उसवले धागे कसे?
भाग-३
निवडणूका संपल्या. निकाल यायला दोन दिवस वेळ होता.आनंद मित्रांसोबत बाहेर गेला होता.
मी पण होतो त्याच्यासोबत.
वापस येतांना मला मला सोडले आणि घरी जातो म्हणाला.मी थकलो होतो.लगेच झोपलो.गाढ झोपेत असतांनाच मोबाइल वाजला. फोन आनंदीचा होता.
चैतन्य नकोशा आठवणी आठावत राहला.
चैतन्य आनंदचा अपघात झाला.
एवढे रडत रडत बोलली आणि फोन ठेऊन दिला.मी लगेच आनंदीच्या घरी गेलो. सगळे दवाखान्यात होते. दवाखान्यात गेलो.आनंद ICU मध्ये होता.
अनंतराव एका कोपऱ्यात सुन्न होऊन बसून होते. आनंदी मी दिसताच मला बिलगून रडायला लागली.
डाॕक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मी काय झाले असेल ते समजलो.माझा मित्र गेला होता.
केतकीही एका कोपऱ्यात उभी होती.आनंदसोबत तिने रंगवलेला स्वप्नांचा इमला क्षणार्धात कोसळला होता.तिचे दुःख कुणालाही कळणे शक्य नव्हते.तिच्याबद्दल घरी सांगण्याआधीच आनंद गेला होता.
आनंदचा अंत्यसंस्कार उरकला.अनंतरावांनी आईचे प्रेम दिले होते आनंद-आनंदीला.त्यांचे दुःख बघवत नव्हते.
निवडणूकीचा निकाल लागला.गेलेला आनंद भरघोस मतांनी निवडून आला.
आनंद असता तर जल्लोष राहिला असता त्या घरात.
आनंदी घरात एकटी पडली होती.लहानपणापासून आनंद,आनंदी सोबत वाढले होते. आनंदशिवाय घरात राहण्याची सवय नव्हती तिला.
अनंतराव अगतिक झाले होते.दीनवाणेपणे एकटक छताकडे बघत राहायचे.त्यांच्याकडे बघितले कि आनंदीच्या ह्दयात कालवाकालव व्हायची.
अनंतरावांना एवढे दुःखी ती प्रथमच बघत होती.ती
त्यांना ह्या दुःखातून बाहेर कसे काढायचे याच विंवचनेत राहायची.
बाहेर आनंदचा अपघात कोणीतरी घडवून आणल्याची चर्चा सुरु झाली. चर्चा अनंतरावांपर्यंत पौहचली.
त्यांना पण दोघातिघांवर संशय आला.पण पुरावा नव्हता शिवाय आनंद वापस येणार नव्हता.
आता पुढे काय हा प्रश्न होता. आनंदसाठी बघितलेली स्वप्ने जळून गेली होती आनंदबरोबरच.
पण महत्वाकाक्षा?
स्वप्ने हळवी असतात.महत्वाकांक्षा कठोर असते.स्वप्ने जळून जाऊ शकतात,आतल्या आत विरुन जाऊ शकतात पण महत्वाकांक्षेचे मात्र तसे नसते.ती सोडून जात नाही.
अनंतरावांच्या महत्वाकांक्षेनेच त्यांचे दुःख हलके झाले.
निवडणूक जिंकलेला आनंद गेला होता.ती जागा आता रिकामी होती. पुन्हा निवडणुका होणे अपरिहार्य होते.आनंदला विरोध करणारेच आता पक्षश्रेष्टींना तिकिट मागत होते.अनंतरावांना याचा सुगावा लागला.
आनंदच्या मृत्यूचा बदला घ्यायचा असेल तर हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात जाता कामा नये. असे मनोमन ठरवून अनंतराव बाहेर पडले. त्यांच्या विश्वासातील मंडळींना भेटले. पक्षश्रेष्टींची भेट घेतली.काही एक निर्णय घेऊन घरी परतले.
घरी येऊन त्यांनी आनंदीला जवळ बोलवले आणि तिला निर्णय सांगितला.
