सुमीला ते दिवस आठवून तिच्या डोळ्यात एक वेगळेच तेज आले .तिला आठवले ..
.माझे नियुक्तीचे ठिकाण हे माझ्या शहरापासून लांब आदिवासी दुर्गम क्षेत्र होते. परंतु” जिथे भरला दऱ्या तोच गाव बरा .” या उक्तीप्रमाणे तेथे रीतसर रुजू झाले. तो आदिवासीबहुल अविकसित असा तालुका होता .आणि तिथे एका छोट्या शैक्षणिक संस्थेची प्रमुख म्हणून मी रुजू झाले .तेथील कर्मचाऱ्यांनी माझे यथोचित स्वागत केले तसेच विद्यार्थिनींनी सुद्धा उस्फुर्त स्वागत केले.मी माझ्या खुर्चीवर नमस्कार करून बसतांना मला सार्थ अभिमान वाटला. तसेच आलेल्या जबाबदारीची जाणीव झाली.
माझा स्वभावच मुळात प्रामाणिक असल्याने माझे काम प्रामाणिकपणेच करेल असे स्वतःला प्रॉमिस केले. सर्वांचे आभार मानून सर्वांना सहकार्याबाबत आवाहन केले .त्यानंतर माझ्या कर्मचाऱ्यांनी मला सर्व संस्थेची व कामाची थोडक्यात ओळख करून. दिली असा तो पहिला दिवस आनंदाने उत्साहाने भारलेला होता.
एक स्वप्न साकार झाले .पण स्वप्नापर्यंत पोहोचायला मला बाबांनी शाळेत टाकले तेव्हापासून खूप कष्ट घेतले होते .माझ्या स्वप्ना पर्यंतच्या प्रवासासाठी माझी कष्टप्रद वाटत तर कारणीभूत होतीच. पण माझ्या बाबांचा मला शाळेत घालण्याचा निर्णय अधिक महत्त्वाचा होता. त्यांनी मला शाळेत घातलेच नसते तर ..आज हा स्वप्नपूर्तीचा आनंद सोहळा माझ्या वाट्याला आला नसता.
या वळणावरुन मागे वळून बघताना, मला वाटते माझ्या यशामध्ये जसा माझ्या कष्टाचा वाटा होता तेवढाच मला वेळोवेळी मदत आणि प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींचा सुद्धा वाटा आहे. त्यावेळी सुमीला आठवले ,माझे बाबा ज्या ठिकाणी कामाला होते तेथील मालकाने, आमच्या घरी लाईट नव्हती. मी छोट्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करते. हे त्यांना कळले तेव्हा त्यांनी माझ्या अभ्यासासाठी म्हणून बाबांजवळ नविन कंदील पाठविला होता. तो मी आठवी ते बारावी पर्यंत वापरला.
दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशापेक्षा कंदिलाचा प्रकाश जास्त होता .आणि दिव्याची वात वार्याच्या झोताने इकडून तिकडे हलायची त्यामुळे प्रकाशावर परिणाम होई.पण या कंदीलाला तर काचेची पायली (कवच) होते. त्यामुळे वात सतत जळायची. रोज सायंकाळी दिवाबत्ती करताना मी कंदिलात रॉकेल भरणे, वात काजळी काढून नीट करणे ,पायली कापडाने पुसून स्वच्छ करणे इत्यादी कामे नेमाने करीत असे. त्यामुळे तो कंदील माझ्यासाठी किती महत्वाचा होता आणि तो देणारे ते मालक पण.
तसेच माझी आई ज्या ठिकाणी कामाला होती त्या मालकीणबाई दरवर्षी माझा रिझल्ट आवर्जून बघत आणि माझे कौतुक करीत व मला प्रोत्साहन म्हणून दहा रुपये देत. खरंच किती महान वाटल्या त्या मला. अशी निर्मळ मनाने माझे चांगले व्हावे असे वाटणारे लोक मला लाभले याचा माझ्या जडणघडणीवर प्रभाव पडला.
मी पुस्तके विकत घेऊ शकत नाही म्हणून शाळेतील ग्रंथपाल मॅडम मला आवर्जून बोलावून पुस्तके देत .त्या शिवाय महत्त्वाचे म्हणजे त्या माझ्यासाठी छोटी छोटी कथा आणि विज्ञानावरील निवडक पुस्तके अवांतर वाचनासाठी काढून ठेवीत. मला ते वाचण्यासाठी प्रोत्साहित करीत .मी त्या शाळेत असेपर्यंत म्हणजे इयत्ता दहावी पर्यंत खूप पुस्तके कंदिलाच्या उजेडात वाचून काढले. त्या मॅडमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत .त्या अवांतर वाचनाचा मला माझ्या भाषा विषयातील निबंध लेखन व प्रश्नांची उत्तरे लिहिताना खूप उपयोग झाला.
