नंतर हिदी भाषेत बनवला.
चित्रपटाचे बालिकावधू नावावरुनच यात बालविवाह दाखवला असणार हे लक्षात येतेच. अमल (सचिन) आणि रजनी(रजनी शर्मा) यांचा बालविवाह होतो.रजनी लग्नानंतर माहेरीच राहते.
एकदा सासरी आल्यानंतर अमल आणि ती भेटतात.नुकतेच वयात आलेले,प्रेमभावनेशी ओळख होत असलेले अमल-रजनी नदीकाठी संध्याकाळच्या वेळी बसून असतात.सूर्य आभाळी डुबण्याची कातर वेळ,रजनी दुसऱ्या दिवशी परत जाणार या विचाराने दुःखी असलेला अमल, आजूबाजूला असलेला सुंदर निसर्ग,वाहणारी नदी… हे सगळेच गाण्याला आगळे सौदंर्य बहाल करतात.
अमल,रजनी शांत बसून नदीकडे बघत आहेत.आपल्या कानावर व्हायोलिनचे आर्त सूर पडतात आणि सुरु होते एक तरल गाणे.
गाणे आनंद बक्षी यांनी रचले आहे. सुंदर संगीत R.D बर्मनचे आणि गायले आहे अमित कुमार यांनी. गाण्याची मधली एक ओळ बर्मनजींनी गायली आहे. ( ओ माँझी रे…..)
बड़े अच्छे लगते हैं
ये धरती, ये नदिया, ये रैना
और? और तुम
हम तुम कितने पास हैं
कितने दूर हैं चाँद सितारे
सच पूछो तो मन को
झूठे लगते हैं ये सारे
मगर सच्चे लगते हैं
ये धरती…
तुम इन सबको छोड़ के कैसे
कल सुबह जाओगी
मेरे साथ इन्हें भी तो तुम
याद बहुत आओगी
बड़े अच्छे…
नायकाला नायिकेची सोबत…तिच्या सोबतीने सर्व जग त्याला सुंदर भासत आहे. नदी,धरती आणि ही सांजवेळ सगळ्यांना मनोहारी रुप प्राप्त झाले आहे.
हे सगळे सुंदर आहे हे तो सांगत आहे.
अमलला धरती,नदी,सांजवेळ सुंदर वाटत असली तरी रजनीला अजून काही ऐकायचे असते.
ती विचारते अजून?
और?
अहाहा!
हा शब्द गाण्यात येतो आणि गाणे एका वेगळ्या उंचीवर पोहचते.
अर्थातच त्यावर अमलचे उत्तर
और तुम
रजनीला जणू हेच ऐकायचे होते.
अमल गाण्यातून त्याच्या भावना व्यक्त करतो.
आपण दोघे किती जवळ आहोत आणि चंद्र,तारे किती दूरवर आहेत. ते एवढे दूर आहेत कि त्यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवणार?
मला तर फक्त जे डोळ्याने दिसत आहे ही धरती,नदी,संध्याकाळ.आणि ….आणि तू एवढेच खरे वाटत आहे. आपण खूप जवळ आहोत.
इथली धरती,वाहणारी नदी, …हे सगळे सोडून रजनीने जाऊ नये असेच त्याला वाटते.तो तिला सांगण आहे माझ्यासोबत त्यांनाही तुझी खूप आठवण येईल.
गाण्याची लांबी कमी आहे पण त्यातील माधूर्य,गोडी अवीट आहे. सिनेमात ब्रिटिशकालीन वातावरण आहे..त्या काळानुसार त्यांच्या प्रेमात हळूवारपणा,मुलायमता आहे, मर्यादा आहे. नायक तिच्या जाण्याने व्यथित आहे,दुःखी आहे.विरहापूर्वीचा विरह तो अनुभवतो आहे.पण मनातील व्याकुळता तो व्यक्त करु शकत नाही.
रजनी किती सुंदर आहे हे सांगायला त्याला धरती,नदी,संध्याकाळ यांचा आधार घेऊन तिच्यापर्यंत त्याच्या भावना पोहचवतो.
हे मधूर गीत ऐकण्यासाठी आमचे YOU TUBE channel बघा.
गायक-आनंद कुळकर्णी
शब्दपर्णवरील इतर गाण्यांचे रसग्रहण/निरुपण वाचण्यासाठी खालील लिंक नक्की बघा.
https://marathi.shabdaparna.in/गाणं
प्रिती









सुंदर …
वाह सुंदर
Wah 🌹🌹🌹
खूप छान
अप्रतिम
Beautiful