१६-हरंवून गेल्या जाणिवा-marathi kathamalika
सौ. दर्शना भुरे…
परिस्थितीच अशी आली कि मधुकररावांना लहानग्या वैकुंठाचे लग्न घाईत लावून द्यावे लागले. लग्नाची बातमी विमल आणि मधुकरराव घरी येऊन सांगणार होते..
पुढे..
वैकुंठा चे सासर मागे टाकून गाडीने आता वेग धरला होता. येताना वैकुची गाडीत अखंडपणे बडबड, मस्ती चालू होती.. घरी परतताना ती सोबत नव्हती.. वैकु शिवाय प्रवास विमलला कठीण जात होता. तिच्या आठावणीने डोळे पाझरत होते.मधुकर रावची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती. ते विमल पासून नजर चुकवत गाडीतून उगीचच खिडकी बाहेर बघत होते.
त्यांच्या मनाला अजून एक काळजी वाटत होती.
वैकुंठाच्या लग्नाचे समजल्यावर काय म्हणतील घरी नर्मदाताई, कमल वहिनी बाकी मंडळी?
पण परिस्थितीच तशी निर्माण झाली होती… समजून घेतील सगळे….ते मनाला दिलासा देत होते.
गाव जवळ आले तेव्हा दुपारचे चार वाजले होते. विमलने गाडी बाहेर नजर टाकली.
पावसाळ्याचे दिवस होते.आभाळ ढगांनी गच्च भरले होते.रिमझिम पाऊस पडायला सुरूवात झाली होती. वैकुचा आवडता पाऊस…विमलचे डोळे पुन्हा भरुन आले.
तिने पिशवीतून दोन शाली काढल्या.. एक शाल मधुकरराव ला पांघरायला देवून एक स्वतः च्या अंगावर पांघरूण घेतली..
गावच्या वेशीजवळ गाडी थांबली तशी दोघे उतरली..विमल इकडे तिकडे बघत मधुकरराव ला म्हणाली,
अहो..घरून निघतांना रामू ला फाट्यावर गाडी घेऊन येण्यासाठी सांगितले होते ना..
हो ग, पाऊस येत आहे, चिखलाची वाट आहे..उशीर लागत असेल..निघाला असेल तो..आडोशाला उभे राहून वाट बघू थोडावेळ..
रामू बैलगाडी घेऊन लगेचच पोहचला .. गाडीत सामान ठेवून उभयता घराकडे निघाली..
वैकुंठा सोबत दिसत नव्हती म्हणून रामू ने विचारले..
मालक छोट्या ताईसाहेब नाही आल्या का सोबत? गावी राहिल्या का मुक्कामी?
सोबत असत्या तर एव्हाना बैल जोडीचा कासरा हातात घेऊन बैल हाकायची जिद्द केली असती ताईसाहेबानी …
रामूच्या प्रश्नाला एकदम काय उत्तर द्यावे म्हणून मधुकरराव ने नुसती होकारार्थी मान हलवली.. बैल गाडीत शांतता पसरली होती.कोणी कोणाला बोलत नव्हते..
दूरपर्यंत नुसता बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आणि गाडीच्या चाकांचा आवाज ऐकू येत होता.
घरासमोर बैलगाडी येवून उभी राहिली.मुलं बाहेर खेळत होती.. रामूने गाडीला जुंपलेल्या बैलांना मोकळे सोडून एका पत्राखाली बांधले.
घरात सायंकाळच्या चहापाण्याची तयारी सुरु होती. चहाचा दरवळ बाहेरपर्यंत सुटला होता. विमल, मधुकरराव ने हातपाय धुवून जमिनीवर टेकताच कमलने त्यांच्या हाती वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणून दिले …नुकत्याच पावसामधून परतलेल्या त्या दोघांना कमल वहिनी ने दिलेला गरमागरम चहा पिऊन बरे वाटले. त्यांची प्रवासाली सारी मरगळ दूर झाली..
वैकुंठा घरात नाही आली. बाहेरच रमली का मुलांसोबत आल्या बरोबर?
नर्मदा ताईचा आवाज कानावर पडताच विमल चमकून मधुकरराव कडे पाहत म्हणाली…
नाही आली ती…
का आप्पासाहेबाकडे थांबली का?
अरे..मधुकरा लक्षात येते का? ते होणारे व्याही आहेत तुमचे.. तिचे होणारे सासर आहे ते.. तिला असे लग्नाआधीच तिथे ठेवले.. बरे दिसते का हे.. एवढे पण लाड पुरवू नाही लेकीचे..
आता ते होणारे व्याही नाही राहिले किंवा ते वैकुंठा चे होणारे सासर ही नाही राहिले..
काय? बोलत आहे तू..नर्मदाताई आश्चर्य चकीत झाली..
लग्नाला नाही म्हणतत का?अरे पण साखरपुडा …नर्मदाताई घाबरुन विचारायला लागल्या.
लग्न लावून दिले वैकुचे..
काय?
वेळच तशी होती ताई.
अरे दादा एवढी कसली घाई पडली तुला.. परस्पर तिचे लग्न लावून मोकळा झाला.. मान्य आहे ती तुझी मुलगी आहे म्हणून..तरी पण…मला हे पटले नाही…
दिवाकर मध्ये बोलला
अरे तुम्ही सर्वजण असे नाराज होऊ नका .. परिस्थितीच अशी निर्माण झाली होती.. असे म्हणत मधुकरराव ने कांताप्रसाद विषयी, त्यांच्या अंतिम इच्छेविषयी त्यांना सविस्तर सांगायला सुरुवात केली…
त्याचे सविस्तर बोलणे ऐकून एकंदर परिस्थिती समजून सर्वांची नाराजी तर दूर झाली., पण घरातील मुलीचे पहिले लग्नकार्य अशा रीतीने पार पाडावे लागले …म्हणून वाईट ही वाटले…
सगळ्यांची लाडकी वैकु आणि तिचे असे सगळ्यांच्या माघारी लग्न…वाईट वाटणारच….
क्रमशः
Next Part
https://marathi.shabdaparna.in/१७-हरवून-
Previous Link
https://marathi.shabdaparna.in/१५-हरवून
वैकुंठा-विनायकचे लग्न तर झाले.पुढे बहरतो का त्यांचा संसार कि……वाचा पुढील भागात
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
लहानग्या वैकुंठाच्या कथेची सुंदर मांडणी
पुढे काय असणार वैकुंठाच्या आयुष्यात ?
छान