अनुभूति यशाची- लघूकथा
अनुभूति यशाची- लघूकथा

अनुभूति यशाची- लघूकथा

अनुभूति यशाची- लघूकथा

छोट्या गावात जन्मलेला अल्पेश नावाचा एक सुप्रसिद्ध चित्रकार असतो. सगळीकडे त्याचाच नावाचा बोलबाला असतो. कारण अल्पेश अशा पद्धतीने चित्र रंगवत असे की, काढलेले चित्र जणू बोलके वाटायाचे.
रंगाच्या अनोख्या दुनियेत तल्लीन होऊन अल्पेश चित्र रंगवण्यात मग्न होत होता.
एकदा का एखादे चित्र बनवण्यासाठी अल्पेशने सुरवात केली कि, मग्न होऊन, चित्र पूर्ण होईपर्यंत अल्पेशला तहान भूकचा विसर पडायचा.
अल्पेश चित्र रंगवताना जीव ओतून असे रंगवत असे की, जणूकाही जिवंत व्यक्तिमत्त्व समोर उभे असल्याचा भास होई.
अल्पेश चित्रकलेचा इतका दीवाना असतो की, देहभान हरपून चित्र काढे.
त्यामुळे…
अल्पेशची चित्रकला सर्वांना मोहून टाकणारी होती. आणि अल्पेशच्या चित्रांना सगळीकडे खूप मागणी होती.

अल्पेशला एक कुमार नावाचा मुलगा असतो.
कुमार लहानपणी पासूनच अल्पेशची पेंटिंग निरीक्षण करून पहायचा. ईवल्याश्या हाताने वडिलांसारखेच कुमार सुद्धा चित्र रंगवण्याचा प्रयत्न करायचा.
कालांतराने कुमारला चित्रकलेत कधी रुची निर्माण झाली कळलेच नाही. बघता-बघता कुमार सुद्धा अल्पेशला चित्र काढण्यात मदत करू लागतो.

कुमारची चित्र काढण्याची रुची पाहून अल्पेशला अत्यंत खुशी होत होती. कारण….!
कारण… अल्पेश सुप्रसिद्ध चित्रकार असल्याने अल्पेश जवळ काम खूप असायचे. अल्पेशच्या चित्रांना खूप मागणी होती. आणि वडीलोपार्जित कला कुमारकडून जोपासली जाणार ही वेगळीच खुशी होती.

कुमार चित्रकलेमध्ये जसा प्रवीण होता त्याच प्रमाणे अभ्यासातही तितकाच हुशार होता.

एक दिवस अचानक रोजच्या दिनचर्या प्रमाणे शाळेत जात असतांना कुमारच्या शाळेच्या रस्त्यावर एक भयंकर दुर्घटना घडते. दुर्घटनेचे रूप एवढे भयंकर असते की, “दुर्घटनास्थळी एका छोट्या मुलाला उपचाराविना आपले प्राण गमवावे लागतात”.

ही घटना कुमारसाठी एक आघात ठरतो आणि कुमार स्वतःच्या जीवनाचे एक उद्दिष्ट ठरवतो की,

” मी वैद्यकीय शिक्षण घेणार आणि वैद्यकीय पदवी घेऊन अशा प्रकारे उपचाराविना कोणाचेही प्राण माझ्यासमोर जाऊ देणार नाही”.

कुमार आपल्या जीवनाचे उद्दिष्ट अल्पेश जवळ बोलतो. कुमारचे उद्दिष्ट एकूण अल्पेश निश:ब्द, स्तब्ध होतो. कारण अल्पेश जवळ काम खूप असते त्यामुळे कुमारच्या हातभराची अल्पेशला गरज असते आणि वयोमानानुसार अल्पेशला आता काम पहिल्यासारखे काम होतही नाही.
पण…
अल्पेशला लगेच मनात विचार येतो की, आपण स्वतःच्या आयुष्यात चित्रकार बनू इच्छित होतो आणि आपण चित्रकार बनलोही.
म्हणजेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आणि आपण आपल्या जीवनात सफल झालो.
स्वतःच्या जीवनात सफल झाल्यावर जी खुशी होते ती अनुभूति चा अनुभव आहे मला.
आणि स्वतः च्या जीवनात सफलतेच्या अनुभूति चा कुमारला ही अनुभव मिळायलाच पाहिजे.

दुसऱ्याच क्षणी अल्पेश कुमार समोर एक अट ठेवतो. “कुमार बेटा तुला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचे असेल तर, कॉलेजमध्ये तुला पहिला यावे लागेल”.

“कुमार ची जिद्द आणि जीवनाचे उद्दिष्ट अल्पेशची ही अट स्विकारतो”.

आणि बारावीत दिवस-रात्र अहोरात्र मेहनत घेऊन अभ्यास करू लागतो.
कुमारची स्वतःचे उद्दीष्ट पूर्ण करण्याची धडपड कुमारला स्वस्थ बसू देत नसायची.

बारावीची परीक्षेला सुरवात होते.

परिक्षा संपल्यानंतर निकाल लागेपर्यंत चा काळ कुमारसाठी खुप कठीण असतो. कारणं फक्त चांगले गुण मिळूण कुमारचे उद्दीष्ट पूर्ण होणार नव्हते. तर महाविद्यालयात प्रथम येणे गरजेचे होते. पण कुमारचा आत्मविश्वास मजबूत असल्याने कुमारला धीर मिळायचा.

“अखेर तो दिवस उजाडतो निकालचा”.
सकाळ पासूनच त्याचे कशातच लक्ष लागत नसते.
“जर निकाल मनासारखा आला नाही तर,…आपले उद्दीष्ट…..”.
पण कुमारने खुप मेहनत घेऊन अभ्यास केलेला असतो आणि सोबत कुमारची ईच्छाशक्ती असते की, विनाउपचार कोणाचेही प्राण जाऊ देणार नाही.
अखेर ..निकाल नावाचा..तो कागदाचा तुकडा कुमारसाठी किती महत्वाचा आहे हे फक्त कुमारच समजू शकत होता.

कुमारचा निकाल कुमारच्या मनासारखे घडवुन आणतो.
कुमार कागदाचा तुकडा (निकाल) घेऊन अल्पेशकडे जातो…आणि दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात…एक कागदाचा तुकडा दोघांना मनाने जवळ आणतो. आणि कुमारच्या उद्दीष्ट पूर्ती साठी ची योग्य वाटचालही ठरतो.

स्मिता औरंगाबादकर

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

7 Comments

    1. डॉ. संगीता किशोर वळसे

      अपघातानंतर ची व्यथा

      ध्येय परिवर्तनाची कथा

      खूपच छान आहे……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!