कतरा कतरा मिलती है -Katra Katra Milati Hai
कतरा कतरा मिलती है -Katra Katra Milati Hai

कतरा कतरा मिलती है -Katra Katra Milati Hai

गुलजारच्या शब्दाची,आर.डी.च्या संगीताची आणि आशाच्या आवाजातील जादू.तिन्ही जादूंचा संगम झाल्यावर ऐकणाऱ्याला वेड लागेल असेच गाणे निर्माण होईल.

१९८७ साली आलेला इजाजत सिनेमा, सिनेमाची कथा,गाणी,दिग्दर्शन सगळेच गुलजारचे असल्यावर तो सिनेमा राहतो कुठे ? तीन तास भारावून टाकणारी कविता बनली सिनेमाची.
मायाच्या प्रेमात असणारा,लग्नानंतर तिला विसरण्याचा प्रयत्न करणारा महेंदर(नसीर) त्याची परिपक्व पत्नी सुधा(रेखा) आणि महेंदरवर जीव ओवाळून टाकणारी,त्यावर वेड्यागत प्रेम करणारी माया(अनुराधा)
असा प्रेमाचा त्रिकोण असणारा गुलजारच्या शब्दात नटलेला हा सिनेमा. प्रेमाचा त्रिकोण असला तरी प्रत्येक नात्याची वीण नाजूकतेने विणली आहे.
महेंदरचे दुर्देव असे कि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सुधा आणि मायापैकी कुणाचेही प्रेम त्याला नंतर मिळत नाही.शेवटी तो एकटा,एकाकीच दाखवला.

सुधाचे महेंदरवर प्रेम आहे,तिला आयुष्यभर त्याची संगत हवी आहे.तो पूर्णपणे तिचा नाही हेही ती जाणून आहे.पण थोडे थोडे ‘कतरा कतरा’ प्रेमही तिला चालणारे आहे.
सुधाला मी पूर्ण प्रेम देऊ शकत नाही या अपराधीभावनेत वावरणारा महेंदर वावरत असतो.
गाण्याची सुरुवात बासरी वादनाने होते.
आणि नंतर बासरी आणि अन्य वाद्यात मिसळत जाणारा आशाचा आवाज. आवाजाबरोबर ,शब्दांबरोबर आपणही वहावत जातो.

आशाचे जिंदगी है….ही ओळ एकावर एक म्हणणे,ती ओळ संपायच्या आधीच दुसरी सुरु करणे.हे तीच करु शकते.

कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो
जिंदगी है, जिंदगी है, बहने दो
प्यासी हूं मैं, प्यासी रहने दो
रहने दो ना…

सुधा महेंदरची बालमैत्रीण. तो मायावर प्रेम करतो पण घरच्यांच्या इच्छेखातर सुधासोबत लग्न करतो.
माया महेंदरच्या बाबतीत अतिशय Possessive आहे. तो तिचे आयुष्य, तिचे जगणे आहे.
महेंदरला लग्न झाल्यावर सुधाप्रति कर्तव्याची जाणीव आहे. पण मायाचे जीव ओतून त्याच्यावर प्रेम करणे हेही तो विसरु शकत नाही.

जीवनातील आनंदाचे क्षण सुधाला जीवन जगण्याची ताकद देत आहेत.तिला महेंदरचे मायावर प्रेम आहे हे माहीत असते. पण बुंदभर मिळणारे प्रेमही तिला आनंद देते.

कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था
नींद में थी, तुमने जब छुआ था
गिरते गिरते बाहों में बची मैं
सपने पे पांव पड़ गया था
सपनों में, बहने दो…

काल झोपेत असतांना स्वप्न पडले होते.तू मला स्पर्श केला अन् मी तुझ्या मिठीत विसावली. आता जाग आल्यावर ते स्वप्न भंगले .मला स्वप्नातुन बाहेर यायचे नाही.
मला स्वप्नातच राहू दे ना.
(पण सपनोमें पांव पड गया था….ती जागी झाली.)

तुमने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में जमीन है
पा के भी तुम्हारी आरजू है
शायद ऐसी ज़िंदगी हसीं है
आरजू में बहने दो

तू तर माझ्यासाठी आकाश अंथरले आहेस पण माझ्या पायाखालची जमीन मला अधिक प्रिय आहे. तू मला मिळालास पण पूर्ण नाही.तू मला हवा आहे हा विचारच मला आनंद देत आहे. त्या माझ्या इच्छेत,तू मिळवण्याच्या मोहात मला असेच रमू दे.

हल्के-हल्के कोहरे के धुएं में
शायद आसमां तक आ गयी हूं
तेरी दो निगाहों के सहारे
देखो तो कहां तक आ गयी हूं
कोहरे में, बहने दो

सर्वत्र थोडे थोडे धूके दिसत आहे.बहूतेक धुक्याच्या वाटेत मी खूप पुढे निघून आली.कदाचित् अवकाशापर्यंत.
तुझ्यासोबतीमुळे ,तुझ्यावरच्या विश्वासामुळे,प्रेमामुळे मी इथवर पोहचली आहे.इथे धुके जरी असले तरी तुझी सोबत असेल तर असेच पुढे जायचे आहे. मला थांबायचे नाही.या धुक्यातच मला पुढे पुढे जाऊ दे.

महेंदरचे दुर्देव असे कि त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सुधा आणि मायापैकी कुणाचेही प्रेम त्याला नंतर मिळत नाही.शेवटी तो एकटा,एकाकीच दाखवला.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!