दमभर जो उधर-song review in marathi
दमभर जो उधर-song review in marathi

दमभर जो उधर-song review in marathi

होता होता
एक जमाना होता. खूप जूना नाही.
साठ सत्तर वर्षापूर्वीचा.
साठ वर्षात कित्येक स्त्रीसुलभ भावना मागे ढकलल्या गेल्या. त्यातलीच एक लाजण्याचीही भावना होती.
समाजाची यांत्रिक प्रगती होत गेली आणि खूपशा लाजऱ्या भावना मागे पडल्या.

समाजाचे प्रतिबिंब घेऊनच सिनेमा बनवल्या जातो.प्रेयसीने चंद्रालाही लाजण्याचे दिवस होते ते.
१९५१ साली आलेला राजकपूरचा आवारा आणि त्यातील शैलेंद्रजीने रचलेले,शंकरजयकिशनने संगीत दिलेले लता-मुकेशने गायलेले ‘ दम भर जो उधर’ हे गाणे.

सिनेमा Black and White.पण रंगीन नसला तरी नायकाचा निरागसपणा,नायिकेचे लाजणे,चंद्राचे अस्तित्व….या सगळ्या भावनांच्या रंगानी सिनेमात कितीतरी रंग भरले.

प्रेयसी चंद्रासमोर प्रियकरासोबत प्रेमालाप करायला लाजत आहे. तिला चंद्राचे अस्तित्व प्रियकरासोबत प्रणय करण्यापासून थांबवत होते.
चंद्राला लाजणे ही कल्पनाच किती मोहक आणि लाजरी आहे.

चारही बाजूने पाणी आहे. नावेत फक्त ही दोघेच(राज आणि रीटा) आहेत.
खूप दिवसांच्या दुराव्यानंतर भेटले आहेत.किती मुक्तपणे प्रेम करु शकतात.पण नाही.वर आभाळातला चंद्र अनिमिषपणे प्रेमीजीवांना न्याहळत आहे.
नायिका चंद्रासमोर मनी वसलेली प्रीत कशी व्यक्त करणार?
फक्त निमिषभर ती नजर वळवायची चंद्राला विनवणी करत आहे.
दम भर जो उधर मुँह फेरे, ओ चन्दा
मैं उनसे प्यार कर लूंगी
बातें हज़ार कर लूँगी

चंद्रा फक्त क्षणभर तू तिकडे बघ ना.
मला खूप दिवसानंतर भेट झालेल्या माझ्या प्रियकरासोबत खूप बोलायचे आहे.माझी प्रीत त्याच्यावर उधळायची आहे.

दिल करता है प्यार के सजदे
और मैं भी उनके साथ
चाँद को चंदा रोज़ ही देखे
मेरी पहली रात
हो, मेरी पहली रात
बादल में अब छुप जा रे ओ चन्दा
मैं उनसे प्यार कर…

मी,माझे ह्दय सदैव प्रेमाची आराधना करते.
चंद्रा तू रोजच असतो नभात.पण माझी तर प्रियकरासोबतची पहिलीच रात्र आहे.
तू जा ना.मेघात लपून बस.थोडावेळ तरी मला दिसू नकोस.मला माझी  प्रीत व्यक्त करु दे ना.
दम भर जो इधर मुँह फेरे, ओ चन्दा
मै उनसे प्यार कर लूँगा
नज़रें तो चार कर लूँगा

नायिका जितकी लाजरी तितकाच नायक खट्याळ.
ती चंद्राला जायची आळवणी करत आहे आणि तो? तो त्याला जरा इकडे बघ असे सांगतोय.
चंद्रा तू जरा बघ ना इकडे मला माझ्या लाडक्या प्रेयसी सोबत काही बोलायचे आहे तिला नजरेत साठवून घ्यायचे आहे.

मैं चोर हूँ काम है चोरी
दुनिया में हूँ बदनाम
दिल को चुराता आया हूँ मैं
यही मेरा काम
हो, यही मेरा काम
आना तू गवाही देने ओ चन्दा
मैं उनसे प्यार कर लूँगा…

(सिनेमात नायक राजू(राज कपूर) चोर दाखवला.)
पुढे तो म्हणतो
मी तर चोर आहोच. जगभर चोरीमुळे बदनामही झालोय.
पण मी चोरी कशाची करतो तर ह्दयाची.
ही चोरी करतांना मी पकडल्या गेलो तर चंद्रा तुला साक्ष द्यायला यावे लागेल.

दिल को चुरा के खो मत जाना
राह न जाना भूल
इन कदमों से कुचल ना देना
मेरे दिल का फूल
हो, मेरे दिल का फूल
ये बात उन्हें समझा दे ओ चन्दा
मैं उनसे प्यार कर लूँगी…

नायिकेला हा पुन्हा मला सोडून दूर जाईल ही भीती वाटत आहे.
ती चंद्राला विनवते, माझे ह्दय चोरले तरी चालेल पण पुन्हा जगरहाटीत हरवू नकोस.माझ्या ह्दयात त्यानेच फुलवलेले प्रितीचे फुल कुस्करु नको.
तू त्याला हे समजवून सांग.

आणि आता एक क्षण तू तिकडे बघ.मला त्याच्यावर प्रेम उधळायचे आहे.त्याला मनातले गुज सांगायचे आहे.
गाणे संपत येते.
चंद्राचे पाण्यात पडलेले आणि पाण्यात ह्या दोघांचे जवळ आलेले प्रतिबिंब प्रेक्षकांना खूप काही सांगून जाते.

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!