कॉलेजमध्ये असताना मला एकच ड्रेस असल्याने मी वर्षभर एकच ड्रेस घालत असे. इतर मैत्रिणींकडे वेगवेगळे ड्रेस असत. पण मी रोज एकच ड्रेस मध्ये कॉलेजला येते, तरी माझ्या मैत्रिणी पैकी कोणी मला हिणवले किंवा डिवचले नाही किंवा कमी पणाने वागवले नाही .माझ्या गरिबीमुळे मला त्यांनी त्यांच्या मैत्रीमध्ये कोणतेही अंतर पडू दिले नाही. त्यांच्या अभ्यासाच्या चांगल्या सवयी सोबत शेअर केल्यात .त्यांचेकडून ही बरेच शिकायला मिळाले .त्यांचाही या यशात नक्कीच वाटा आहे. असे अनेक चेहरे सुमीच्या डोळ्यासमोर आले .त्यांनी जशी मला मदत केली तशी मी कोणासाठी केली तर… नक्कीच करणार. तिच्या डोळ्यात पाणी तरळले.
माझी बहीण तर माझ्या अभ्यासाचा फार दुस्वास करायची .मी अभ्यास करताना दिसले की ती जाम भडकायची.तिला वाटायचे की मी कामे टाळतेय. म्हणून मी नेहमी तिच्या लपून अभ्यास करायची .दिवसा शाळा करून घरची कामे तिच्या मनासारखी झाली अन् सर्व झोपायला लागले ,की मी अभ्यास सुरु करीत असे. पण मी दहावीत असताना बाहेर कामाला जाऊन शाळेला जायची.त्यामुळे सकाळी तर अजिबात वेळ मिळायचा नाही अभ्यासाला. मग शाळेतून घरी आल्यावर अभ्यासाला बसावे. तर बहिणीचा धाक. कामं सोडून पुस्तक घेऊन बसली म्हणून खूप टोचून बोलायची .
एक दिवस तर तिने माझ्या चुलत भावाला मला समजावण्यासाठी बोलावले होते. तो मला म्हणाला,
हे बघ अभ्यासाने काही आपले पोट भरणार आहे काय? मी तर गावच्या शाळेत सर्वात हुशार होतो पण दहावीत नापास झालो. म्हणून तुला सांगतो , अभ्यास सोडून दे. आपण काम नाही केले तर उपाशी राहू, तुलाजमेल का ते?
मी काही बोलले नाही. मोठ्यांना उलट बोलायचे नसते हे आईनेच शिकविले .माझी बहीण त्याला पुढे सांगू लागली
,“आम्ही सर्व कोळशाने दात घासतो. आता ही कोलगेट मागते.” हिची लायकी बघ.. तेव्हा मला खूप ओशाळल्यासारखे झाले.
पण माझे बाबा म्हणायचे,
“आपली ही परिस्थिती फक्त शिक्षणानेच बदलू शकते. आपण खूप गरीब आहोत. मी तुला शिकण्यासाठी आवश्यक साहित्य देऊ शकत नाही .पण तरी ,बेटा तू खूप शिक.” माझा त्यांच्यावर विश्वास होता.
आणि आता वाटते माझे बाबा बरोबर होते .माझ्या भावाला सांगू इच्छिते ,माझ्या भोळ्या दादा, तू चुकीचा होतास…
क्रमशः
सुमीची कथा आवडत असल्यास नक्की Like,Share,Comment करा.
तुमच्या प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईल.
सुमीचे पुढीलआयुष्य जाणून घेण्यासाठी कृपया खालील link बघा.
https://marathi.shabdaparna.in/१०गुंता
प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहित रहा…..
शब्दपर्ण फुल ना फुलाची पाकळी म्हणून शब्दपर्णसाठी जे लेखक लिहितील त्यांना views नूसार मानधन देणार आहे.
१००० views.ला १५ रु…..याप्रमाणे.
लिखाण पाठवण्यासाठी marathi.shabdaparna.in वर Registration करा.
Registration करायला काही अडचण आल्यास
9867408400 वर तुमचा नंबर आणि नाव पाठवा.आम्ही Registration करुन देवू.
![]() |
ReplyForward
|
छान.. नविन सुरवात सुमीची
गुंता हळूहळू सुटत आहे.
छान
पुढील भागाची उत्सुकता