ख्वाबों के परिंदे-song review in marathi
ख्वाबों के परिंदे-song review in marathi

ख्वाबों के परिंदे-song review in marathi

‘ख्वाबों के परिंदे’
अहाहा!
शब्दरचना शब्दातीत.
पहिलीच ओळ पकड निर्माण करते–
स्वप्नाचे पक्षी—स्वप्नपक्षी.
स्वप्नांनी पक्ष्यासारखेउडणे.कल्पनाच किती मुक्त आणि रम्य.
गाण्याच्या सुरुवातीला सुर्याच्या किरणांनी सोनेरी झालेली धरा दाखवली आहे. धरेसारखेच आता आयुष्यात रंग भरलेत.

मनातील स्वप्नपक्षी मोकळ्या,खुल्या आकाशात उडत आहेत.ते स्वप्नपक्षी मुक्त आकाशाबरोबर मनात,ह्दयातही उडत आहेत. कुठे जाणार ? माहित नाही.
तसेही स्वप्नांना कुठे बंधने असतात?
ते केव्हाही,कुठेही जाऊ शकतात.

आता कुठे उडण्यासाठी आकाश मोकळे झाले.सगळी काळजी,तमा मागे ठेवून पुढे निघालो. नव्हे त्यांना आता आम्ही खूप मागे ठेवले.
आता आता कुठे हर्षनिमिष पकडता आले. नजरेने सगळीकडे आनंद दिसत आहे.
हवा जशी स्वैरपणे चहूकडे विहार करते तसे जीवन सहज झाले आहे.मोरपीसासारखे हलके होऊन हवेत तरंगत आहे.आता काहीही झाले तरी मागे फिरायचे नाही.जगणे सोडायचे नाही.

उड़े, खुले आसमान में ख्वाबों के परिंदे
उड़े, दिल के जहां मैं ख्वाबों के परिंदे
ओहो, क्या पता, जायेंगे कहाँ
खुले हैं जो पल, कहे ये नज़र
लगता है अब है जागे हम
फिक्रें जो थी, पीछे रेह गयी
निकले उनसे आगे हम
हवा में बेह रही है ज़िन्दगी
ये हम से केह रही है ज़िन्दगी
ओहो, अब तो, जो भी हो सो हो

उड़े, खुले आसमान में ख्वाबों के परिंदे
उड़े, दिल के जहां मैं ख़्वाबों के परिंदे
ओहो, क्या पता, जायेंगे कहाँ
किसी ने छुआ तो ये हुआ
फिरते हैं मेहेके मेहेके हम
खोयी हैं कहीं बातें नयी
जब हैं ऐसे बेहके हम
हुआ है यूँ के दिल पिघल गए
बस एक पल में हम बदल गए
ओहो, अब तो, जो भी हो सो हो

मोकळ्या,स्वच्छंद आकाशात स्वप्नअरे,हे कोण स्पर्शीले? कुणाचा इतका गोड,मुलायम स्पर्श झाला ?
आयुष्यच सुगंधीत झाले.बस् कोणीतरी ह्दयात विराजमान झाले.आणि एका क्षणात आयुष्य बदलले.

रौशनी मिली
अब राह में है इक दिलकशी सी बरसी
हर खुशी मिली
अब ज़िन्दगी पे है ज़िन्दगी सी बरसी
अब जीना हमने सीखा है

आता आता आयुष्यात प्रकाशाचा कवडसा आला.जगण्याचा मोह निर्माण झाला.अवघा जीवनाचा आनंद जणू हातात आला.आता जगायला शिकलो. जगण्याला अर्थ मिळत चालला. जगणे जिवंत होत आहे.

याद है कल, आया था वो पल जिसमे जादू ऐसा था
हम हो गए जैसे नए वो पल जाने कैसा था
कहे ये दिल के जा उधर ही तू जहाँ भी लेके जाए आरज़ू
ओहो, अब तो जो भी हो सो हो
जो भी हो सो हो
उड़े, जो भी हो सो हो
उड़े, जो भी हो सो हो

तो क्षण आयुष्यात आला आणि त्याने जादू करुन संपूर्ण जीवन बदलवले. जगण्याचा अर्थ नव्याने कळला.पुन्हा पुन्हा तो क्षण जगायचा आहे आता.
आता काहीही झाले तरी स्वप्नांना थांबवायचे नाही.त्यांना उडू देवू मुक्त ,खुल्या आभाळात….
काहीही झाले तरी उडायचे आता……

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’
जीवन एकदाच मिळते.ते आनंदात जगा. असा संदेश देणारा झोया अख्तरचा सिनेमा आणि जावेद अख्तरची शब्दरचना.
संगीत शंकर,एहसान,लाॕय आणि गायले आहे अॕलिसा मेंडोंसा आणि मोहित चव्हाणने.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!