आपकी आँखो मे कुछ महके-song review in marathi
मोहिनी पाटनुरकर राजे
नव्यानेच संसार सुरू झालेले जोडपे. प्रणयात धुंद असे स्वर्गसुख उपभोगत
नएकव्याची नवलाई, एकमेकांना समजुन घेत.., रममाण होत सुखद प्रेमळ सहजीवनाचा आनंदी जीवन जगताना स्वप्नवत वाटत होते त्यांना सारे…पण याच सुखाला ग्रहण लागताना ,पायाखालची जमीन सरकते तेव्हा, मन आणि वेदनेचा सारीपाट मांडला गेला,अन सुरू झाले त्यांच्या जीवनातील एक भीषण महायुद्धच म्हणावं लागेल…
त्यांचे सुखाचे आयुष्य बदलुन टाकणारा भयंकर प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडतो. ते दोघेही एक निवांत क्षणी चंद्र ताऱ्याच्या सानिध्यात फिरत असताना अचानक काही नराधम जेव्हा तिचा फायदा घेतात, आणि हे नायकायच्या समोर दृश्य घडते, तेव्हा त्याच्यावर कोसळले आभाळ जीवघेणेच होते तर…
नायिके वर झालेल्या अत्याचाराने त्यांचे आयुष्य ढवळून निघते. एक सुंदर नाटकात रंगत येताच पडदा पडावा, असाच काहीसं… परिणामी या प्रसंगानंतर त्यांच्या दुरावा निर्माण झाला…
चूक नियतीची होती,पण शिक्षा नव्यानेच संसार सुरु केलेल्या प्रियकर, प्रेयसी ला मिळाली होती….क्षणातच सारं संपलं होतं….
त्या प्रसंगानंतर आलेला त्यांच्यातला दुरावा. नायिकेच्या अगतिकतेचा उत्कृष्ट अभिनय रेखाचा. त्याच दर्जाचा विनोद मेहराचा समजूतदारपणा.
समोर आलेलं संकट, समस्यांना ते कसे तोंड देतात ? त्यांच्या प्रेमाची कसोटी कशी लागते? यावर हा बेतलेला हिंदी चित्रपट ‘ घर’. याची मल्याळम आणि तामिळ मध्ये सुद्धा आवृत्ती आहे.
1978 साली आलेला हा चित्रपट. विनोद मेहरा आणि रेखा यांचे नितांत सुंदर अभिनय . त्याचप्रमाणे गुलजार यांची अतिशय भावुक गीते. संगीत आरडी बर्मन यांचं.
यातीलच हे लोकप्रिय सुंदर प्रणय गीत. गायक किशोर कुमार_ लता मंगेशकर. सहज सुंदर चाल.
नायक : आपकी आँखो मे कुछ महके हुए से राज है
आप से भी खूबसुरत आपके अंदाज है
आपकी आँखो मे कुछ महके हुए से राज है
नायक (विनोद मेहरा) नायिकेची (रेखा ) स्तुती एका वेगळ्या हटके अंदाजाने करत आहे . त्याला नायिकेच्या नजरेत डोळे गुढ भाव दिसतात आणि असे गुढ आहे ज्याचा दरवळ पसरला. डोळ्यातले भाव टिपताना,उपमा हजारो दिल्या,
सोंदर्य मांडताना, तारका ही लाजल्या…! इतके सुंदर वर्णन मांडले आहे…
गुलजारची अप्रतिम काव्यरचना.
त्याची नायिका लावण्यवती तर आहेच पण तिचे नखरे जास्त सुंदर भासतात त्याला. तिच्या नजरेतले प्रेमाचे खोलवर असलेले भाव तो शब्दात फक्त डोळ्यांनी टिपतो आहे …
नायक : लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कही
आपकी आँखो मे क्या साहिल भी मिलते है कही
केवळ ओठांची हालचाल सुद्धा झाली तर मोगऱ्याचा सुगंध दरवळत रहावा अशी सुंदर उपमा दिलेली आहे….
आपकी खमोशिया भी आपकी आवाज है
तो तिच्या प्रेमात इतका विरघळला आहे की त्याला वाटते तिच्या ओठांचा मोहक हालचालींनी मोगऱ्याचे फूल उमललावे आणि सुगंध दरवळत रहावा अशी सुंदर उपमा दिलेली आहे… तिचे डोळे इतके अथांग भासतात त्याला आणि तिच्या डोळ्यात अथांगते सोबतच त्याला किनार सुद्धा दिसते . नायिका इतकी शांत सौम्य शीतल असली तरी तिच्या हृदयाचे अबोल स्पंदन केव्हाच त्याच्या हृदयापर्यंत पोहोचले आहेत.