रात्री आनंदीला मी फोन केला तेव्हा आनंदीने सांगितले,
चैतन्य, बाबा मला निवडणुकीत उभे करत आहेत.माझ्यासाठी हे धक्कादायक होते.
मी निःशब्द झालो. एकदा आनंदी निवडणूकीत उभी राहिली कि तिचे आयुष्य वेगळे होणार हे नक्की होते.
मी दुसऱ्या दिवशी आनंदीला भेटायला गेलो.
घरी गेल्याबरोबर आनंदचे नसणे जाणवायचे.
माझा लहानपणापासूनचा सगळ्यात जवळचा मित्र गेला होता कायमचा.
आनंदी बाहेर आली.तिच्या घराच्या बाजूला पिंपळपारसचा वृक्ष होता.आधी आम्ही नेहमी तिथेच भेटायचो.पिंपळासारखाच दिसणारा पण विविधरंगी फुले येणारा हा वृक्ष आनंदीला फार आवडायचा. आमच्या खूप गप्पांचा हा वृक्ष साक्षीदार आहे.
मी आणि आनंदही ह्या वृक्षाखाली खूप गप्पा करायचो.त्याची कित्येक गुपिते इथेच मला त्याने सांगितले. तो केतकीच्या प्रेमात कसा पडला, बाबांना केतकीबद्दल कसे सांगायचे हे सगळे त्याने इथे पारसपिंपळाच्या पारावरच सांगितले.
अपघाताच्या आदल्या दिवशी मी आणि आनंद केतकीला भेटलो.
केतकी,मी,आनंद काॕलेजपर्यत सोबत होतो.तिथेच दोघांच्या रेशीमगाठी जुळल्या.
आता लग्न करणे फार गरजेचे आहे चैतन्य -आनंदने सांगितले.त्याचा अर्थ तेव्हा कळला नव्हता.
मी आणि आनंदी बोलत बोलत तिथपर्यंत गेलो.
आनंदी सांगत होती
बाबांनी मला निवडणूकीत उभे करायचे ठरवले आहे.
मी आणि आनंदी बोलत बोलत पारसपिंपळापर्यंत गेलो.
आनंदी सांगत होती
बाबांनी मला निवडणूकीत उभे करायचे ठरवले आहे.
मी काहीच बोललो नाही. माझी नाराजी समजली तिला.
मी बाबांना नाही म्हणू शकत नाही चैतन्य. आदित्यच्या दुःखाने आधीच बाबा खूप खचले आहेत. मी नकार दिला तर बाबा सहन करु शकणार नाहीत.
चैतन्य मी काय करु?
सांग ना.
आनंदी,तू निर्णय घेतलाच आहे तर आता मी काय सांगू ?
तुला माहीत आहे मला राजकारणी लोकं आवडत नाही. त्यांचे डावपेच,आरोप प्रत्यारोप, ध्येय गाठण्यासाठी त्यांची कितीही खाली जाण्याची असलेली तयारी बघून मला खरेच नको वाटते ते सगळे.
अरे पण आदित्यही तर राजकारणात होताच नं.
हो ग.पण तो मला राजकारण कळत नव्हते तेव्हापासूनचा मित्र होता माझा.
त्यालाही राजकारण आवडायचे नाहीच पण वडिलांना
तो नाही म्हणू शकत नव्हता. आणि आनंदी तो मित्र होता.आपल्याला सहचर बनायचे आहे. आयुष्याचे जोडीदार बनणार आहोत आपण.
रात्रंदिवस सोबत राहायचे आह आपल्याला. आनंदी आपण दोघांनी मिळून बघितलेल्या स्वप्नात राजकारण कुठे नव्हतेच.
अरे पण आता परिस्थिती वेगळी आहे.मी बाबांना दुखवू शकणार नाही.आणि तू तर मला हवाच आहेस.
आनंदी मलाही तू हवी आहेस पण राजकारण नको.
मग मी काय करु चैतन्य?
क्रमशः
मागील भाग वाचा खालील लिंकवर
आनंदी राजकारण सोडते का?वाचत रहा उसवले धागे कसे या कथामालिकेच्या पुढील भागात.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा