मै पल दो पल-song review in marathi
मै पल दो पल-song review in marathi

मै पल दो पल-song review in marathi

सुप्रसिद्ध (हा शब्द खरे म्हणजे कमी भासेल )
शायर साहिर लुधियानवीने लिहिलेली शायरी.
ज्याच्या नावातच जादूगर शब्द दडला आहे त्याच्या शायरीत जादू असणे ओघाने आलेच.

कभी कभी गुलशय रायने लिहिलेली कथा आणि  कथेला सिनेमाचे स्वरुप दिले  यश चोप्रा यांनी.
सिनेमात योगायोगाने बऱ्याच गोष्टी घडतांना दिसतात.
पूजा(राखी) आणि अमित (अमिताभ) एकमेकांच्या प्रेमात पडतात पण विवाह दुसऱ्यांशी होतो.
अमित शायर आणि पूजा शायरीची दिवानी.
अमित काॕलेजमध्ये हे गाणे गातो. ह्या गाण्यानंतर दोघांची प्रेमकहानी सुरु होते.

आयुष्याची क्षणभंगुरता दर्शवणारे हे गीत .सगळा दोन घडीचा डाव आहे. आयुष्य क्षणभंगुर आहे.ज्याचा आपण अभिमान बाळगतो तेतारुण्य,तुमच्यातील कलाकारी किती काळ राहणार?
पळभर.
हे पुरातन काळासून सांगितलेले सत्य साहिरने त्याच्या शब्दातून सांगितले.आपण ह्या सत्यापासून अनभिज्ञ होतो आणि आताच आपल्याला हे माहित झाले…असा भास होण्याइतपत गाण्यात गुंतत जातो.

येणे आणि जाणे…अनादी काळापासून सुरु असलेला खेळ असाच सुरु राहणार.

गीतामध्ये शायर म्हणत आहे
सगळेच क्षणभंगूर आहे.मी,माझे अस्तित्व, माझी शायरी,माझे तारुण्य सगळे काही निमिषभरच.माझ्या आधी माझ्यासारखे कित्येक शायर आले आणि गेले.
पण ते सगळेच थोड्या वेळाचे सोबती .
तसेच माझेही होणार.आज तुमच्यासोबत असलेला मी उद्या तुमच्यापासून विलग होणार
माझ्याही आधी माझ्यासारखे कित्येक शायर आले पण ते सगळेच थोड्या वेळाचे सोबती.काही शायरी गावून गेलेत तर काहींना तेही करायची सधी मिळाली नाही. त्या वेळेचा भाग असलेले ते आता कुठे  आहेत? कुठेही नाही. माझेही तसेच होणार.
आज इथे,या निमिषात असलेलो मी उद्या तुमच्यापासून विलग होणार.
 
उद्याही सुंदर शब्दकळ्यांची माळ गुंफणारे शायर  येतील. माझ्यापेक्षा सुरेख शायरी करणारे आणि  तुझ्या सारखे ऐकणारे येत राहतील. मी नसलो तरी माझी आठवण कुणाला येईल? माझी आठवण काढायला कुणाला वेळ असेल? त्यांचा वेळ माझ्या आठवणीत ते व्यर्थ का घालवतील?
 

मैं पल दो पल का शायर हूँ
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है
मैं पल दो पल का…

मुझसे पहले कितने शायर
आए और आकर चले गए
कुछ आहें भर कर लौट गए
कुछ नग़मे गाकर चले गए
वो भी एक पल का किस्सा थे
मैं भी एक पल का किस्सा हूँ
कल तुमसे जुदा हो जाऊँगा
वो आज तुम्हारा हिस्सा हूँ
मैं पल दो पल का…

कल और आएंगे नग़मों की
खिलती कलियाँ चुनने वाले
मुझसे बेहतर कहने वाले
तुमसे बेहतर सुनने वाले
कल कोई मुझको याद करे
क्यूँ कोई मुझको याद करे
मसरूफ़ ज़माना मेरे लिये
क्यूँ वक़्त अपना बरबाद करे
मैं पल दो पल का…

प्रत्येक काळाला लागू होणारे, हळूवार वास्तव दाखवणारे  हे सुंदर  गीत मुकेशने तेवढेच हळूवार गायले आहे.  गाण्याला खय्यामचे संगीत आहे.
 
प्रिती

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!