ऐसी उलझी नजर-song review in marathi
ऐसी उलझी नजर-song review in marathi

ऐसी उलझी नजर-song review in marathi

शरीराचे वय वाढत जाते पण मन?
ते तरुणच राहते.मन कधी म्हातारे होत नाही.
प्रेमात पडण्यासाठी वयाचे बंधन नाही.
वय कोणतेही असो भावना बदलत नाहीत.

वय झालेला खालूजान कृष्णाच्या प्रेमात पडतो. वेड लागते त्याला तिचे. तिच्या मादक अदांवर फिदा झालेला खालूजान प्रेमात तर पडतो.पण ह्या वयात त्याला स्वतःलाही प्रेमात पडलो याचा स्वीकार करणे अवघड जात आहे.
त्याच्यापुढे संभ्रम निर्माण झाला.
भावनांची आवर्तने अलगद चिमटीत पकडणाऱ्या गुलजारने इश्कियामधील  हे गाणे लिहीले आहे.गाण्याला संगीत दिले आहे विशाल भारद्वाज यांनी आणि  आवाज आहे राहत फतेह अली खान यांचा
वेड लावणारे शब्द,तेवढेच अप्रतिम त्याचे संगीत आणि नसीरचा अभिनय…..गाणे परिपूर्ण न बनते तरच नवल.
खालूजान कामानिमित्य बाहेर जातो.तिथेही मादक कृष्णाचे वेड त्याचा पाठलाग सोडत नाही.

ऐसी उलझी नज़र उनसे हटती नहीं
दाँत से रेशमी डोर कटती नहीं
उम्र कब की बरस के सुफेद हो गयी
कारी बदरी जवानी की छटती नहीं
वल्ला ये धड़कन बढ़ने लगी है
चेहरे की रंगत उड़ने लगी है
डर लगता है तनहा सोने में जी
दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी

चंचल झालेली नजर आता तिच्या चेहऱ्यावरुन दुसरीकडे वळणे शक्य नाही.
वय झाल्यामुळे दातांनी रेशमी धागा तोडू शकत नाही.
माझे तारुण्य कधीचेच संपले आहे.केस कधीचेच पांढरे झाले आहे.पण तारुण्याचे काळे ढग संपायचे नाव घेत नाहीत.
बापरे! ह्दयाची धडकन वाढत आहे. वय झाल्यामुळे चेहऱ्यावरचे तेजही लयाला गेले आहे.
एकटे झोपायची भीती वाटत आहे.पण शरीराच्या आत दडून असलेल्या मनाचे काय करायचे?
ते तर अजून छोट्या मुलासारखे कच्चे आहे. अननुभवी आहे.

किसको पता था पहलू में रखा
दिल ऐसा पाजी भी होगा
हम तो हमेशा समझते थे कोई
हम जैसा हाजी ही होगा
हाय ज़ोर करें, कितना शोर करें
बेवजह बातों पे ऐवे गौर करें
दिलसा कोई कमीना नहीं
कोई तो रोके, कोई तो टोके
इस उम्र में अब खाओगे धोखे           

डर लगता है इश्क़ करने में जी

कुणाला माहित होते एवढे वर्ष जपून ठेवलेले ह्दय असा खट्याळपणा करेल म्हणून. मला वाटायचे हे माझ्यासारखेच साधे,निरागस असणार. पण नाही.
किती आवाज आणि गोंधळ चाललाय त्याचा आतल्याआत.
विनाकारण कुठल्याही गोष्टीकडे लक्ष द्यायला लागले.ह्दयासारखा दगाबाज कोणीच नाही.
कोणीतरी याला रागवा, याला थांबवा.
ह्या वयात प्रेमात पडण्याची भीती वाटतेयं. समोरच्याकडून प्रेमाऐवजी धोका मिळाला तर….

ऐसी उदासी बैठी है दिल पे
हँसने से घबरा रहे हैं
सारी जवानी कतरा के काटी
पीडी में टकरा गये हैं
दिल धड़कता है तो ऐसे लगता है वो
आ रहा है यहीं देखता ही ना हो
प्रेम की मारें कतार रे
तौबह ये लम्हे कटते नहीं क्यों
आँखें से मेरी हटते नहीं क्यों
डर लगता है मुझसे कहने में जी

ह्दय बेचैन झाले आहे.हसायचेही भय वाटत आहे.तारूण्यात प्रेमात पडलो नाही. आणि आता जेव्हा तारूण्य सरायला आले तेव्हा हे प्रेम?
ती दिसली की ह्दयाचे ठोके वाढतात .पण तिचे माझ्याकडे,प्रेमाकडे लक्षच नसते. माझ्या काळजात मात्र प्रेमाची कट्यार घुसते.
ही वेळ,हे क्षण लवकर संपत का नाही?
माझ्या डोळ्यासमोरुन ती जराही हलत का नाही?
मला माझ्या भावना तिच्यापर्यत पोहचवण्याचीही भीती वाटतेयं. माझ्या व्याकुळता तिच्यापर्यंत पोहचत नाही आहे.
खरयं तिच्या प्रेमात पडलेले माझे ह्दय अजून कच्चेच आहे.

हे गाणे ऐकतांना ‘इश्ककी कोई उम्र नही’ हे पटते.

8 Comments

  1. Vaishali joshi

    खूपच सुंदर लिहिलेस गं …माझे खूप आवडते गाणे आहे हे …आता हे रसग्रहण वाचल्यावर गाणं ऐकायला अजून मजा येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!