लग्न-marathi article
लग्न-marathi article

लग्न-marathi article

लग्न-marathi article

 

लग्न ही प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकणारी घटना असते.लग्न हा एक संस्कार आहे जो योग्य वेळी नातेवाईकांच्या सानिध्यात पार पडला जातो.लग्नानंतर सगळ्यांच्या आयुष्यात बदल होतात.काही बदल हे चांगले असतात तर काही वाईट.बदल होणं स्वाभाविक आहे कारण वेगळ्या वातावरणात राहिलेली व्यक्ती तुमच्या आयुष्याचा भाग होणार असते.

लग्नानंतर आयुष्य चांगल्या अर्थाने बदललं तर आयुष्याला वेगळं वळण,दिशा मिळते.जगायची मजा येते.

काहींच्या आयुष्यात लग्नानंतर अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते जी प्रत्येक क्षणाची साक्षीदार असते.चांगल्या वाईट काळात एकमेकांसोबत असते.प्रत्येक नातं परिपूर्ण बनवते.आयुष्याला पूर्णत्व देते.आपला हात घट्ट धरून मी तुझ्या सोबत आहे अशी जाणीव करून देते.सगळी नाती निभावत असते.

बायको कधी आई होते,कधी मैत्रीण तर कधी प्रेयसी.तर नवरा कधी आपला बाबा होतो,कधी मित्र,तर कधी प्रियकर.गरज पडेल तेंव्हा ती व्यक्ती त्या त्या नात्यात येऊन आपली भावनिक,मानसिक आणि शारीरिक गरज पूर्ण करत असते.
आपल्या मनातील प्रत्येक इच्छा, विचार,भीती ,अडचण बोलून व्यक्त करायची हक्काची जागा असते नवऱ्यासाठी बायको आणि बायकोसाठी नवरा.
हे नातं खूप गोड,घट्ट आणि खास असत.रुसवे फुगवे,चिडचिड,भांडणं,प्रेम,विश्वास सगळं असते या नात्यामध्ये.दोघं एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतून गेलेले असतात की एकमेकांशिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाच करू शकत नाहीत.

पण प्रत्येकच लग्न झालेल्या जोडप्यामधे अस घडतच अस नाही.काही जणासाठी लग्न ही आयुष्यभराची शिक्षा,तडजोड असते.बंधन असत.नकोस वाटणारं.
नात्यामध्ये संशय,गैरसमज,राग यांचा समावेश असतो.सतत कटकट,वाद होत असतात.वैचारिक स्वातंत्र्य,सामंजस्य,विचारांची देवाण घेवाण नसते.नाईलाज म्हणून नातं निभावलं जात.नातं तेच पण खूप तफावत असते ती निभवण्यात.एकमेकांच तोंड पण बघायची इच्छा नसते तरीही पूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवून जगावं लागतं आणि या पेक्षा मोठी शिक्षा नाही कोणती.

असं का होतं?? कधी विचार केलाय का ??

लग्नासारखे गोड संस्कार कोणासाठी आयुष्यात घडलेला सुंदर बदल असतो तर कोणासाठी आयुष्यभराची शिक्षा.

फरक फक्त नातं विकसित करण्यामध्ये होतो.कोणतही नातं एका दिवसात परिपूर्ण कधीच होत नाही.कोणीही व्यक्ती परिपूर्ण नसते तर मग नातं कसं परिपूर्ण असेल.ते परिपूर्ण बनवाव लागतं.

शेतात पीक उत्तम यावं यासाठी जसं खत पाणी , ऊन या गोष्टींची गरज असते,तसच नात्यांचं ही असतं.

नात्याला वेळ देण्याची,एकमेकांना समजून घेण्याची,चुका झाल्या तर माफ करण्याची,एकमेकांना सावरण्याची ,एकमेकांच वेगळं अस्तित्व मान्य करण्याची,वैचारिक आर्थिक स्वातंत्र्य देण्याची,गरज असते.

नवरा बायको नात्यामध्ये संवाद हवा,मैत्री हवी,आदर हवा,ओढ हवी.आणि एकमेकांची गरज हवी दोघांनाही.तरच ते नातं फुलेल,बहरेल आणि कितीही जुनं झालं तरी त्यातला गोडवा कमी होणार नाही उलट वाढत जाईल जसं जास्त मुरलेल लोणचं चवदार लागतं अगदी तसं.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!