छाया

मावशी .. मावशी ..
काय ग राणी..?

आरती हात पुसत बाहेर आली…
अग मावशी आज दोन वेण्या घालून शाळेत जायचे आहे दे बर लवकर करून.
अरे हो.. चल लवकरआणि हे लहान पिल्लु काय करत आहे.?

आरतीने आवाज दिला.
आलो ग मावशी..\

चिकू धावत आला.
चला लवकर मम्मीला टाटा करा. तिघेही सोबतच खाली उतरले.मुलांना बसमध्ये बसवून आरती वर आली.घरात सर्वत्र पसारा. किती पसारा मांडतात ही मुले ..मनाशीच पुटपुटली आरती.घाईने स्वयंपाकघरात शिरली.ताई आणि साहेबांचा चहा .. नंतर ताईचे औषध .. सर्व बाकी होते.
आरती …आरती चहा आण छायाला....

केतनने आवाज दिला.
हो .. आलीच..साहेब
छान वाफळलेला चहा पिऊन छायाला बरे वाटले.किती तरी महिने झाले ती अशीच पंलगावर पडून होती.सर्व घर आरतीच्या स्वाधीन करून ती निश्चित होती.आरती नसती तर.. माझ्या घराचे काय झाले असते?
माझी मुले त्यांचा अभ्यास खाणे पिणे केतनचे आॕफिस..
बगीचा सर्व कुणी केले असते?आरतीचे हास्य …घराला किती जिवंत करते. कुणी कुणासाठी इतके समर्पित होऊ शकते याचे नवल वाटते.

सर्व छान चालले होते. काही कमी नव्हते… संसारात
चोहीकडे फक्त आंनद आणि सुख.केतन सारखा प्रेमळ नवरा दोन गोंडस मुले …स्वतःचा टुमदार बंगला..अजून काय हवे असते संसारात? पण या सुखात आरतीचा श्वास कधीच गुदमरला नाही त्याला कारणही तसेच होते ..घरात सुखासोबत प्रेमाची बरसात होती…केतनचे अमर्याद प्रेम होते तिच्यावर. लहान..सहान गोष्टीकडे लक्ष…घरात पैसा आणून टाकला आणि झाले असा बेपर्वा नव्हता तो. आयुष्यातील प्रत्येक क्षण तो फुलवायचा.सुंगधाने दरवळत होते ते दिवस. तिने तर या सुखाच्या कोषात स्वतःला घट्ट गुरफटून घेतले होते.

छाया.छाया..

केतनच्या आवाजाने ती दचकली..
येतो मी.. काळजी घे

म्हणून तो आॕफीसला गेला.आधी तो जाताना किती वेळ त्याला बघायची. पण आता… तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.आता ती एकटी एकाकी .. कुणीतरी अचानक पंख कापावे असे झाले तिचे ..
ताई..ताई

आरतीने आवाज दिला.छाया डोळे पुसत होती.
हे काय  … होईल सर्व ठीक. बघा दोन…तीन महिन्यात कशा चालायला लागाल तुम्ही.
आरती.. आपले काहीच नाते नसून सुध्दा सेवा करते माझी.कामवालीची मुलगी पण माझ्यासाठी सर्वस्व..तु नसती तर या घराचे काय झाले असते?

मला सर्व कळते ग.. मी तीन..चार महिन्याची सोबती …
माझा आजार जीवघेणा आहे.. शरीर आतून जर्जर झाले आहे.घरात जीव अडकला आहे ग माझा.देव पण बघ कसा करतो… या घराला माझी गरज आहे हे त्याला कळत नाही का?
आरतीने घर आवरले.

