५ गुंता-एका स्त्री मनाचा
५ गुंता-एका स्त्री मनाचा

५ गुंता-एका स्त्री मनाचा

प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहित रहा…..
शब्दपर्ण फुल ना फुलाची पाकळी म्हणून  शब्दपर्णसाठी जे लेखक लिहितील  त्यांना views नूसार मानधन देणार आहे.
१००० views.ला १५ रु…..याप्रमाणे.

लिखाण पाठवण्यासाठी marathi.shabdaparna.in वर Registration करा.
Registration करायला काही अडचण आल्यास
9867408400 वर तुमचा नंबर आणि  नाव पाठवा.आम्ही Registration करुन देवू.

५ गुंता-एका स्त्री मनाचा

दुसऱ्या दिवशी मैत्रिणीसोबत काही कामाने कॉलेजला जात असताना रस्त्यात तो मागोमाग येत असल्याचे दिसले. मी दुर्लक्ष करून मैत्रिणी सोबत गप्पा करीत चालत होते. त्याने आवाज दिला ,

सुमे…

मी मागे वळून बघितले .काय आहे ?

मैत्रिणी पुढे निघून गेलेल्या .

तुझा निर्णय सांगितला नाहीस?

मी अनभिज्ञता दाखवत कशाबद्दल ?

अरे लग्ना बद्दल.. तुझी बहीण वाईट आहे. तू सांग माझ्या सोबत लग्न करशील का ? मी काही बोलले नाही व पुढे जात राहिले. तो मध्येच अडवत म्हणाला, थोडा वेळ ह्या गार्डन मध्ये बसून बोलू या का?

मी स्पष्टपणे नकार दिला .मी त्याच्याशी अशी बोलताना माझ्या मैत्रिणींना काय वाटेल. असा विचार मनात आला आणि मी झर झर पावले टाकीत त्यांना गाठले .तो बराच वेळ तिथे उभा राहिला.

कॉलेजमधून घरी गेल्यावर माझी बहीण डोळे वटारून पाहत होती. तिची ती भेदक नजर मी सहन करू शकले नाही .तिला वाटायचे ते वाटले आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. मी तिला कधीही उलट उत्तर देत नव्हतेच. त्यामुळे गपगुमान घरच्या कामाला लागले घर झाडणे, झाडांना पाणी देणे, वाळलेले कपडे काढून घड्या करणे ,दिवाबत्तीची सोय आणि सायंकाळचा स्वयंपाक. हे करीत असताना डोक्यात आपसूकच माझ्या चुलत भावाचे, वहिनींचे आणि त्याचे विचार, त्याचे बोलणे आठवत राहिले .यात तिचे बरळणे ऐकूही येत नव्हते.मी तिला प्रतिसाद देत नाही असे पाहून ती अधिकच चवताळली. धावत येऊन तिने माझे केस धरून भिंतीवर आपटले आणि मारहाण करायला लागली.तेव्हा मी तिच्या हातून सुटका होण्यासाठी तिला दूर ढकलले. तशी ती भिंतीवर जाऊन पडली. आणि मला मारले म्हणून ओक्साबोक्शी रडू लागली.

सुमीने मला मारले असे शेजारीना ऐकू जाईल अशा आवाजात ओरडून सांगत होती. त्यात तिला धाप लागली .मी आता मरणार आहे .माझ्या मुलीला कोण सांभाळेल? हिच्यामुळे माझी मुलगी अनाथ होईल .हिच्या मनासारखे होईल. मला खूप अपराध्यासारखं वाटू लागलं , मी तिच्या समोर हात जोडून खूप रडू लागले .

बाई मला माफ कर ग.मी तुला मारले नाही वगैरे.. आणि तिला दवाखान्यात घेऊन गेली . डॉक्टरांनी तपासले व काही झाले नाही असे सांगितले तेव्हा बरं वाटलं.घरी आलो. फार वाईट परिस्थिती होती ती.मी विचार करू लागले .हे असेच चालू राहणार. मी निरपराधी असूनही त्याचा कितीही पुरावा द्यावा हिला. तरी ही मानणार नाही.
1 सप्टेंबर 1990 काहीतरी निर्णय घेऊनच उजाडला .पावसाची रिमझिम सुरू होती. माझी बहीण बाहेर गेली होती .आई बाबा कामावर गेले होते. बहिणीची छोटी दहा वर्षाची मुलगी घरी होती .तिला घेऊन मी निघाले .थेट त्याच्या खोलीवर .आणि त्याला म्हणाले ,मी घर सोडून आले तुझ्या सोबत लग्न करायला.
थोडा वेळ विचार करत म्हणाला ठीक आहे. त्याने दरवाज्याला कुलूप लावले .मी छोटीला म्हणाले तु ही छत्री घेऊन घरी जा .आई घरी आल्यावर तिला सांग मावशी दिपक सोबत गेली म्हणून . ती आर्त स्वरात म्हणाली

,मावशी नको जाऊ ना ग,आई खूप रागावेल.

माझ्या डोळ्याला धारा लागल्या . मी तिला घट्ट कवटाळले . माझ्या ने शब्द फुटेना तरी तिला म्हटले काही,

होणार नाही ,तू रडू नकोस .माझ्याने तिला सोडवेना. संपूर्ण घरात घरात जर माझा जीव कोणात असेल तर या छोटीत.ती माझा जीव की प्राण होती.आई,बाबा आणि ही यांना सोडून जातांना मन खूप हळवे झाले होते. खूप खूप रडू येत होते. तोंडातून शब्द निघत नव्हते, तिला म्हणाली, बाळ सांभाळून जा रे ..काळजी घे. ती निघाली आणि आम्ही दोघेही …. पण वेगवेगळ्या दिशेने..

.छोटी घरी जायला निघाली तेव्हा मी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत राहिले. बऱ्याच वेळाने ती दिसेनाशी झाली. तेव्हा तो म्हणाला ,चल निघू या. हं.. माझ्या तोंडून निघाले आणि मी डोक्यात असंख्य विचारांचे काहूर सोबत घेऊन त्याच्या बरोबर चालु लागले .

ना प्रेमाची कबुली, ना कोणते वचन, तरी मी त्याच्यासोबत संसार करण्यासाठी त्याच्या मागोमाग चालु लागले.

क्रमशः

  https://marathi.shabdaparna.in/६-गुंता

सुमीच्या आयुष्यात पुढे काय होते? परवड सुरु राहिल कि सुखाचा शिडकावा येईल कि गुंता वाढत जाईल…..वाचत रहा पुढील भाग
आणि कथा तुमच्या मनापर्यंत पोहचत असल्यास नक्की like करा.
तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईल.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण पाठवून शब्दपर्ण टीममध्ये सामील व्हा.

 

 

2 Comments

  1. Mohini1408

    खूप धाडसी निर्णय घेतला सुमी ने.
    पुढे काय वाढून ठेवलं, तिलाही माहिती नसणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!