२१ गुंता स्त्री मनाचा-नौकरी व तोच एकटेपणा-marathi kathamalika
२१ गुंता स्त्री मनाचा-नौकरी व तोच एकटेपणा-marathi kathamalika

२१ गुंता स्त्री मनाचा-नौकरी व तोच एकटेपणा-marathi kathamalika

नौकरी व तोच एकटेपणा-marathi kathamalika

सुमीचे मन आठवणींच्या लाटांवर हेलकावे खात असताना तिला आठवले माझा दुसरा मुलगाही नोकरीस लागला आणि त्याने ही लग्नाचा निर्णय सांगितला . तेव्हा मी मुलगी बघणे सुरू केले .परिचितांना मुली सुचविण्यास विनंती केली . तेव्हा कळले की लोकं दबक्या स्वरात माझ्या नवऱ्याबद्दल व मी त्याच्यापासून कशी वेगळी झाली याबाबत चर्चा करतात.

एवढ्या वर्षानंतरही माझा भूतकाळ मला सोडत नव्हता . जे मी विसरण्याचा प्रयत्न करीत होते, लोकांना ते उगाळण्यात रस वाटत होता. लग्न जुळवताना अडचणी येत होत्या. काही नातेवाईक मंडळी योग्य मुलीं दाखवत नव्हती. तर काही बोलायची, तुम्ही नवऱ्यापासून वेगळे झाल्यामुळे तुमच्या मुलांवर योग्य संस्कार नसणार अशा घरात मुलगी द्यायला लोकं कचरतात. मला खूप वाईट वाटले.
यात माझा काही दोष नसताना मला अपराधी समजतात. तर माझ्या मुलांचा काहीही संबंध नसताना त्यांना नाकारणारे लोकांची मानसिकता किती हीन आहे याबद्दल वाईट वाटले .तरी मी हिंमत न हारता प्रयत्न करीत राहिले. शेवटी एक मुलगी पसंत पडली आणि सर्व सोपस्कार होऊन लग्न ठरले.

लग्नाची सर्व तयारी करताना दमछाक झाली. आणि लग्नाचा दिवस उजाडला. लग्न सुरळीत पार पडले. दोन्ही लग्नाचे वेळी माझी सासरची मंडळी उपस्थित होती. यावेळी मात्र नवरा दिसला नाही. मनात शंकेची पाल चुकचुकली. माझी शंका खरी ठरली .

माझा नवरा गेल्या महिन्यात मरण पावल्याचे कळले. असा दुखःद अंत ,ज्यामध्ये कोणी नातेवाईक नाही, बायको, मुले नाहीत. नगरपालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावली. 

 

अरेरे.. मनातून एक आर्त हुंदका निघून डोळ्यातून आपसूकच टपोरे थेंब ओघळले . मन लग्नाच्या धामधूमीतून एका निर्जन स्थळी जाऊन पोहोचले.

सर्वत्र एकांत.. वर निळेशार आकाश.. खाली अनंत पोकळी.. सर्वत्र रितेपण.. कुठलाही ,कसलाही आवाज नाही.. काही क्षण असेच गेले. आणि मग मनाच्या गाभाऱ्यातून आवाज आला.
काय मिळाले तुला, काय घेऊन गेलास, क्षणाच्या सुखासाठी अनंत दुःखे पदरात घेऊन अहंकाराच्या अग्नीत तुझ्यासोबत मला पण आणि माझ्या मुलांना भाजून काढलेस .तुझाही फायदा नाही आणि आमचा ही नाही. काय मिळवले तू ,आणि नकळत डोळ्यातून अश्रू धारा बरसत होत्या.

जे मिळवता आलं असतं ते सर्व निसटून गेलं .कधी परत न येण्यासाठी. अगदी सहज शक्य होतं ते सहजीवन, जर तु बाहेर भरकटला नसतास तर, माझे घरटे ही आज उबदार राहिले असते.

माझ्या मोठ्या सुनेने मला हलवून हलवून आवाज देत भानावर आणले.

घर चलीये मम्मीजी सब आपका वेट कर रहे है आणि तिने माझा हात धरून गाडीमध्ये बसवले. माझ्या शरीरातून प्राण निघून गेल्यासारखे झाले होते. त्याचा शेवटचा भेटीतील भीक मागताना चा प्रसंग आणि आता त्याचा ऐकलेला दुःखद अंत यांनी माझ्या मनाचा ताबा घेतला होता.

मुलांना अजून काही कळले नव्हते .आनंदात विरजण नको म्हणून एवढ्यात काही सांगावयाचे नाही असे मी ठरवले.

नंतर दोन्ही मुले आपापल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्याची तयारी करीत असताना मोठा मुलगा म्हणाला आई तू आमच्या सोबत चल. आता माझ्या नौकरीला अजून दोन वर्ष शिल्लक होते मी म्हणाले तिथे येऊनही मी काय करू. इथे ऑफिसमध्ये वेळ जातो आणि मन गुंतून राहते. आणि दोन वर्षानंतर तर यायचेच आहे ना. मुलांना ते पटले. ती निघून गेली.

पुन्हा मी आणि माझी नौकरी व तोच एकटेपणा…

सुमीची नौकरी आणि एकटेपणा याशिवाय तिच्या आयुष्यात काहीच नाही का?तिच्या एकाकी आयुष्यात रंग भरले जातील का?…
पुढील भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/22गुंता-स्त्री-मनाचा

यापूर्वीच्या भागाची लिंक

गुंता….कथामालिका कशी वाटत आहे….नक्कीच कळवा

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!