…ऐ मेरे वतन के लोगो…खूप दिवसांपासून या गाण्या बाबात मनात विचार येत होते, ह्या लेखन स्पर्धेमुळे त्याबाबत काही चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली.
1962 च्या भारत चीन युद्धाच्या पाश्र्वभूमीवर कवी प्रदीप, (रामचंद्र द्विवेदी) यांनी लिहीलेले हे गीत, 27/1/1963 ला दिल्लीत national stadium वर लता मंगेशकर यांनी प्रथम सादर केले. त्यावेळे चा प्रसंग आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पुनरुक्ती करण्याची गरज नाही.
भारतीय लोक,शेकडो वर्षांपासून आक्रमणांशी लढत देत होते. समाजाची कणखर मानसिकता तयार करण्याचे, तसेच टिकवून ठेवण्याचे काम आपल्या, कवी, शाहीर, आणी लेखक मंडळींनी केले आहे.
हे गीत ही तेच काम अतीशय प्रभावीपणे करते.
आपल्या प्राणाची ही पर्वा न करता, शत्रु शी बेधडक पणे आपले जवान भिडतात ही मानसिकता कशातून तयार होते? (नाही तर, तालिबानी आक्रमणासमोर सपशेल शरणागती पत्करणारी अफगाण सेना, आपण पहातच आहोत)
अशा पराक्रमी योध्यांचे वर्णन ह्या गीतात समर्पक पणे केले आहे.
पहिल्याच कडव्यात देशप्रेमाचे नारे.देणाऱ्या, जनतेस, अशा विरमरण पत्करलेल्या विरांचे स्मरण करून दिले आहे.
नाहीतर आपण हे बघतोच कि, असे शूरवीर हे दृष्टीआडच रहातात.आणि इतर राजकीय पुढारी त्यांच्या जीवावर आपली शेखी मिरवून घेतात. तसे पाहिल्यास, रस्ते, चौक, बागा, इमारती, बहूतेक करून पुढाऱ्यांची नावे जास्त दिलेली दिसतात, आणि हे अनामिक वीर विस्मरणात जातात. हे ह्या गाण्याच्या पहिल्याच कडव्यात मांडून प्रदीप यांनी व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
पुढच्या दोन कडव्यात, त्यांनी जो काही पराक्रम गाजवला, कोणत्या परिस्थितीत ते लढले, आणि प्राण गेले तरी आपला मोर्चा/ठिकाण सोडले नाही. ह्याचे मनाला भिडणारे वर्णन कवी करतात.
इथे मला एक गोष्ट जाणवते, साधारणपणे अशा वीरांच्या पराक्रमाचे वर्णन करणाऱ्या गीतात, पोवाड्यांमधे सुरूवातीला, शत्रुच्या ताकदीचे, क्रोर्या चे वर्णन असते, त्यामुळे, आपल्या वीराचा पराक्रम अधिक प्रखरपणे जाणवतो. पण इथे तसे करणे टाळले आहे. तरीही आपल्या सैनिकांचा पराक्रम तितक्याच प्रभावीपणे आपल्या मनाचा ठाव घेतो. ह्यावरून कवीची शब्दांवर आणि भाषेवर असणारी पकड तर दाखवतोच, पण अशा बलिदानाला अधोरेखित करण्यासाठी कोणत्याच मानकाची, फूटपट्टीची गरज नसते. ते शौर्य, ते बलिदान, स्वतःच एक मानबिंदू असते हे ही एक जाणवते.
नंतरचे कडवे तर आजच्या काळात खूपच दिशादर्शक आहे. आपण इकडे अजुनही जातीपाती च्या राजकारणात अडकलेलो असताना, तिकडे सीमेवर लढणाऱ्या बटालियन मधे, भले कोणी शीख, कोणी गोरखा, कोणी हिंदु असेल, पण सर्वात आधी तो एक भारतीय असतो, तो एका धर्माचे अथवा एका राज्याच्या रक्षणासाठी नाही तर देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देतो.
मरताना नक्कीच त्याच्या मनात विचार असतील, की मी आता चाललो आहे, इथून पुढे आता बागडौंर तुमच्या हातात. कदाचीत ह्याचे विस्मरणा होईल म्हणून कवी त्यांचे बलिदान लक्षात आणून देत आहे.
एक गोष्ट जाता जाता, मनात आली…(अर्थात गाण्या चे कवीचे मोठेपण 100%मान्य करून, मी.हे धाडस करतो आहे) …..
गाण्यात कोठेतरी, अशा वीरगती प्राप्त योध्यांच्या, मातांचा उल्लेख हवा होता.
क्या.लोग थे वो दिवाने
क्या लोग थे वो अभिमानी.…
इथे तो उल्लेख जमू शकला असता.
शेवटी…असे सांगतात की, प्रदीप यांच्या मनात अशा प्रकारच्या गाण्याबाबत विचार चालूच होते. एक दिवस ते morning walk ला गेले असता, पहिले कडवे सुचले….आणि दुसर्या walk करणार्या व्यक्तीचे पेन मागून त्यांनी तिथेच सापडलेल्या एका कागदावर ते कडवे लिहिले….
आज ह्या गाण्याला जवळपास राष्ट्रगीता इतके महत्त्व प्राप्त झाल्यानंतर खरेच तो पेन अगदी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवता आला असता असे वाटते.
एकूण च ह्या गीतात,केलेल्या वर्णनावरून अशा अनामिक योध्यांच्या स्मृती समोर आपोआप नतमस्तक व्हावेसे वाटते.
अतूल भालेराव










खुप खुप छान