शृंगार आहे पण अश्लीलता नाही
तीव्र प्रणय आहे पण बीभत्सता नाही.
फार कमी गाणी आहेत अशी जिथे मादकतेने उच्चबिंदू गाठला पण तरीही गाणे स्वच्छ ,सुंदर,तरल वाटते.
आम्रपाली- १९६६ मध्ये आलेला सिनेमा.
सिनेमाची नायिकाच वारांगना.त्यामुळे त्यात मादकता येणे स्वाभाविकच.पण मादकतेलाही मर्यादेत ठेवण्याचे कसब नायिका आणि दिग्दर्शकाने साधले आहे.
भानू आथैय्या यांनी त्या काळच्या वातावरणाला अनुसरुन अंजिठा लेण्यावरुन प्रेरणा घेऊन केलेले ड्रेस डिझाईन.ज्यातून आम्रपाली मादक दिसते पण अश्लील नाही.कमी कपड्यातून तिच्या देहाचे होणारे प्रदर्शन अधिकाधिक आकर्षक ,मोहक वाटते.
मिलनोत्सुक नायिका नायकाच्या मिलनासाठी आतूर झाली आहे.
मनातल्या भावना मोकळ्या सांगण्याइतपत तिच्यात धिटाई आहे.
वैशाली नगरची नगरवधू आणि मगध देशाचा राजा यांच्यात उमललेली प्रीत आपल्यालाही एका वेगळ्या धुंद, नशील्या जगात घेऊन जाते.
तड़प यह दिन रात की
कसक यह बिन बात की
भला यह रोग है कैसा
सजन अब्ब तोह बता दे
अब्ब तोह बता दे बता दे
ती तिच्या प्रेमीला (राजा अजातशत्रुला) विचारत आहे.
ही बेचैनी,ही जीवाची, देहाची तडफड दिवसरात्र कशामुळे होत आहे? क्षणभरसुद्धा ह्या तनमनाला शांतता वाटत नाही. आतातरी सांग ना,
काय आहे हे? कोणता रोग आहे हा?
ही अस्वस्थता देणारी कुठली भावना आहे?
बिना कारण उदासी क्यों
अचानक घिरके आती है
थक जाती है क्यों मुझको
बदन क्यों तोड़ जाती है
बदन क्यों तोड़ जाती है
अकारण मनात निराशेचे ढग दाटून येत आहेत. माझ्या देहाला बेचैनी वेढा घालत आहे.
देहाची तगमग वाढतच चालली.
का? असे का होत आहे?
(नव्यानेच प्रेमात पडणाऱ्या ललनेच्या भावनेची तीव्रता किती अचूक पकडली गीतकाराने)
है आखिर कौन से बंधन
जो मुझसे खुल नहीं पाते
यह बादल बेबसी के क्यूँ
बरस कर धुल नहीं जाते
बरस कर धुल नहीं जाते
तुझ्याशी मला बांधणारी ही कोणती बंधने आहेत?
त्या बंधनातून मला मुक्तता का प्राप्त होत नाही आहे.तो गुंता अधिकाधिक मला गुंतवत आहे. तुझ्यासोबत बांधलेली बंधनाची गाठ घट्ट होत चालली आहे.
हे विरहाचे ,अगतिकतेचे,आर्ततेचे ढग बरसून
माझे व्याकूळ मन, तडफडणारा देह शांत कधी होणार?
तड़प यह दिन रात की
कसक यह बिन बात की
भला यह रोग है कैसा
सजन अब्ब तोह बता दे
अब्ब तोह बता दे बता दे
तड़प यह दिन रात की.
शैलेंद्रचे गीत,शंकर जयकिशनचे संगीत ,लताचा आवाज आणि वैजयंतीमालाचा अभिनय,तिचे भावविभोर ,मादक पण मर्यादशील विभ्रम, तिची मिलनाची व्याकुळता नायकापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न सगळेच मोहित करणारे.
Kitti chhan g
Wahh 🌹🌹🌹
Khupach sunder 👌
खूपच … सुंदर … शब्दरचना
खूप सुंदर
खुप सुंदर रसग्रहण