आता तिची वेळ आहे, नायकाच्या प्रणयी तारिफेला उत्तर देण्याची….
तिला त्याच्या प्रेमाबद्दल काय वाटते हे तिनेही सांगणे गरजेचे आहे.
नायिका : आपकी आँखो मे कुछ महके हुए से राज है
आप से भी खूबसुरत आपके अंदाज है
आपकी आँखो मे कुछ महके हुए से राज है
तिलाही त्याच्या नजरेत शृंगाराने सुगंधित रहस्यमयी भाव दिसतात . त्याचे प्रणयी प्रेमाचे बारकावे, अंदाज त्याच्यापेक्षाही अलौकिक वाटतात.
नायिका : आप की बातो मे फिर कोई शरारत तो नही
बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नही
आप की बदमाशीयोके ये नये अंदाज है
तो इतकी तिच्यावर स्तुतीसुमने उधळततोय की तिला तो खोडकरपणा तर करत नाही ना? असे वाटते. उगाचच तारीफ करण्याची तुला सवय आहे का? की तुझ्या खोडकरपणाचा हा एक वेगळा नमूना आहे.
नायक : आपकी आँखो मे कुछ महके हुए से राज है
तुझ्या नजरेच्या अगम्य,सुगंधी आकर्षणात तो हरवून जातो.
नायिका : आप से भी खूबसुरत आपके अंदाज है
आपकी आँखो मे कुछ महके हुए से राज है
तुझ्यापेक्षा लोभस तुझ्या हालचाली आणि अदा आहेत.
त्याची नजर अशी काही सुगंधित रहस्यमयी आहे जी तिच्या आकलना पलिकडची आहे.
…….मोहिनी पाटनुरकर राजे
प्रिय वाचक,तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे रसग्रहण शब्दपर्णवर पाठवू शकता.
प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहित रहा…..











सुंदर रसग्रहण
Dear Mohini
It’s really wonderful,soothing and praiseworthy too.Hearty Congratulations 💐💐💐💐💐
Thanks Gawande sir for appreciation
WH फारच surekh
अतिशय सुंदर 👌
मा.मोहिनी वहिनी,
खुप शिर्षकाखाली सुंदर लिखाण केले आहे.खरेतर प्रेमाची सुरूवातच डोळ्यां पासुन होते.आणि अपेक्षीत जोडीदार भेटल्यावर मनात ऊत्पन्न होणारे विचार /भावना शब्दरूपी बाहेर पडतात.
“आपकी आखों में महके हुये ख्वाॅब है..”
प्रत्येक भावनेचे शब्दरूपी विश्लेषण तुंम्ही खुप सोप्या शब्दात केले असुन हे वाचत असतांना प्रत्येक प्रसंग डोळ्या समोर साक्षात दिसत असल्याची जाणीव होते. खुप आत्मियतेने प्रसंग लिहिलेला आहे.त्यामुळे वाचतांना आपणही एका “ख्वाब” मध्ये स्वतःला हरवुन बसतो.हा विषयच न संपणारा व मनःस्वी आनंद देणारा आहे.जिवन हे भावनांवरच अवलंबून आहे.जितक्या चांगल्या प्रकारे भावना समजुन घेतल्या तर तितकाच निखळ आनंद मिळाल्या शिवाय रहात नाही.
विलंबाने का असेना आपण पुनःश्च लिखाणास सुरूवात केली याचे खुप समाधान वाटले.-हदयस्षर्षी लिखाण वाचुन खुप समाधान वाटले.आपल्या भावी लेखनास खुप खुप शुभेच्छा.
तुमचे ईच्छा शक्तीचा अभिमान वाटतो.स्वतःला सावरून वाचकांना भावनांचे अनमोल विश्लेषण करून वाचनास ऊपलब्ध दिल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
महेश श्रीनाथ बोर्डे,
टिळकनगर,नांदेड.
खुप खुप आभारी.
खूप छान प्रतिक्रिया आपली, नेहमीप्रमाणे.
गाणे सगळ्यांनाच आवडतात. मला गाण्याचा जो भाव कळाला, तोच मांडायचा पहिलाच प्रयत्न.
आपल्या प्रतिक्रिया मुळे लिहिण्यास हुरूप येतो
पुन्हा एकदा धन्यवाद