छायाकडे येऊन  आता वर्षे झाले होते.चांगले  शिक्षण  सुरू  होते तिचे आई..बाबा दोघेही  मेहनत  करून  आरतीला शिकवत होते.आई छायाच्या घरी स्वयंपाक  करायची.अगदी घरातली  होऊन  गेली  होती ती.कोणतीही  अडचण  आली तरी छाया सोडवायची … खासकरून पैशाची. आई नेहमी म्हणायची अशी देवमाणसं मी बघितली नाही.त्यांचे खूप  उपकार आहेत आपल्यावर.दिवस चालले होते अचानक  बाबा गेले..आठ दिवसाचा आजार आला काही  कळलेच नाही  तेव्हा  पण छायाने किती  मदत केली.दिवस चालले होते.काॕलेजला सुट्या  लागल्या  होत्या.
एक  दिवस  अचानक  छायाची तब्येत खराब झाली. आणि  समोर तर ती चांगलीच ढासळली.घरात दोन छोटी  मुले कोण  सांभाळून  घेणार ? त्यांची तगमग बघून  आरतीच्या आईने आरतीला छायाकडे पाठवले.आता घरातील वातावरण  आंनदी दिसत होते मुले  खूष   होती.सर्व  जबाबदारी  आंनदाने पार पाडायची आरती.छायाला तर जवळची मैत्रीण  मिळाली  होती. छायाची तब्येत खालावत होती.शेवटी कॕसरचे निदान झाले.आपल्या  जवळ जास्त  दिवस नाहीत हे कळून  सुध्दा केतनला धीर देत होती.
केतन आतून  खचून  गेला होता.पण वरवर आंनदी रहायचा.आपण  गेल्यावर  माझी  मुले..हे घर ..कोण  सांभाळेल याचा विचार  येताच  तिच्या  समोर केतनच्या दुसऱ्या  लग्नाचा विचार येत होता.किती  छळायचा तो विचार  तिला.दुसरे  लग्न  छे..छे.. मला तर कल्पना  सुध्दा सहन  होत नाही.माझा केतन खरेच मी दुसऱ्या स्त्री  बरोबर बघू शकेल का? तिचेच प्रश्न  आणि  तिचेच उत्तर  असह्य  मारा करायचे तिच्यावर.
दिवस चालले होते. मुले  आता जास्तीत  जास्त आरतीकडे राहायची.त्यांचा अभ्यास खाणे सर्व काळजीने करायची आरती.छायाची आंनदाने सेवा  केली पण नियतीने आपला  डाव साधला. छाया निघून  गेली.केतन एकटा  पडला.मुले  आरतीच्या प्रेमाने  लवकरच  सावरली.
तिला  आता तिथे  राहणे बरे वाटत नव्हते.जायचे नाव काढले तर मुले  रडायची.  केतन जास्त  वेळ आॕफिस मध्ये घालवायचा. रात्री  कधीतरी तो घरी येत होता.
आज रविवार  मुलांचे कपाट .. पसारा  आवरायला घेतला केतनने.छाया गेल्यापासुन तो त्या खोलीत गेला नव्हता. सर्वत्र  त्याला छायाचा भास होत होता.तिच्या  साड्या..दागिने  त्याला जणू  आवाज देत होत्या. सारे कसे उजाड
 हरवलेले वाटत होते.छाया..छाया किती  घाई केली  ग…
 मी एकटा कसा जगू म्हणून केतन  रडू लागला…पंलगावरून हात  फिरवू लागला. हाताला काय तरी कागद लागला. काय असेल? कागद  उघडून  बघितले तर केतनला आश्चर्य  वाटले  अक्षर  छायाची होती.तो वाचू लागला.
 केतन…मला माहिती  आहे माझ्या  कडे जास्त  वेळ नाही.
 मी गेल्यानंतर  या घराचे काय होईल या काळजीत  राहत असशील.
 किती खोटा बोलतो रे माझ्याशी  ..धीर  पण किती  देतो… नक्कीच  या आजारपणातून बाहेर निघणार असे खोटच सांगत  असतो. मला माहीत   आहे ..मी तुम्हाला  सोडून लवकरच  जाणार  आहे..या घराच्या प्रत्येक  कोपऱ्यात  माझा श्वास  अडकून  आहे..माझी मुले … माझे  घर.माझा  फुललेला संसार  सोडून  कशी जाऊ मी?देव तरी का असे  करत असेल?माझी गरज आहे घराला..कितीतरी  जबाबदाऱ्या  आहेत.आणखी  काही  वर्ष  मी जगायला हवी पण मी देवाला जरा जास्तच  आवडली … बघ ना कसे लवकरच  तो मला घेऊन  जाणार  आहे.केतन त्या दिवशी  तुम्ही  चौघे बाहेर गेले.. मला आरतीचाच राग आला.. पण तिला  तर मुलांनी  जबरदस्तीने  बाहेर नेले होते. मुले समोर आली आणि  तुम्ही  मागे होता दोघे.. मला  तर सोबत बघून  धस्स झाले ..मनात  वाईट  विचार  डोकावला.आरती किती  निष्पाप … साधी..मलाच माझा राग आला…पण आता मनाची  तयारी केली ..
पण केतन एक  सांगू  का?
तुला… मुलांना  आरतीच सांभाळून  घेईल. तीच तुझी छाया बनेल.तुम्ही  लग्न  करा.. करशील ना एवढे  माझ्यासाठी..….चिठ्ठी  केतनच्या अश्रूत भिजून  गेली…..

 

5 Comments

  1. PRAVIN DANI

    खुपच सामंजस्ययणा …दु:खाच्या वेलीवर सुखाची फुले असे सुंदर कथानक …ज्याोती बेन

Comments are closed.

error: Content is protected !!