२२ कथा-गुंता स्त्री मनाचा -आठवणींची तिजोरी 
२२ कथा-गुंता स्त्री मनाचा -आठवणींची तिजोरी 

२२ कथा-गुंता स्त्री मनाचा -आठवणींची तिजोरी 

कथा-गुंता स्त्री मनाचा -आठवणींची तिजोरी

सुमीच्या आठवणींची तिजोरी यावेळी भूतकाळाच्या त्या दुनियेत घेऊन गेला जिथे तिला जगण्याचा आधार मिळाला होता. तिला आठवले,

माझा सहकारी मित्र दिपकची पत्नी जी माझी चांगली मैत्रीण पण होती, माझ्या पहिल्या मुलाच्या लग्नाच्या वेळी आजारी होती. पण दोघेही त्यांच्या मुलीसह लग्नाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर तिच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सर्व जण लवकर परत गेले.

मी इकडे माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना तो पत्नीच्या सेवेत व्यस्त होता. दरम्यान माझे पण वेळ मिळेल तशी तिच्या भेटीला जाणे सुरू होते. लग्नाच्या जबाबदारीतून उसंत मिळताच मुलांना घेऊन मी त्याच्या पत्नीच्या भेटीसाठी गेलो. आता ती जास्तच अशक्त दिसत होती. तिच्या बिघडत चाललेल्या तब्येतीमुळे मुलांना पण वाईट वाटत होते. मावशी तुम्ही लवकर बऱ्या व्हाल. मुलांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. तशी ती क्षीण हसली. आता त्यांची मुलगी पण सोबत होती.

मी मुलीच्या कामात मदत केली. सावीला काय खाणार , काय करून देऊ, मी विचारताच ती म्हणाली, तुझ्या हातची खीर मला आवडते. मी तिच्यासाठी खीर बनवली. तिला माझ्या हाताने भरवली . सर्व वातावरण भावूक होते. काहीतरी अघटित घडणार, असे निराशाजनक विचार प्रत्येकाच्या मनात होते. त्याची मुलगी आणि दिपक तर फार कोमेजून गेले होते .त्यांचा निरोप घेताना फार वाईट वाटत होते. काही मदत लागली तर फोन करा, असे म्हणून आम्ही परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दिपक चा फोन आला. ती गेली . आम्ही सर्वजण तात्काळ त्याच्या घरी पोहोचलो. त्याच्या नातेवाईकांचे नंबर घेऊन मुलांनी सर्वांना कळवले. तो तिच्या मृतदेहा शेजारी बसला होता .मी आणि शेजारी यांनी लागेल ती मदत केली. नंतर त्याचे नातेवाईक आले .अंत्ययात्रा निघाली. तिचा मृत्यू मन हेलावून गेला. गेले दोन तीन दिवसा पासून आम्ही सर्वजण त्याच्या घरी रोज जाणेयेणे सुरू होते.तेरवीचा कार्यक्रम संपला.आलेले पाहुणे पण काही दिवसांनी निघून गेले.

काही दिवसांनी त्याची मुलगी शिक्षणासाठी निघून गेली . माझी मुले व सूना पण आपापल्या नोकरीच्या ठिकाणी निघून गेले. दिपक चे कार्यालय वेगळे होते , माझे वेगळे .आम्ही आपापल्या नोकरीवर रुजू झालो. काळ हेच सर्व दुःखावर औषध आहे हे माहीत असल्याने आता माझ्या कोणत्याही शाब्दिक समजुतीने त्याचे सांत्वन होणार नाही.म्हणुन मी तेथून निघाले.
मध्ये मध्ये त्याच्याशी फोनवर बोलून त्याला मानसिक सांत्वना देण्याचा मी प्रयत्न करीत होती . तोही आता पूर्वीसारखा फार बोलत नव्हता .तो काळाच्या ओघात हे दुःख विसरेल असे वाटले . जवळचे नातेवाईक म्हणजे त्याची बहिण काही दिवस त्याच्यासोबत घरी थांबलेली होती. पण पंधरा-वीस दिवसांनी ती पण तिच्या घरी निघुन गेली .

खूप एकटं-एकटं वाटतं, घरी अजिबात राहवत नाही, एकांत खायला उठतो. असे तो माझ्याशी फोनवर बोलला. ते स्वाभाविकच होते .त्याला वीकेंडला मी माझ्या घरी जेवायला बोलावले. तो पण आला. काहीतरी जेवायचे म्हणून जेवला. शरीराने कुठे आणि मन दुसरीकडे अशी त्याची अवस्था झाली होती. त्याच्यातला उत्साह पूर्णपणे मावळला होता .

पुढच्या विकेंडला कुठे बाहेर जेवायला जाऊ या का असे मी त्याला विचारले तर त्याने होकारार्थी मान हलवली. जेवढे प्रश्न विचारले तेवढेच तो उत्तर द्यायचा. अबोल झाला होता .

प्रत्येक विकेंडला मी त्याच्या सोबत असायची. त्यामुळे आता तो बऱ्यापैकी मोकळा झाला होता, थोडासा सावरायला लागला होता.

माझी मुले , त्याची मुलगी आली की आमची जेवणे एकत्रच व्हायची. त्याची मुलगी माझ्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करायची.वडिलांच्या प्रकृतीबाबत ती काळजी करायची. मला त्यांच्याकडे लक्ष ठेवण्याविषयी नेहमी सांगायची. मी योग्य ती मदत वेळोवेळी करीत होतेच.

क्रमशः

परिस्थितीमुळे जवळ आलेले सुमी-दिपकचे आयुष्य पुढे काय वळण घेईल…….वाचत रहा कथामालिका गुंता-स्त्री मनाचा.

याआधीच्या भागाची लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!